आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशारीरिकदृष्ट्या सक्रिय नसाल तर नक्कीच तुम्ही आजारी पडण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहात. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दर आठवड्याला सुमारे १५० मिनिटे शारीरिक हालचाली अनिवार्यपणे केल्या पाहिजेत. जगातील २८ टक्के लोक हे प्रमाण पूर्ण करत नाहीत. भारतात हा आकडा आणखी मोठा आहे. भारतात जवळपास ४१ टक्के लोक शारीरिक व्यायामापासून दूर पळतात. न्यूयॉर्क टाइम्सने ३० दिवसांचे वेल चॅलेंज तयार केले आहे. हे आव्हान आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यास मदत करते. ३० दिवसांच्या चॅलेंजचे चार आधार आहेत. पहिला : मूव्ह म्हणजे सजग व्यायाम. दुसरा : नरिश म्हणजे योग्य पोषण. तिसरा : रिफ्रेश म्हणजे मन ताजे ठेवा आणि चौथा : कनेक्ट म्हणजे मित्रांशी संपर्क, कुटुंबाला भेटणे. ३० दिवसांच्या वर्कआउट चॅलेंजमध्ये या चॅलेंजच्या चार तत्त्वांचे नियमितपणे पालन करावे लागेल. तसेच ३० दिवस पुनरावृत्ती करावी लागेल. आज जाणून घ्या त्याची सुरुवात कशी करता येईल ः आव्हानाचे चार स्तर : शरीर आणि मन दोन्ही निरोगी बनवतील १. मूव्ह : ६ मिनिटे व्यायाम करा हा आव्हानाचा पहिला भाग आहे. हे वर्कआउट्ससह माइंडफुलनेसवरही भर देते. तुम्ही ते असे करू शकता - ६ मिनिटांच्या वर्कआउटचे चार भाग : पहिला भाग कार्डिओ आहे. यामध्ये हृदयासाठी दोरीवर उडी मारण्यासारखा व्यायाम आहे. दुसऱ्या भागात खालच्या शरीरासाठी प्लँक करू लावू शकता. तिसऱ्या भागात अप्पर बॉडीसाठी पुशअप्स आणि चौथ्या भागात अॅब्ससाठी क्रंच करता येतात. हे चार व्यायाम फक्त ३०-३० सेकंदांसाठी करावे लागतात. १५ सेकंद विश्रांती घ्यावी लागते. मग त्याची पुनरावृत्ती करावी लागते. सहा मिनिटांनंतर काही योगासने करावी लागतात.
२. रिफ्रेश : मनाची एकाग्रता वाढवा आव्हानाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे रिफ्रेश... दिवसाच्या सुरुवातीला हे करू शकता. चांगली गोष्ट म्हणजे यासाठी वेळ काढण्याची गरज नाही. तुम्ही हे असे करू शकता - मेंदूसाठी एक छोटासा व्यायाम : दात घासतानाही हा व्यायाम करू शकता. ब्रश करताना डोळे बंद करा. मग हळूहळू एका पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीराचे संतुलन सुधारते. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पायांवर असे करा. सतर्कता वाढवणे आणि वर्तमान क्षणात राहण्यास शिकवणे हे या आव्हानाचे ध्येय आहे.
३. नरिश : अन्नाची पौष्टिकता वाढवा आव्हानाच्या तिसऱ्या भागात पोषणावर भर देण्यात आला आहे. यामध्ये अनेक गोष्टी घडू शकतात. उदा. - सॅलड्स रुचकर बनवा : पालेभाज्यांच्या सॅलडमध्ये अतिरिक्त प्रथिनेयुक्त पदार्थ टाकल्याने व्हिटॅमिन (ए, डी, ई आणि के) सारखी चरबी विरघळवणारी जीवनसत्त्वेही मिळतात. साध्या सॅलडमध्ये कॉटेज चीज घालू शकता किंवा काही अक्रोड भाजून वर ठेवू शकता. गोडवा आणण्यासाठी ताजी जांभळे किंवा सफरचंद टाकू शकता. फ्लॉवर आणि ब्रोकोलीसारख्या भाज्यादेखील ते रुचकर आणि निरोगी बनवू शकतात.
४. कनेक्ट : मित्रांबरोबर गाणी ऐका व शेअर करा या आव्हानाच्या चौथ्या भागात तुम्ही जवळच्या लोकांशी संपर्क साधू शकता. आवडते गाणे आवडते मित्र किंवा कुटुंबातील सदस्याला शेअर करा. हे तुम्हाला आवडणारे आणि कुणाला चरी शेअर करावेसे वाटणारे गाणे असावे. तुम्ही ज्यांना हे गाणे शेअर केले आहे त्यांनाही तसेच करायला सांगा. संगीत घट्ट सामाजिक संबंध वाढवण्यास मदत करते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.