आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस:कुटुंबात कॅन्सरसारखा आजार तर सर्वसमावेशक योजना योग्य

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कॅन्सरचे प्रकार, स्टेज, रुग्णांचे वय मिळुन खर्चावर ५० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येऊ शकतो. यावर आरोग्य विमा योजना हा एक उपाय आहे, परंतु अशा सर्व पॉलिसींमध्ये कर्करोगाच्या उपचारांचा समावेश होत नाही. हे टाळण्यासाठी नेहमी सर्वसमावेशक आरोग्य योजना घ्यावी.

कर्करोगासाठी विमा निवडताना तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात

1. गंभीर आजारासाठी विमा घेण्याआधी बेसिक गोष्टी पाहा विशिष्ट प्रकारचे कर्करोग गंभीर आजार योजनेत येत नाहीत. याआधी, स्वतःला मूलभूत किंवा सर्वसमावेशक आरोग्य विमा योजनेसह संरक्षित करा. सर्वसमावेशक योजना पुरेसे आरोग्य कव्हरेज देते. कुटुंबात कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा इतिहास असल्यास, एक पर्याय म्हणून गंभीर आजार योजना घेऊ शकता.

2. प्रीमियम सूटसारखे फायदे घेताना कव्हरेज तपासा काही आरोग्य विमा योजना एका वर्षासाठी प्रीमियम सूट देतात. कर्करोगाचे कोणते प्रकार आणि टप्पे समाविष्ट असतात ते पाहा. लक्षात ठेवा की, काही कर्करोगांना फक्त एक उपचार आवश्यक असतो. परंतु बहुतेकांना केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि रेडिएशन थेरपीची आवश्यकता असते. या सर्व गोष्टी विम्यामध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत.

3. नेहमी जास्त विमा रकमेची निवड करा कर्करोगाचा उपचार हा सर्वात महागड्या उपचारांपैकी एक असल्याने, केमोथेरपी आणि प्रत्यारोपण यांसारख्या महागड्या उपचारांसाठी जास्त विम्याची निवड करणे शहाणपणाचे आहे. अशी पावले उचलल्याने विमाधारकाला सर्वोत्तम उपचार मिळतील याची खात्री होईल. आशिष यादव, हेड ऑफ प्रॉडक्ट्स, मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स

बातम्या आणखी आहेत...