आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:6-7 तासांची झोप सर्वोत्तम; कमी- जास्त झाल्यास हृदयाला धोका

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी संशोधकांच्या मते, एखाद्या प्रौढ व्यक्तीच्या स्वस्थ हृदयासाठी किमान ६ ते कमाल ७ तासांची झोप सर्वोत्तम आहे. डेट्रॉईटच्या हेन्री फोर्ड हॉस्पिटलच्या संशोधकांनी २००५ ते २०१० दरम्यान नॅशनल हेल्थ अँड न्यूट्रिशन एक्झामिनेशन सर्व्हेमध्ये भाग घेतलेल्या १४,०७९ लोकांबाबतच्या माहितीचे परीक्षण केले. जे लोक ६ तासांपेक्षा कमी आणि ७ तासांपेक्षा जास्त वेळ झोपतात,त्यांच्यात हृदयविकाराने मृत्यूचा धोका अधिक असल्याचे या सर्व्हेतून आढळले.

अमेरिकन कॉलेज ऑफ कॉर्डिअोलॉजीची एज्युकेशनल साइट कार्डियोस्मार्ट. ओआरजीच्या मुख्य संपादक तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. मार्था गुलाटी यांच्या मते, प्रदीर्घ झोपेपेक्षा झोपेची गुणवत्ता महत्त्वाची आहे.

बातम्या आणखी आहेत...