आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावर गाजलेल्या 'आभाळमाया' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते पराग बेडेकर यांची हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच प्राणज्योत मालवली. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पराग यांनी मराठी रंगभूमी, नाटक आणि मालिका अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.
खरं तर हृदयविकार हा जरी वृद्धांसाठी धोका मानला जात असला तरी आता तरुणही हृदयविकाराच्या विळख्यात सापडत आहेत. डब्ल्यूएचओ आणि अमेरिकन जर्नलच्या अभ्यासानुसार, 30 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हृदयाच्या समस्यांमध्ये 13 टक्के वाढ झाली आहे. तर हृदयविकार हे जगातील आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. दुसरीकडे भारतातही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन दशकांत भारतात हृदयविकाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट झाले आहे.
प्रसिद्ध डॉक्टर रमाकांत पांडा म्हणतात की, 1990 च्या दशकात भारतातील एकूण मृत्यूंपैकी 14-15% मृत्यूंचे कारण हृदयरोग होते, जे आता जवळजवळ दुप्पट होऊन 25% झाले आहे. जाणून घेऊया हृदयविकाराच्या सुरुवातीला दिसणारी लक्षणे. तसेच हृदयविकाराचा धोका टाळू शकणारे महत्त्वाचे उपाय...
जाणून घ्या हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे-
पहिले लक्षण - छातीत दुखणे
हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात मोठे लक्षण आहे एन्झायमा म्हणजेच छातीत दुखणे. छातीच्या डाव्या बाजूला दुखणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे प्रारंभिक लक्षण असू शकते. जर तुम्हाला छातीत दुखत असेल तर ते हलक्यात घेऊ नका.
दुसरे लक्षण- विनाकारण घाम येणे
जर तुम्हाला व्यायाम किंवा वर्कआऊट किंवा काहीही न करता घाम येत असेल आणि घबराट होत असेल तर सावध व्हा. तुमचे हृदय योग्यरित्या रक्त पंप करत नसल्यामुळे असे होऊ शकते. जास्त घाम येणे ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
तिसरे लक्षण - श्वास घेण्यात अडचण
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी सर्वात सामान्य समस्या म्हणजे श्वास घेण्यात अडचण. याला बेल्ट अराऊंड चेस्ट किंवा वेट ऑन चेस्ट असेही म्हणतात. तुम्हालाही छातीवर दबाव किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. अशा समस्येच्या बाबतीत, तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
चौथे लक्षण - उलटी किंवा चक्कर येणे
उलटी होत असतील किंवा चक्कर येत असेल तर अनेक वेळा आपण ते गांभीर्याने घेत नाही. परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे देखील महागात पडू शकते. कारण हे कमी रक्तदाबामुळेही होऊ शकते, जे हृदयविकाराचे लक्षण आहे.
पाचवे लक्षण- पाय सुजणे
पायांना सूज येणे ही देखील एक सामान्य गोष्ट आहे, परंतु याचे कारण हृदयामध्ये रक्ताभिसरण कमी होणे हे देखील असू शकते. जर तुमचे पाय सुजले असतील तर ते हृदयाच्या समस्येचे लक्षण असू शकते. ते गांभीर्याने घेणे अत्यंत आवश्यक आहे.
सहावे लक्षण - मान आणि जबडा दुखणे
स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे मुख्य लक्षण म्हणजे मान किंवा जबडा दुखणे. जबड्याजवळ असलेल्या नसा हृदयातून बाहेर पडतात. ही वेदना थोड्या-थोड्या वेळाने होते. महिलांनी अशा समस्यांकडे दुर्लक्ष करू नये.
सातवे लक्षण - वारंवार घोरणे
खरे तर आपण घोरणे ही फार मोठी समस्या मानत नाही. पण घोरणे हे देखील हृदयविकाराचे लक्षण आहे. झोपताना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यास व्यक्ती घोरतो. त्यामुळे, जास्त घोरणे देखील तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
हे झाले लक्षणांबद्दल. आता आम्ही तुम्हाला त्या गोष्टी सांगू ज्यामुळे तुमचे हृदय सुरक्षित राहील.
हृदयरोग टाळण्यासाठी, हे करा:
हृदयविकार टाळण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे, वयाच्या 20 व्या वर्षानंतर जर तुमचे वजन 10 किलोंपेक्षा जास्त वाढू लागले तर हृदयाचा धोका वाढणे जवळपास निश्चित आहे. म्हणूनच नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. याशिवाय आहारात फळांचा समावेश करायला विसरू नका. त्याचबरोबर प्रत्येकाने सात तासांची झोप घेतली पाहिजे. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
जर तुम्हाला हृदयविकार असेल तर हे करा:
ज्यांना आधीच हृदयविकार आहे त्यांनी नियमितपणे कोलेस्ट्रॉल, फास्टिंग ग्लुकोज, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, इन्सुलिनची पातळी, कोरोनरी कॅल्शियम स्कोअर, रक्तदाब या तपासण्या कराव्या. तसेच तणावपूर्ण वातावरणापासून दूर राहा. शांत ठिकाणी वेळ घालवा. जेवण एकाच वेळी खाण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाने खा. यामुळे हृदयासाठीचा धोका कमी होतो.
हृदयविकाराचा झटका आल्यास, हे करा:
आपत्कालीन परिस्थितीत, सर्वात प्रभावी उपाय म्हणजे सीपीआर. हृदयविकाराच्या झटक्याने कोणी बेशुद्ध झाल्यास अशा वेळी रुग्णाला सीपीआर द्यावा. यासाठी आपले दोन्ही हात रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी ठेवून, जोरात आणि वेगाने दाबावे लागतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अॅस्पिरिन घेणे टाळावे. ते प्राणघातक देखील ठरू शकते. कारण कधीकधी लोक अॅसिडिटीला ह्रदयविकाराचा झटका समजून अॅस्पिरिन घेतात, त्यामुळे पोटात रक्तस्त्राव होऊ शकतो.
छोट्या पडद्यावर गाजलेल्या 'आभाळमाया' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते पराग बेडेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि मुलगी आहे. पराग यांनी मराठी रंगभूमी, नाटक आणि मालिका अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.