आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • 50% Of Patients With High Blood Pressure Do Not Know They Have The Disease, Less Than 5 Grams Of Salt Lowers Blood Pressure By 5 Points

17 मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिन:उच्च रक्तदाबाच्या 50% रुग्णांना हा आजार झाल्याचे कळत नाही, 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ रक्तदाब 5 पॉइंट कमी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीएमआरच्या अहवालानुसार, देशातील प्रत्येक चौथा तरुण उच्च रक्तदाबाचा बळी आहे. इम्पीरियल कॉलेज लंडन आणि डब्ल्यूएचओच्या २०१९ च्या डेटावर आधारित अहवालानुसार, गेल्या ३० वर्षांत उच्च रक्तदाबाचे रुग्ण ९७% वाढले आहेत. जगभरात ३० ते ७९ वर्षे वयोगटातील उच्च रक्तदाबाने ग्रस्त लोकांची संख्या ६५ कोटींहून १२८ कोटी झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील ५०% लोकांना ते उच्च रक्तदाबाचे बळी आहेत, हेदेखील माहीत नाही. या आजाराची सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. हा आजार गंभीर स्थितीत पोहोचला की चक्कर येणे, लघवीत रक्त येणे, डोके सतत दुखणे, नाकातून रक्त येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. हृदयविकाराचा झटका हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे, त्याचे मुख्य कारण उच्च रक्तदाब आहे.

उच्च रक्तदाबाशी संबंधित सर्व काही : हृदय, मेंदू, डोळे व मूत्रपिंडांवर परिणाम करतो उच्च रक्तदाब

रक्तदाब म्हणजे काय?
रक्तवाहिन्यांचे जाळे हृदयातून शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेते. संपूर्ण शरीरात रक्त वाहून नेण्यासाठी हृदय धमन्यांवर दबाव टाकते. रक्तवाहिन्यांच्या भिंतींवरील या दाबाला रक्तदाब म्हणतात.

उच्च रक्तदाब म्हणजे काय?
हृदयाला रक्तवाहिन्यांमधून रक्त ढकलण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते तेव्हा रक्तदाब वाढतो. रक्तदाब एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असतो तेव्हा उच्च रक्तदाब होतो.

याचे प्रकार किती?
हा दोन प्रकारचा असतो. प्रायमरी आणि सेकंडरी. ९०% लोकांना आयुष्यात कधी तरी प्रायमरी उच्च रक्तदाब असतो. तो वयानुसार वाढतो. १०% पेक्षा कमी लोकांना सेकंडरी उच्च रक्तदाब होतो.

उच्च रक्तदाब का होतो?
उच्च रक्तदाब विविध वैद्यकीय परिस्थितींमुळे होऊ शकतो. मुख्यतः किडनीचे आजार, ट्यूमर, धमनीच्या समस्या किंवा हृदयाशी संबंधित आजार ही मुख्य कारणे आहेत.

डोळ्यांवर परिणाम : रेटिनाची हानी, कमी दिसणे
उच्च रक्तदाबामुळे डोळ्यातील पडद्याचे आतील अस्तर, डोळ्याच्या मागील भागाचे नुकसान होते. रेटिनाला झालेल्या या नुकसानीवरून एखाद्या व्यक्तीतील उच्च रक्तदाब ओळखता येतो. हे मार्कर म्हणून कार्य करते. यामुळे डोळ्यांच्या मज्जातंतूंना इजा होते, ज्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो.

रक्तदाब सामान्य १२०/८० उच्च रक्तदाब १४०/९०

मेंदूवर परिणाम : स्ट्रोकचा सर्वाधिक धोका
उच्च रक्तदाब हे पक्षाघाताचे प्रमुख कारण आहे. वास्तविक, उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंती कमकुवत होतात, त्यामुळे मेंदूमध्ये फुग्यासारखे ते फुगते. याला एन्युरिझम म्हणतात. उच्च रक्तदाबामुळे हे एन्युरिझम फुटतात, त्यामुळे स्ट्रोक होतो.

हृदयावर परिणाम : श्वास घेण्यात अडचण, हार्ट फेल्युअर
धमन्यांमधील प्रतिकारशक्ती वाढल्याने व रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. हृदयाचे स्नायू जाड आणि कडक होतात. याशिवाय हृदयाची डावी बाजू हळूहळू मोठी होते, त्यामुळे रक्त पंप करण्याची क्षमता कमी होते. परिणामी हार्ट फेल्युअर होते.

मूत्रपिंडांवर परिणाम : मिठाच्या व्यवस्थापनाची क्षमता कमी होते
वाढलेल्या रक्तदाबामुळे क्षारांचे नियमन करण्याच्या आणि शरीरात पाणी ठेवण्याच्या मूत्रपिंडाच्या क्षमतेवर परिणाम होतो, त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या वाढते. उच्चरक्तदाबामुळे काही वेळा किडनी खराब होऊ शकते.

असा घटवता येतो रक्तदाब - वजन जास्त असेल तर ते एक किलो कमी करून रक्तदाब एका पॉइंटने कमी करू शकता. - दररोज ३० मिनिटांच्या व्यायामाने रक्तदाब ५ ते ८ पॉइंट्सपर्यंत कमी होऊ शकतो. - दिवसभराच्या जेवणात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नका. एका छोटा चमचा मिठामध्ये २३०० ग्रॅम सोडियम असते. सोडियमचे प्रमाण कमी करून रक्तदाब ५ ते ६ पॉइंट्सनी कमी करता येतो.

ब्रेन फॉग :मेंदूशी संबंधित समस्या कमी करतात या तीन सवयी, कोरोनाकाळात वाढली समस्या
थोडक्यात सांगायचे तर ब्रेन फाॅग म्हणजे गोंधळ, गोष्टी विसरणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, अनियंत्रित विचार येणे. त्याची समस्या कोरोना संसर्गाने ग्रस्त लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, कोरोनाने गंभीरपणे ग्रस्त असलेल्या सुमारे २८ टक्के लोकांमध्ये ब्रेन फाॅग आढळला. ब्रेन फाॅग होण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु काही छोटे उपायदेखील आहेत, त्यामुळे त्याची लक्षणे झपाट्याने कमी होतात.

एक मोठा ग्लास पाणी प्या : मेंदूत ८०% पाणी असते
मेंदूमध्ये ८०% पाणी असते. अशा परिस्थितीत हायड्रेटेड राहिल्याने ब्रेन फाॅग कमी होते. एक मोठा ग्लास पाणी काही क्षणात आराम देते.

मल्टिटास्किंग टाळा : मेंदूची विचार करण्याची क्षमता धिमी
तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी करता तेव्हा मेंदूची क्षमता कमी होऊ लागते. चुका होण्याचा धोका वाढतो. गोष्टी विसरल्या जातात.

१५ मिनिटे व्यायाम करा : स्मरणशक्ती वाढते
दिवसातून १५ मिनिटे मध्यम गतीने नियमित व्यायाम केल्यास ब्रेन फाॅग कमी होते. व्यायाम मेंदूच्या हिप्पोकॅम्पस या स्मृती केंद्राला सक्रिय करतो.