आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य:आहारात 30 टक्के प्रथिने आणि रोज पाच लिटर पाणी शरीरासाठी उपयुक्त

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोषणाचे महत्त्वाचे घटक आणि शरीराला त्याचे फायदे

देशभरात राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातोय. या वेळी थीम ही ‘ईट राइट, बाइट बाय बाइट’ अशी आहे. देशात कुपोषणाबद्दल जर पाहिले तर भारतात सहा ते तेवीस महिन्यांच्या एकूण मुलांमध्ये ९.६ टक्केच मुलांना योग्य आहार मिळतो.

जगभरात भुकेच्या परिस्थितीचे आकलन करणाऱ्या एका अहवालानुसार- वर्ल्ड हंगर इंडेक्सनुसार २०१९ मध्ये भारत ११७ देशांमध्ये १०२ व्या स्थानी होता. पोषणाच्या बाबतीत आपली स्थिती ही इतर देशांच्या तुलनेने अतिशय वाईट आहे. कुपोषणाचा भयंकर परिणाम हा आरोग्यावर होतो.

कुपोषणामुळे आपल्या उत्पादकतेवरही परिणाम होतो. एका अहवालानुसार कुपोषणामुळे मानवाची उत्पादकता १०-१५ टक्के कमी होते. ज्यामुळे घरगुती उत्पादन ५-१० टक्के कमी होते. भारतात कुपोषणामुळे एकूण अर्थव्यवस्थेच्या उत्पन्नाला ६.४ टक्के नुकसान होते.

चिंता : देशातील कुपोषणाची समस्या अजून कायम
‘द स्टेट ऑफ द वर्ल्ड््स चिल्ड्रन- २०१९’च्या अहवालानुसार, जगात वय वर्षे ५ पर्यंत प्रत्येक तीन मुलांमधील एक मूल कुपोषण किंवा अल्प वजनाच्या समस्येने ग्रासलेले आहे. जगभरात जवळजवळ २० कोटी, शिवाय भारतात प्रत्येकी दुसरे मूल कुपोषणग्रस्त आहे. अहवालानुसार, २०१८ मध्ये भारतात कुपोषणामुळे ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या जवळजवळ ८.८ लाख मुलांचा मृत्यू झाला. हा आकडा पाकिस्तान आणि आफ्रिकी देशांपेक्षा मोठा आहे.

पोषणाचे महत्त्वाचे घटक आणि शरीराला त्याचे फायदे
प्रथिने : वजन कमी करणे व स्नायू मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा घटक
दैनंदिन जेवणात ३० टक्के प्रथिने गरजेचे. यात अंडी, मासे, क्विनोआ, मशरूम, पनीर, डाळ, छोले, राजमा इ. घटकांचा समावेश होतो. प्रथिने स्नायू मजबूत करतात. शिवाय वजन कमी करण्यासाठी हा उपयुक्त घटक आहे. नखे आणि त्वचेसाठी उपयुक्त आहे.

व्हिटॅमिन : प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात, आजारांपासून संरक्षण करतात
व्हिटॅमिन आणि खनिजे हे घटक आजारांना दूर ठेवण्यासाठी आणि शरीराला मजबूत बनवण्यासाठी मदत करतात. व्हिटॅमिन सीमुळे प्रतिकार शक्ती वाढते. ही प्रतिकारशक्तीच घातक आजारांना दूर ठेवते.

पाणी : शरीरासाठी पाणी महत्त्वाचा घटक आहे
पाण्यामुळे शरीराला डिटॉक्स केले जाते, शिवाय वजनही नियंत्रित करते. कोणत्याही व्यक्तीने कमीत कमी पाच लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

कार्बोदके : एक ग्रॅम कॅलरी, कॉम्प्लेक्स कार्ब हे उपयुक्त आहे
इतर घटकांप्रमाणे कार्बोदकेही महत्त्वाची आहेत. वजन कमी करायचे असेल तर गहू, सोजी, तांदूळ, पोहे कमी खाऊ शकता. बाजरी, शिंगाडा, नाचणी इ. खाऊ शकता. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार १ ग्रॅम कार्बमध्ये ४ कॅलरी असतात.

फॅट्स : चमकत्या त्वचेसाठी योग्य प्रमाणात फॅट्स असणे गरजेचे
निरोगी त्वचेसाठी योग्य प्रमाणात फॅट्स गरजेचे. उदा. पेशींची निर्मिती, हार्मोन, स्नायू व हाडांच्या कार्यक्षमतेसाठी फॅट्स गरजेचे. अंडी, ऑलिव्ह ऑइल, देशी तूप, बदाम, अक्रोड व सरकीचे तेल हा फॅट्सचा उत्तम स्रोत.

डॉ. सरिता डावरे
द लिव्ह वेल डाएट पुस्तकाच्या लेखिका

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser