आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोध:फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्यांमुळेवर्षभरात अ‍ॅनिमियात 40 % घट, देशात अ‍ॅनिमिया पीडित महिलांसाठी लाभदायी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात १५ ते ४९ वयोगटातील किशोरवयीन तसेच महिला आजही अ‍ॅनिमियाने (रक्ताची कमतरता) पीडित असल्याचे आढळून येते. अशा महिलांसाठी एक चांगली बातमी आहे. काही महिने आयर्न फॉलिक अॅसिडी गोळी घेतल्यानंतर वर्षभर शरीरात रक्ताचे प्रमाण ३० ते ४० टक्के वाढल्याचे एका अभ्यासातून दिसून आले.हैदराबादच्या राष्ट्रीय पोषण संस्थेद्वारे करण्यात आलेल्या अध्ययनात ७० टक्क्यांपर्यंत रक्ताची कमतरता असलेल्या किशोरवयीन तसेच महिलांना आयर्न फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या देण्यात आल्या. त्यानंतर अशा महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी कोणतीही महिला अ‍ॅनिमिक राहिलेली नाही, असा दावा संशोधकांनी केला आहे.

१७ ते २१ या वयोगटातील महिलांचा एक गट तयार करण्यात आला. त्यात ४७० किशोरवयीन तसेच महिलांचा गट तयार करण्यात आला होता. हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ टक्क्यांहून कमी असलेल्या महिलांनाच फॉलिक अॅसिडची नियमितपणे तीन महिने गोळी देण्यात आली होती. एवढेच नव्हे नऊ महिन्यानंतर या महिलांची पुन्हा हिमोग्लोबिन तपासणी केली गेली. त्यानुसार महिलांमध्ये केवळ १० टक्के रक्ताची कमतरता दिसून आली.