आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या एक नवीन प्रकारचे औषध श्रीमंत आणि सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय आहे. अब्जाधीश एलन मस्क त्याचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियाचे तारे त्याचे फायदे सांगतात. अचानक सडपातळ होणारे हॉलीवूड स्टार त्यांचे आकर्षक शरीर कोणत्याही औषधामुळे नाही अशी शपथ घेतात. मात्र लोकांना वाटते की तो वजन घटवणाऱ्या औषधांचा परिणाम आहे. वजन कमी करणाऱ्या औषधांचा लाभ फक्त सेलिब्रिटींनाच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी लोकांना होईल जे लठ्ठपणामुळे आजारी आहेत. जगातील ४०% लोकसंख्या लठ्ठपणाने त्रस्त आहे.
वजन घटवण्याचे काही उपाय चांगले सिद्ध झाले आहेत, तर काही निरुपयोगी. जीएलपी-१ रिसेप्टर नावाच्या औषधांचा नवा प्रकार प्रभावी वाटतो. वैद्यकीय चाचणीत डेन्मार्कची फार्मास्युटिकल कंपनी नोवो नोरडिस्कची सेमाग्लुटाइड औषधामुळे वजनात सुमारे १५% घट झाली आहे. ती अमेरिका, डेन्मार्क आणि नॉर्वेत वीगॉवी ब्रँड नावाने विकली जात आहेत. लवकरच ते इतर देशांतही उपलब्ध होईल. मधुमेहाचे औषध ओझेम्पिकची कमी डोसच्या एका प्रकाराचा वजन घटवण्यासाठी वापर होत आहे. अमेरिकी कंपनी एली लिलीचे जीएलपी-१ औषध या वर्षाच्या अखेरीस येईल. ते जास्त प्रभावी असेल. विश्लेषकांचा अंदाज आहे की, २०३१ पर्यंत लठ्ठपणा घटवणाऱ्या जीएलपी-१ औषधांचा बाजार १२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल. काही तज्ज्ञांना वाटते, हे औषध हृदयविकार टाळणारे औषध स्टेन्टिन्ससारखे सामान्य होईल. २०२० मध्ये जगात ४०% लोकांचे वजन जास्त होते वा ते लठ्ठ होते. स्वयंसेवी संघटना विश्व ओबेसिटी फेडरेशनचे म्हणणे आहे की, २०३५ पर्यंत हा आकडा अर्ध्यापेक्षा जास्त होईल. चार अब्ज लोकांचे वजन जास्त असेल. प्रत्येक ठिकाणी लोक लठ्ठ होत आहेत. फक्त श्रीमंत पश्चिमेतील देशच नव्हे तर इजिप्त, मेक्सिको आणि सौदी अरेबियासारख्या देशातही लठ्ठपणा वाढत आहे. त्यामुळे मधुमेह, हृदयविकार, उच्चरक्तदाब, ब्रेन स्ट्रोक, अनेक प्रकारच्या कर्करोगांसह आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होतात. जास्त वजनाच्या लोकांना कोविड-१९ मुळे जास्त भीती होती.
लठ्ठपणाच्या नव्या औषधांचा शोध मधुमेहाच्या उपचारांशी संबंधित आहे. मधुमेहाची औषधी वजन घटवते. सेमाग्लुटाइडमुळे पोट भरलेले राहणे व भूक कमी करणारे हार्मोन तयार होतात. ते मेंदूत खाण्याची इच्छा करणारी क्रिया बंद करतात. लठ्ठपणाच्या इंजेक्शनच्या वाढत्या मागणीमुळे गुंतवणूकदारही उत्साहित आहेत. लठ्ठपणा घटवणारी औषध बनवणारी कंपनी नोवो नाेरडिस्कचे बाजारमूल्य दोन वर्षात दुप्पट वाढून ३२५ लाख कोटी रुपये झाले आहे.
औषधांच्या सुरक्षेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. ही औषधी नवी असल्याने दीर्घकाळाचे परिणाम माहीत नाहीत. कमी डोसच्या वाणांमुळे उलट्या, जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. प्राण्यांवरील संशोधनात सेमाग्लुटाइडमुळे थायरॉइड कॅन्सर आढळून आला आहे. गर्भधारणेआधी किंवा नंतरच्या प्रभावांची जास्त माहिती नाही. अनेकांना त्यांची आयुष्यभर गरज भासू शकते. सध्या हे औषध महाग आहे. अमेरिकेत वीगॉवीच्या एका महिन्याच्या डोसचा खर्च एक लाख रुपये आहे आणि ओझेम्पिकचा ७३ हजार रुपये आहे. मोठ्या नफ्याच्या आशेने अॅमझेन, अॅस्ट्राझेनेका आणि फायझर कंपन्याही स्पर्धक औषधाच्या शोधात आहेत. दीर्घ कालावधीत औषधाच्या प्रभावांचे संशोधन व्हायला हवे. लठ्ठपणा कमी करण्याचे इतर उपाय जसे व्यायाम, सकस खानपान, सक्रियता वाढवणे याला सरकारने चालना द्यायला हवी. तरीही, लठ्ठपणाविरोधातील लढाई जिंकता येईल अशी अपेक्षा नवे औषध जागवते.
जागतिक अर्थव्यवस्थेवर ३२७ लाख कोटी रु.चा भार लठ्ठपणा लोकांचा खिसा व अर्थव्यवस्थेसाठी खूप भार आहे. तज्ज्ञांनुसार २०३५ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेवर जास्त वजनाचा वार्षिक भार ३२७ लाख कोटी रुपयांचा होऊ शकतो. हे जगाच्या जीडीपीच्या २.९% आहे. यात आरोग्यसेवांवर खर्च, आजारपणामुळे कामाचे नुकसान आणि लठ्ठपणाशी संबंधित अचानक मृत्यूंचा समावेश आहे. गेल्या वर्षी जगात लोकांनी डाएटिंग व वजन कमी करण्यावर २० लाख कोटी रुपये खर्च केले. तरीही सडपातळ होण्याच्या लढाईत यश आले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.