आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना टेस्टविषयी सर्वकाही:कोरोनाच्या 4 प्रकारच्या तपासणीतून समजते व्यक्ती पॉझिटिव्ह की निगेटिव्ह

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वात मोठा प्रश्न...मी तपासणी केली पाहिजे का?

देशात काेराेनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. देशातील तपासणीचे प्रमाण वाढले आहे, हे त्यामागील कारण आहे. त्याबद्दल अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. कोणती तपासणी योग्य आहे? यावर चर्चाही होतात. म्हणूनच अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

आधी लक्षात घेऊ..विषाणूचे किती प्रमाण धाेकादायक?
व्हायरल लाेड कमी असल्यास बाधा कमकुवत हाेते?

- शरीरात व्हायरस पार्टिकल्सची संख्या किती आहे, याला व्हायरल लाेड म्हटले जाते. एखाद्याला बाधित करण्यासाठी पार्टिकल्सचे किमान प्रमाण किती आहे हे जाणून घेता येते. पार्टिकल्स जास्त असल्यास संसर्ग वेगाने फैलावेल.
- सामान्य व्यक्तीमध्ये व्हायरल लाेड जास्त असला तरी ताे गंभीर नसू शकताे. कारण त्याची राेगप्रतिकारशक्ती याेग्य वेळी काम करत असते. मात्र वयाेमान किंवा आजारामुळे क्षीण असलेल्यांसाठी व्हायरल लाेड धाेकादायक ठरताे.

संसर्गासाठी काेराेनाचा किमान व्हायरल लाेड किती असताे?
काेराेना विषाणू अगदी नवा आहे. एखाद्याला बाधित करण्यासाठी व्हायरस पार्टिकल्सचे किमान प्रमाण किती असते, हे अद्याप संशाेधकांनाही ठाऊक नाही. परंतु काेराेना व्हायरस पार्टिकलच्या माेठ्या प्रमाणात संपर्कात आल्याने संसर्ग जास्त गंभीर नसेल, हेदेखील ठामपणे सांगता येत नाही.

काेराेनाच्या किती प्रकारच्या तपासण्या हाेत आहेत?
सध्या ४ प्रकारच्या तपासणी पद्धती आहेत. १. आर-टी पीसीआर. २. ट्रू-नेट, ३. रॅपिड अँटिजन ४. अँटिबाॅडी टेस्ट.

1. आरटीपीसीआर टेस्ट : अर्थात रिअल टाइम पाॅलिमरेस चेन रिअॅक्शन. ती केवळ प्रयाेगशाळेत केली जाते.
नेमकी पद्धत कशी असते :आधी एका ट्यूबने घसा किंवा नाकामागील स्वॅब घेतला जाताे. ट्युब २० सेकंद ठेवली जाते. ही स्ट्रिप व नमुन्यांना ठेवल्या जाणाऱ्या बाॅक्सला े व्हायरस ट्रान्समिशन मीडिया म्हटले जाते.
- स्वॅब नमुन्यातून आरएनए काढले जातात. ही प्रक्रिया प्रयोगशाळेत पूर्ण केली जाते.
- आरटी-पीसीआर यंत्रात आरएनए टाकतात. साेबत रिएजंट्स असतात. यंत्र दीड तास पाॅझिटिव्ह की निगेटिव्ह समजते. अनेक ठिकाणी हे उपकरण नाही.
निष्कर्ष येण्यास किती वेळ लागताे ? : १२ ते १६ तास
किती अचूक : गाेल्डन स्टँडर्ड म्हणून जगमान्य. ७५-८० टक्के यश.

2. ट्रू-नेट किंवा सीबी-नेट टेस्ट : ही एक प्रकारची चिप आधारित आरटी-पीसीआर किट आहे. एचआयव्ही, टीबी तपासला जातो.
नेमकी पद्धत कशी : नाक किंवा गळ्यातून स्वॅब घेऊन ट्रू-नेट यंत्राद्वारे न चाचणी केली जाते. पॉझिटिव्ह असल्यास आरटी-पीसीआर टेस्टसाठी पाठवला जाताे.
निष्कर्षास किती वेळ लागताे : २-३ तास
किती अचूक : ६० ते ७० टक्के रुग्णांत काेराेना बाधेची शक्यता वर्तवते.

3. रॅपिड अँटिजन टेस्ट (रॅट) : एखाद्या वसाहतीत संसर्ग आढळल्यास निगराणीसाठी वापरली जाणारी ही पद्धत आहे.
पद्धत कशी : रक्ताद्वारे आणि दुसरी स्वॅबने. स्वॅबचे नाकातील दाेन्ही बाजूचे नमुने घेतले जातात. त्यानंतर किटच्या रसायनात ते साेडले जातात. लिक्विडमधील विषाणूचे अस्तित्व शोधले जाते.
निष्कर्ष येण्यास किती वेळ लागताे ? : २०-३० मिनिटे
किती विश्वसनीय : ३० ते ४० टक्के प्रकरणात ती निगेटिव्ह राहू शकते. पण पडताळणीसाठी आरटी-पीसीआर तपासणी अनिवार्य.

4. रॅपिड अँटिबाॅडी टेस्ट : ही काेराेनाची तपासणी नाही. शरीरात अँटिबॉडी किती हे यातून तपासले जाते.
तपासणीची नेमकी पद्धत : रक्तातील अँटिबॉडी तपासतात. आयजीएम अँटिबॉडी संसर्गादरम्यान तयार करते. बरे झाल्यावर आयजीजी अँटिबॉडी तयार करते.
निष्कर्ष किती वेळात मिळताे ? : १५-२० मिनिटे
किती अचूकता : समुदायातील संसर्गाची पातळी पाहण्यासाठी वापर होतो. सौम्य बाधा असल्यास निष्कर्ष चुकीचा निघू शकतो.

सर्वात मोठा प्रश्न...मी तपासणी केली पाहिजे का?
डॉक्टरी तपासणीनंतरच टेस्ट

- आयसीएमआरच्या टेस्टिंग प्रोटोकॉल अंतर्गत परदेशातून आलेले, रुग्णांच्या संपर्कात आल्यास, सर्दी-ताप अशी लक्षणे असल्यास तपासणी होईल. दुसऱ्या राज्यातून घरी परतलेल्यांत लक्षणे दिसल्यास तपासणी होईल. तरीही काही जाणवत असल्यास किंवा शंका असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून टेस्ट करावी.

माझी कोणती टेस्ट करावी?
- डॉक्टरी सल्ल्यावर हे अवलंबून आहे. लक्षणे गंभीर असल्यास आरटी-पीसीआर अन्यथा अँटीजेन टेस्टही करता येते.

मग मी घरीच टेस्ट करावी ?
- त्यासाठी अद्याप टेस्ट किट नाही. टेस्ट अधिकृत प्रयोगशाळेत होतात.

टेस्ट नेमकी कोठे होते? मला कसे कळेल?
- टोल फ्री क्रमांक 1075 या +91-11-23978046 यावर संपर्क साधावा. येथे नोडल अधिकाऱ्याचा क्रमांक देईल. अधिकारी प्रयोगशाळेची माहिती देईल.

डॉ. एकता गुप्ता, व्हायरोलॉजिस्ट, आयएलबीएस, नवी दिल्ली

बातम्या आणखी आहेत...