आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओरल कॅन्सर जागरूकता महिना:लठ्ठपणा व संसर्गामुळेही तोंडाच्या कॅन्सरचा धोका, आवाजातील बदल हाही याचा संकेत

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दरवर्षी ५०% पीडितांचा होतो मृत्यू

तोंडाचा कर्करोग हा देशातील पुरुषांमधील सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. देशात दरवर्षी तोंडाच्या कर्करोगाचे सुमारे एक लाख नवीन रुग्ण आढळतात. तोंडाच्या कर्करोगाची सर्वात सामान्य कारणे तंबाखू आणि अल्कोहोल असली, तरी याशिवाय इतर अनेक घटक तोंडाच्या कर्करोगासाठी जबाबदार मानले जातात. तोंडाच्या आत पांढरे किंवा लाल चट्टे, दात अचानक पडणे, आवाजात अचानक बदल, खाणे किंवा गिळण्यास त्रास होणे, घशाच्या मागच्या भागात दुखणे जे कानापर्यंत जाणवते, मानेवर सूज येणे आणि चेहऱ्यावर सूज येणे ही काही याची सामान्य लक्षणे आहेत. तोंडाच्या कर्करोगाच्या बाबतीत चिंतेची बाब म्हणजे त्यातील निम्म्या रुग्णांचा मृत्यू होतो. याचे मुख्य कारण म्हणजे ६० ते ७० टक्के प्रकरणांमध्ये कर्करोग प्रगत अवस्थेत आढळून येतो. एप्रिल महिना ओरल कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो.

तंबाखूशिवाय ही पाच कारणेही यासाठी कारणीभूत १) अधिक वजन वास्तविक, अधिक वजनामुळे पेशी आणि रक्तवाहिन्यांची अतिरिक्त वाढ सुरू होते. याशिवाय विशिष्ट प्रकारच्या हार्मोन्सचा धोकाही वाढतो. प्रतिबंध : नाष्ट्यात जास्त प्रथिने घ्या, कारण प्रथिनांची पचनाची प्रक्रिया मंद असते. ते भूक वाढवणारे हार्मोन्सही कमी करतात. याशिवाय स्वतःला सक्रिय ठेवा. आठवड्यातून एकदा वजन तपासा, ते तुम्हाला वजन कमी करण्यास प्रवृत्त करते.

२) एचपीव्ही संसर्ग ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) शरीराच्या विविध भागांत पॅपिलोमास (गाठ किंवा मस) निर्माण करतात. एचपीव्ही-१६ हा मुख्य प्रकार आहे. प्रतिबंध : ११ ते १२ वयोगटातील सर्व किशोरवयीन मुलांनी लसीकरण केले पाहिजे. लसीकरण केले नसेल तर वयाच्या ४९ वर्षापर्यंतही ते करू शकता. ३) यूव्ही रेडिएशन सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्याने अतिनील किरणांमुळे पेशींचे नुकसान होते. त्वचा या खराब पेशींचे डीएनए बदलते. त्यामुळे कर्करोग वाढतो. प्रतिबंध : सनस्क्रीन वापरा. जास्त वेळ उन्हात राहणे टाळा. ४) पोषणाची कमतरता अन्नातील पोषणाच्या कमतरतेमुळे कर्करोगापासून संरक्षण करणारी विशेष खनिजे शरीरात कमी होतात. त्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. प्रतिबंध : रोजच्या आहारात ५ प्रकारची फळे व भाज्यांचा समावेश करा. पुरेशा प्रमाणात फायबर, डेअरी आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. ५) माउथवॉश जास्त अल्कोहोलयुक्त माउथवॉश तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढवते. यामध्ये आढळणारे अल्कोहोल घशाच्या कर्करोगासाठी जबाबदार आहे. प्रतिबंध : माउथवॉश टाळा, विशेषतः स्प्रेचे. त्याऐवजी बडीशेप किंवा तत्सम पदार्थ वापरावेत.