आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य:काम करताना दर 40 मिनिटांनी 30 सेकंदांचा ब्रेक आणि या 3 स्ट्रेच एक्सरसाइज तुम्हाला ठेवतील फिट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 75% भारतीयांना स्नायूसंबंधी समस्या येत आहेत

ए.सी शिल्टॉन

कोविड-१९ संसर्गाच्या या काळात कार्यालयांमध्ये काम करणारे अनेक लोक सध्या घरून काम करत आहेत. एका अभ्यासानुसार, घरोघरी संगणकावरून काम केल्यामुळे ७५ टक्के भारतीय ऑफिस वर्कर्सना स्नायू आणि हाडांशी संबंधित समस्या येत आहेत. नॉर्थ वेस्टर्न मेडिसिन सेंट्रल ड्युपेज हॉस्पिटलमधील प्रमुख ऑक्युपेशनल थेरपिस्ट जोए बगोंज यांच्या म्हणण्यानुसार, या ३ स्ट्रेचचा हा सेट दिवसातून ३ वेळा केला तर घरून संगणकावर काम करणाऱ्या लोकांना मनगट, पाठ, मान व हातांतील वेदना टाळता येतात.

वेदना का होतात?
तुम्ही दीर्घ काळ उभे राहता किंवा त्याच स्थितीत असता तेव्हा गुरुत्वाकर्षणाची शक्ती आपल्या पाठीच्या मणक्यावर दबाव आणते. मणक्यावरील हा दबाव पाठदुखी व मज्जातंतूशी संबंधित समस्येच्या रूपात समोर येतो. गुरुत्व मेरुदंडाच्या हाडांवर दबाव आणते. हा दबाव डिस्कमध्ये आढळणारा द्रव बाहेर खेचतो. दर ४० मिनिटांनी तुम्ही २० ते ३० सेकंदांचा ब्रेक घेतला तर द्रव त्याच्या मूळ स्थितीत पोहोचतो.

युटिलिटी : दिवसातून तीन वेळा स्ट्रेचिंगचे हे ३ सेट करावेत

खांद्यांचा व्यायाम
-सरळ उभे राहा. आता हळूहळू खांदे वर कानाजवळ घेऊन जा.
- तीन ते पाच सेकंद याच स्थितीत राहा. मग हळूहळू आपले खांदे पुन्हा खाली मूळ स्थितीत आणा.
- या प्रक्रियेची तीन ते पाच वेळा पुनरावृत्ती करा.

पाठ आणि छातीचे स्ट्रेचिंग
- दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवून हात डोक्याच्या मागे घेऊन जा.
- आता हात अशा प्रकारे मागे वळवा की दोन्ही खांदे एकमेकांना भिडतील. खांद्यावर दबाव टाकत ५ ते ६ सेकंद थांबा.
- दीर्घ श्वास घेऊन खांदे ढिले सोडा.
- याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करा. डॉ. नॅन्सी ब्लॅक म्हणतात की, कामाशी संबंधित ही दुखापत लगेच प्रभाव दाखवत नाही, परंतु दीर्घ काळ या स्थितीत राहिल्यास समस्या वाढू शकते.

मनगटाच्या हालचाली
- उभे राहून एक हात सरळ करा. तळहात खालच्या दिशेने ठेवा.
- आता दुसऱ्या हाताने पहिल्या हाताची बोटे पकडून मागे न्या. स्ट्रेच जाणवेपर्यंत वळवत राहा.
- थोडा वेळ याच स्थितीत राहा. हात पुन्हा मूळ स्थितीत सरळ सोडून द्या.
- आता पहिला हात सरळ ठेवत दुसऱ्या हातान बोटे आणि पंजा खाली ओढा. असेच दुसऱ्या हातानेही करा.