आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाश्त्यात ब्रेड-बटर खात असाल तर सावधान:अ‍ॅसिडीटी- लठ्ठपणाचा होऊ शकतो त्रास; पोट खराब होण्याची शक्यता, मधुमेह-हृदयविकाराचा वाढू शकतो धोका

14 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

व्यस्त जीवनशैलीमुळे ब्रेकफास्टमध्ये पराठ्याची जागा ब्रेड-बटरने घेतली आहे. बहुतेक नोकरदार लोकांना हा नाश्ता प्रचंड आवडतो. परंतु असा नाश्ता केल्यास त्याच्या परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. तसेच ब्रेडचा हा नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. यामुळे तुमचे शरीर अनेक आजारांना बळी पडू शकतात. वास्तविक ब्रेड हा मैदापासून बनवला जातो. यामुळे ब्रेडचेसेवन केल्याने तुमच्या शरीराचे नुकसान होऊ शकते. ब्रेडमध्ये असलेले पोटॅशियम हे विषारी असते. वारंवार ब्रेड-बटर नाश्ता केल्याने मोठ्या आजारांचा धोका अधिक होऊ शकतो. आहारतज्ज्ञ स्वाती विश्नोई सांगितात की, अधिक प्रमाणात ब्रेड-बटर खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होऊ शकतात.

व्हाईट ब्रेड खाण्याचे तोटे

अ‍ॅसिडीटी- स्वाती म्हणते की व्हाईट ब्रेडमध्ये कोंडा नसतो. यामध्ये फायबरचे प्रमाण नगण्य असते, जे खायला हळूहळू पचवण्याचे काम करते. यामुळेच ब्रेडचे रोज सेवन केल्यास अॅसिडीटीचे प्रमाण वाढू शकते.

लठ्ठपणा-

रिसर्चनुसार, ज्या लोकांना वजन कमी करायचे असेल त्यांनी व्हाईट ब्रेडचे सेवन करणे टाळायला हवे. सतत ब्रेड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते आणि कमी देखील होते. जेव्हा शरिरीतील रक्ताची साखळी वाढते, तेव्हा त्या व्यक्तीला जास्त भूक लागते. जास्त भूक लागल्याने त्याच्या वाढ होते. व यामुळे तो लठ्ठ होऊ शकतो.

पोट खराब होणे -

रोज ब्रेड खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. व्हाईट ब्रेड हा उच्च स्टार्च उत्पादन आहे. ब्राऊन ब्रेडसारखेच त्यात फायबर नसते. याशिवाय व्हाईट ब्रेडमध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोटीशी संबंधित आजार हे वाढू शकतात. यामुळे पोटदुखी, जुलाब, उलट्या अशा समस्या उद्भवू शकतात.

मधुमेह -

ब्रेड बनवण्याच्या प्रक्रियेत सर्व पोषण आणि जीवनसत्त्वे गमावतात. यानंतर आत जर काही उरले तर ती साखर आहे, हा गोडवाही शरीरात जमा होऊन मधुमेह होण्याचे कारण बनते. ज्या लोकांच्या कौटुंबिक इतिहासात आधीच मधुमेह आहे त्यांच्यासाठी हे धोकादायक आहे.

ब्रेड बनवण्याच्या प्रक्रियेत सर्व न्यूट्रिशन आणि व्हिटॅमिन निघून जातात. याच्यानंतर ब्रेड मध्ये काही राहीले तर ती फक्त साखर असते. हीच साखर शरिरात राहिल्याने मधूमह होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. हे त्या लोकांसाठी जास्त हानिकारक असू शकते, ज्यांच्या कुटुंबात आधीपासून कोणाला मधुमेहाचा त्रास आहे.

हृदयरोग-

व्हाईट ब्रेड हे परिष्कृत उत्पादन आहे जे शरीर योग्यरित्या खंडित करू शकत नाही. जर ते जास्त काळ सेवन केले तर रक्त गोठण्यास कारणीभूत ठरू शकते. अनेक वेळा दीर्घकाळ सेवन केल्यावर अनेक हृदयविकारांचे आजार होऊ शकतात.

सकाळी ब्रेड खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. ब्रेडमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रक्तदाब आणि हृदयाच्या रुग्णांसाठी ती चांगले नसते.
सकाळी ब्रेड खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. ब्रेडमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रक्तदाब आणि हृदयाच्या रुग्णांसाठी ती चांगले नसते.

ब्राऊन की व्हाईट ब्रेड?

नाश्त्यासाठी ब्रेड हा स्वस्त आणि चांगला पर्याय आहे. कधी बटरसोबत, कधी रोल म्हणून तर कधी सँडविच म्हणून अनेक प्रकारे खाता येतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? ब्रेड आरोग्यासाठी चांगला आहे की नाही? ते खाण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत. ब्राउन आणि व्हाईट ब्रेडबद्दल अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो.

व्हाईट ब्रेड :

मैद्यापासून तयार केलेला व्हाईट ब्रेड बनवण्याच्या प्रक्रियेत, गव्हाचा आणि वरचा कोपरा काढून टाकल्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य खूप कमी होते. यामुळे फायबर आणि इतर पोषण कमी होऊन जातात. यामध्ये फक्त स्टार्च भाग राहतो. जर तुम्हाला ब्रेड खायचा असेल तर त्यासोबत अंडी, चीज, हिरव्या भाज्या, एवोकॅडो खा. यामुळे ब्रेक फास्टचे पौष्टिक मूल्य वाढते. सकाळी ब्रेड खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. यामुळे वजन वाढू शकते. ब्रेडमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रक्तदाब आणि हृदयाच्या रुग्णांसाठी ते चांगले नसते.

