आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:मधुमेहाचा धोका कमी करण्याच्या 3 पद्धती

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुतेक लोकांचा मधुमेहाविषयी असा गैरसमज आहे की ज्याला व्हायचा त्याला तो नक्कीच होईल, परंतु तज्ज्ञ हे मान्य करत नाहीत. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या प्राध्यापक आणि हार्वर्ड वुमेन्स हेल्थ वॉचच्या मुख्य संपादक डॉ. होप रिकिओटी यांचे म्हणणे आहे की, प्री-डायबिटीस बरा होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचे शरीर सहजपणे ग्लुकोजला ऊर्जेमध्ये रूपांतरित करू शकत नसेल तर प्री-डायबिटीस म्हणतात. यामुळे साखरेची पातळी वाढते, परंतु तो मधुमेह म्हणण्याइतकाही नसतो. तथापि, ही परिस्थिती नंतर आजारात रूपांतरित होते. डॉ. रिकिओटी म्हणतात की, अशा वेळी तुमचे वजन पाच ते सात टक्क्यांनी कमी करा आणि आहार सुधारल्यास दीर्घ काळ मधुमेह टाळता येतो. त्या म्हणतात की, अशा व्यक्तीने आठवड्यातून किमान १५० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. जेवणात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, हेल्दी फॅटचा समावेश केला पाहिजे. याबरोबरच साखर कमी करावी. निरोगी जीवनशैली अंगीकारली पाहिजे.

लो-कॅलरी डाएट म्हणजे काय?
इंग्लंडमधील अभ्यासानुसार आढळले की, ज्या लोकांना नवीन मधुमेह आहे त्यांनी कमी कॅलरीयुक्त आहार घेऊन हा आजार बरा करू शकतात. एका अभ्यासानुसार अशा रुग्णांना दोन ते पाच महिने ६२५ ते ८५० कॅलरीचा द्रव आहार दिला गेला. यानंतर त्यांना सामान्य आहार घेण्यास सांगितले गेले, परंतु वजन वाढू नये म्हणून त्यातही त्यांना निरोगी पदार्थच घ्यायचे होते. मग आढळले की, एक वर्ष सुमारे ५०% लोकांच्या साखरेची पातळी वाढली नाही. असा आहार वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावा.

कॅलरी कमी करा
अन्नामध्ये साखरेचे प्रमाण कमी करा, संपूर्ण धान्य आहारात घ्या, फायबरचे प्रमाण वाढवा, आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करा. लाल मांसापासून दूर राहा. एकूणच आपल्या कॅलरीचे प्रमाण कमी करा.

व्यायाम करा
तज्ज्ञ म्हणतात की, दररोज व्यायाम केल्याने मधुमेहाचा धोका टळतो. आठवड्यातून किमान १५० मिनिटे व्यायाम करून मधुमेहाला परतवता येऊ शकते.

१०% पर्यंत वजन घटवा
मधुमेहाची भीती असेल आणि वजन जास्त असेल तर त्वरित सुमारे १०% वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. वजन खूप जास्त नसेल तर पाच ते सात टक्क्यांनी वजन कमी करूनही तुमचे काम भागेल.

- वयाच्या 11 व्या वर्षापूर्वी आई किंवा वडिलांना मधुमेह झालेला असल्यास मुलाला तो होऊ शकतो, असे होण्याचा धोका दुप्पट वाढतो.

- 14% लोकांना भारतात प्री-डायबिटीस आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात त्याकडे लक्ष वेधले आहे.

बातम्या आणखी आहेत...