आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सपर्ट Q&A:वयाच्या विशीनंतर महिलांनी सेल्फ ब्रेस्ट टेस्ट केली पाहिजे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

Q. माझी आई ४२ वर्षांची आहे, तिच्या स्तनात सतत वेदना होतात आणि तिला छोट्या-छोट्या गाठीही जाणवत आहेत, डॉक्टरांनी चेकअपदेखील केले आहे, काय करावे? A. वयाच्या ४२ व्या वर्षी स्तनामध्ये गाठी असल्यास रुग्णांनी डॉक्टरांना दाखवावे. याव्यतिरिक्त रुग्णाने मॅमोग्राम करावा आणि स्तन तज्ज्ञांना भेटले पाहिजे, कारण अशी लक्षणे लक्षणे असलेल्या रुग्णांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, असे काही अध्ययनांत आढळले आहे.

Q. स्तनातील कोणतीही गाठ वा वेदना कर्करोग होऊ शकते का? शासकीय रुग्णालयात तपासणी व उपचार मोफत उपलब्ध आहेत का? A. स्त्रियांमध्ये स्तनात वेदना हे कायमस्वरूपी नसते. अनियमित वेदना असल्यास काळजी करण्याची गरज नाही, परंतु रुग्णाला वेदनांसोबत गाठी जाणवत असतील तर डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. टियर २ आणि खेड्यांतील रुग्णांनी डॉक्टरांकडे जावे, तेथे पहिली चाचणी अल्ट्रासाऊंड ही करावी. सरकारी रुग्णालयांमध्ये ती उपलब्ध आहे. गाठ कर्करोगाची आहे की नाही, हे समजण्यास अल्ट्रासाऊंड मदत करेल.

Q. पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो का, एखाद्या पुरुषाच्या स्तनात गाठ असेल तर ते स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? A. स्तनाचा कर्करोग पुरुषांनाही होऊ शकतो. पुरुषांमध्ये स्त्रियांप्रमाणेच लक्षणे असू शकतात. याची सुरुवात स्तनाग्र किंवा स्तनाग्राच्या त्वचेचा बदललेला रंग किंवा अंडरआर्ममध्ये गाठ यापासून होते, हे पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी प्रारंभिक लक्षण आहे. फरक एवढाच आहे की, पुरुषांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता खूपच कमी असते.

Q. ब्रेस्ट अल्ट्रासाऊंड किंवा मॅमोग्राफी यामधील कोणते सुरक्षित आहे? A. कोणतीही चाचणी निर्दोष नाही. कर्करोग शोधण्यासाठी मॅमोग्राफीची अचूकता ८० ते ९०% आहे. १० ते १५% स्तनाचा कर्करोग मॅमोग्रामवर चुकू शकतो. मॅमोग्राफी आणि अल्ट्रासाऊंड एकमेकांपासून वेगळे केले जाऊ नयेत आणि दोन्ही चाचण्या बहुतांश वेळा कर्करोग शोधू शकत नाहीत.

डॉ. रमेश सरिन सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, अपोलो हाॅस्पिटल दिल्ली

बातम्या आणखी आहेत...