आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा1. एक मिनिट धावणे
तुम्ही दररोज एक मिनिट धावलात तर तुमची हाडे चार टक्क्यांपेक्षा अधिक बळकट होतील. ऑस्ट्रेिलयातील लिसेस्टर विद्यापीठाच्या अहवालानुसार, ६० ते १२० सेकंदांपर्यंत धावणाऱ्या महिलांच्या हाडांची घनता उत्तम राहते.
2. एक मिनिट दीर्घ श्वास घ्या
काम करताना तणाव असणे सामान्य बाब आहे. त्यामुळे तणाव असेल किंवा एकाग्रतेचा अभाव जाणवत असेल तर एक मिनिट दीर्घ श्वास घ्या व सोडा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे हृदयाचे ठोके संतुलित राहतील. तणावही दूर होईल.
3. एका मिनिटासाठी योगा
प्रत्येक तासाला कमीत कमी एकदा, एका मिनिटासाठी योगा करा. थोडे स्ट्रेच करा किंवा आपली आवडती गाणी ऐका. यामुळे मेंदू आणि शरीर दोन्ही रिसेट होतील. तुम्हाला अधिक ऊर्जा आल्याची अनुभूती यायला लागेल.
4. जेवताना एक मिनिटाचा ब्रेक
जेवण करताना मध्येच एक मिनिटाचा ब्रेक घेण्याची सवय लावा. यामुळे तुम्हाला जेवणाची आणखी किती गरज आहे, याची जाणीव होईल. तसेच यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. सोबतच अतिजेवणही टाळता येईल.
5. एक मिनिटाची फिटनेस टेस्ट
रोज फिटनेस तपासा. हात नसलेल्या खुर्चीवर बसा. नंतर दहा वेळा लवकरात लवकर उठा व बसा. यासाठी २६ सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला तर आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हे २६ सेकंदांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करा.
6. एका मिनिटात २५ स्क्वाट्स
व्यायामासाठी वेळ नसेल तर रोज एका मिनिटात २५ स्क्वाट्स (जोरबैठका) करण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीर संतुलित राहते. याचा थेट परिणाम शरीराच्या गाभ्यावर होतो. हात, पाय, छातीसह शरीराचा प्रत्येक अवयव बळकट होतो.
7. एक मिनिट दोरीवरून उड्या
सिडनी विद्यापीठाच्या एका संशोधनानुसार, रोज एक मिनिट दोरीवरून उड्या माराव्यात. तसेच पोहणे, वेगाने पायऱ्या चढणे-उतरणे आदी व्यायामही फायदेशीर आहेत. यामुळे कर्करोग व हृदयविकाराचा धोका कमी होतो.
8. एक मिनिट डोळ्यांना आराम लागोपाठ संगणकावर काम केल्याने डोळ्यांत तणाव व डोकेदुखी होते. याला ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ म्हणतात. बचावासाठी दर अर्ध्या तासात स्क्रीनपासून २० सेकंद नजर हटवा आणि २० फूट दूर एखाद्या वस्तूकडे २० सेकंद पाहा.
9. एका मिनिटात एक ग्लास पाणी
नेहमी लोक घाईघाईत किंवा उभ्याने पाणी पितात. मात्र, यामुळे नसा ताणतात आणि मूत्रपिंड व मूत्राशयावरही ताण पडतो. अपचनाची समस्याही होते. त्यामुळे खाली बसून, एक मिनिट वेळ काढून आरामात पाणी प्यावे.
10. झोपताना १ मिनिट व्यवस्थापन
झोपण्यापूर्वी एक मिनिटाचा वेळ काढून कोणतेही काम अवश्य करा. जसे की, आपले अंथरूण व्यवस्थित करा. अंथरुणाजवळील टेबल व्यवस्थित करा. संशोधनानुसार, एक मिनिटाचे हे व्यवस्थापन तुमच्या झोपेसाठी फायद्याचे आहे.
सौरभ बोथरा
वेलनेस एक्स्पर्ट, टेडएक्स स्पीकर
तथा आयआयटी पदवीधर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.