आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थलाइन:सोशल मीडियापासून 10 दिवसांचा ब्रेक, हे आहे आनंदाचे सूत्र

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थलाइन या नियतकालिकाने सोशल मीडिया वापरकर्त्यांवर केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले की, २५ टक्के लोकांना याचा वापर केल्यानंतर त्यांच्या स्वत:च्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. एक्सप्रेस व्हीपीएनने केलेल्या २०२१ च्या सर्वेक्षणात ८६ टक्के लोकांनी सांगितले की, सोशल मीडियाचा त्यांच्या आनंदावर आणि स्वतःच्या प्रतिमेवर थेट नकारात्मक परिणाम होतो. मनोरंजनासाठी आणि एकाकीपणावर मात करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या लोकांच्या मानसिक आरोग्यावर याचा वाईट परिणाम झाल्याचे दुसऱ्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यांच्यात नकारात्मकता वाढली.

स्वत:ला ऑफलाइन करा : सहज सोशल व्हाल
हेल्थलाइन आणि सायकी सेंट्रलने सोशल मीडियाच्या दुष्परिणामांबद्दल जाणून घेण्यासाठी १० दिवसांचा ब्रेक प्रोग्राम चालवला. ज्यांनी ब्रेक घेतला त्यांना कमी नकारात्मकतेसह आनंदाची भावना वाढली. इतकेच नव्हे, तर त्यांच्यात समाजात मिसळण्याची प्रवृत्तीही वाढली.

ऑफलाइन राहू शकत नसल्यास : नकारात्मक खाती हटवा
सोशल मीडियाची नकारात्मकता कमी करण्यासाठी नकारात्मक परिणाम करणारे अकाउंट अनफॉलो करा. याशिवाय नकारात्मक ट्रोलिंग, स्पॅम हटवा. स्वतःची तुलना करणारे फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका.
३० मिनिटे संगीत ऐका, हृदय तंदुरुस्त

बातम्या आणखी आहेत...