आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनासाठी कसरत:चांगल्या मूडसाठी ‘जॉय’ कसरत, या 5 स्टेप्स केल्यास आनंदी वाटेल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण जगासाठी नैराश्य ही एक मोठी समस्या झाली आहे. डब्ल्यूएचओच्या मते, भारतातील २० कोटींहून अधिक लोक नैराश्य आणि संबंधित आजारांनी ग्रस्त आहेत. सतत उदास किंवा हताश राहिल्यानेही व्यक्ती नैराश्याला बळी पडू शकते. अशा स्थितीत मन प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे. व्यायामामुळे माणसाचा मूड सुधारतो. संशोधकांनी याला फील बेटर इफेक्ट असे नाव दिले आहे. मानसशास्त्रज्ञ केली मॅकगोनिगल यांनी साडेआठ मिनिटांच्या वर्कआउटचे सूत्र तयार केले आहे. यामुळे व्यक्तीचे मन शांत आणि आनंदी राहते, असा त्यांचा दावा आहे.

जॉय वर्कआउट- शरीराच्या या पाच हालचालींनी आपला मूड उत्साही करा रीच : पहिली हालचाल म्हणजे रीच, त्याला रीचिंग फॉर द स्काय असेही म्हणतात. हे करण्यासाठी आपला एक हात वर करा. दुसरीकडे शरीर ताणण्याचा प्रयत्न करा. त्याच वेळी आपले तळवे उघडा आणि नंतर ते वरच्या दिशेने न्या. असे केल्याने बरे वाटले तर गुडघ्याच्या साहाय्याने शरीर खाली ढकलून परत वर आणावे.

स्वे : प्रथम आपले खांदे हळूहळू हलवा. त्याचप्रमाणे हात आणि नितंबदेखील हलवा. तुम्हाला असे करण्यात अडचण येत असेल तर शरीराला मागेही फिरवू शकता.

शेक : सर्वप्रथम आपले हात एक-एक करून हलवा, दोन्ही हात एकत्र हलवा. लाथ मारतात तसे. यानंतर शरीराचा कोणताही भाग हलवा.

बाउन्स : संगीताच्या तालावर खांदा वर आणि खाली उचलण्यास सुरुवात करा. मग पाय हलवताना टाच वर उचला. यानंतर उडी मारताना दोरीवरील उडी मारल्याप्रमाणे हात हलवा.

सेलिब्रेट : हात छातीजवळ आणा, सेलिब्रेशनच्या वेळी ते हवेत फेका, प्रत्येक थ्रो अपनंतर टाचांनी आपले शरीर उचलण्याचा प्रयत्न करा.

बातम्या आणखी आहेत...