ब्राऊन ब्रेड:

लोक सहसा पीठाचा ब्रेड म्हणून ब्राऊन ब्रेड खरेदी करतात. परंतु ब्राऊन ब्रेड हा मैदापासून तयार केला जातो. अनेक कंपन्या हा ब्रेड बनवताना रंग टाकतात. ज्याच्यामुळे त्याला रंग हा ब्राऊन होतो. सर्वात आधी हे जाणून घ्या की, ब्राऊन ब्रेडचा रंग जो पोळीच्या रंगापेक्षा अधिक असेल तर त्यामध्ये हा रंग मिक्स केला जातो. साधारणपणे, पौष्टिकतेच्या बाबतीत व्हाईट ब्रेड चांगला नाही. त्यामुळे ब्रेड खरेदी करताना त्यात समाविष्ट असलेले घटक नीट वाचले पाहिजेत. तसेच, जर तुम्हाला ब्रेड खूप आवडत असेल तर व्हाईट ब्रेड व्यतिरिक्त, तुम्ही ब्राऊन ब्रेड, ग्रेन ब्रेड, होल व्हीट ब्रेड, ब्रेड विथ फ्लेक्स सीड्स अशा अनेक प्रकारचे ब्रेड खाऊ शकतात. रोजच्या ब्रेड ब्रेकफास्ट ऐवजी रोज वेगळा आणि आरोग्यदायी नाश्ता घ्या.

होल ग्रेन ब्रेड:

हे संपूर्ण गव्हापासून बनवले जाते, ज्यामध्ये कोंडा देखील असतो. यामध्ये असलेले फायबरचे अधिक प्रमाण वजन नियंत्रणात आणण्यात मदत करते. यामुळे शरिराची पचनक्रिया चांगली राहते. यामध्ये व्हिटॅमिन बी-ई, फॉस्फरस, आयरन आणि जिंक असते. जे मानसिक आरोग्यासाठी अधिक चांगले आहे.

मल्टीग्रेन ब्रेड:

मल्टीग्रेन ब्रेडमध्ये ओट्स, बार्ली, गहू, ज्वारी, फ्लेक्ससीड आणि इतर अनेक धान्ये असतात. यामध्ये भरपूर पोषक आणि फायबर असतात. जर तुम्हाला ब्रेड खाण्याची आवड असेल तर संपूर्ण होल ग्रेन ब्रेड आणि मल्टीग्रेन ब्रेड हे उत्तम पर्याय आहेत.

वजन वाढणे
व्हाईट ब्रेड अधिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. सर्व ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यात मीठ आणि अनेक संरक्षक देखील असतात. जास्त ब्रेड खाणे म्हणजे जास्त कॅलरीज वापरणे, म्हणून ती मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

पौष्टिक कमतरता

ब्रेड खाल्ल्याने तुम्ही इतर पदार्थांचे सेवन कमी करता, ज्यामुळे शरीराला पुरेसे पोषक तत्व मिळत नाहीत.

ऍलर्जी प्रतिक्रिया

ज्या लोकांना गहू किंवा ग्लूटेनची ऍलर्जी आहे त्यांना ब्रेड खाल्ल्यानंतर पोटात दुखणे, पोट फुगणे आणि गॅसची समस्या यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

या गोष्टी ठेवा लक्षात

 • ब्रेड थंड आणि कोरड्या जागी ठेवा.
 • सुर्याच्या पडलेल्या किरणांमध्ये ठेऊ नका
 • ब्रेड रूम टमप्रेचरवर ठेवा.
 • ब्रेडमध्ये वापरलेल्या घटकांसह एक्सपायरी डेट तपासा.
ब्रेड खाणाऱ्यांचा लठ्ठपणाचा धोका 40% वाढतो.
ब्रेड खाणाऱ्यांचा लठ्ठपणाचा धोका 40% वाढतो.

ब्रेड खाण्याचा योग्य मार्ग

 • ब्रेडमध्ये यीस्ट असते, जे व्हिटॅमिन-बी12 आणि प्रोबायोटिक्स देते. नाश्त्यात ब्रेडचे सेवन कमी करा
 • भाजीबरोबर भाकरी खा, त्यामुळे शरीरात हळूहळू साखर तयार होईल.
 • ब्रेडमध्ये कॅलरीज जास्त असतात आणि त्यासोबत चीज स्प्रेड, जॅम किंवा बटरचा वापर केल्याने कॅलरीजची संख्या आणखी वाढते.
 • ब्रेड टोस्ट केल्यानंतर त्यामध्ये मध आणि काळी मिरी पावडर टाकून खाणे देखील उत्तम आहे.
 • जर तुम्हाला बटर आणि जाम लावून ब्रेड खायला आवडत असेल तर ते कमी प्रमाणात वापरा.
 • तुम्ही पीनट बटरसोबत टोस्ट ब्रेड खाऊ शकता, त्यामुळे कार्बोहायड्रेट्ससोबत प्रोटीनही मिळेल.

अभ्यासानुसार

युरोपियन काँग्रेस ऑन ओबेसिटीच्या एका पेपरनुसार, जे लोक दिवसातून दोनपेक्षा जास्त व्हाईट ब्रेडचे स्लाईस खातात त्यांना लठ्ठपणाचा धोका 40% वाढतो. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका रिसर्चनुसार, व्हाईट ब्रेड खाल्ल्याने टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. आपण कोणते आणि किती ब्रेड खातो यावर ब्रेडचा शरिरावर होणारा परिणाम अवलंबून असतो.

बातम्या आणखी आहेत...