आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अल्झायमर:देशात 40 लाख लोक पीडित, 50 टक्के लोकांना मिळत नाहीत योग्य उपचार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 सप्टेंबरला जागतिक अल्झायमर्स डे

लंडनच्या अल्झायमर्स डिसीज इंटरनॅशनलच्या २०१९ च्या अहवालानुसार २०५० पर्यंत जगभरात डिमेन्शियाने पीडित लोकांची संख्या १५.२ कोटींहून अधिक होईल. डिमेन्शिया हा अल्झायमर रोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने अल्झायमरद्वारे १५५ देशांमधील सुमारे ७०,०० लोकांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणानुसार, डिमेन्शियाच्या ५०% पीडितांना योग्य उपचार मिळत नाहीत.

१. काय आहे अल्झायमर?
मेंदूच्या नसा नष्ट होतात

अल्झायमर हा आजार मेंदूच्या मज्जातंतू पेशी नष्ट करणारी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. यामुळे रुग्णाची शारीरिक आणि मानसिक स्थिती बऱ्यापैकी खालावते. त्याला काहीही आठवत नाही. निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. दैनंदिन कामांतही अडचणींना सामोरे जावे लागते.

२. कसा होतो हा आजार?
आनुवंशिक, मधुमेह ही मोठी कारणे

हा आजार मेंदूमध्ये टाऊ टँगल्स नावाच्या विशेष प्रकारच्या प्रोटीनच्या निर्मितीमुळे होतो. ते नसांच्या पेशी आणि त्यांच्या दरम्यानच्या क्रियांमधील संवादात व्यत्यय आणते, त्यामुळे ती व्यक्ती योग्यरीत्या संतुलन साधू शकत नाही. त्याच वेळी हा आजार काही लोकांमध्ये आनुवंशिकतेनेदेखील आहे.

३. आजाराची लक्षणे आणि उपचार?
अद्याप अचूक उपचार उपलब्ध नाहीत

सध्या लक्षणांची तपासणी केल्यानेच हा आजार ओळखला जाऊ शकतो. त्यासाठी डॉक्टर सीटी स्कॅन, एमआरआयद्वारे मेंदूतील बदल आणि मानसिक लक्षणांच्या चाचण्या करतात. अल्झायमरवर अद्याप अचूक उपचार उपलब्ध नाही.तथापि, त्याचे परिणाम कमी करण्यासाठी काही औषधे आणि वर्तनात्मक लक्षणे सुधारली जाऊ शकतात.

४. यामुळे काय अडचणी येतात?
स्मरणशक्ती आणि भाषेच्या समस्या

अल्झायमरने ग्रस्त व्यक्तीमध्ये स्मृती आणि भाषेच्या समस्यांव्यतिरिक्त, कोणत्याही प्रकारच्या वेदना व्यक्त करण्याची समस्याही आहे. आजार तीव्र होतो तेव्हा अन्न गिळण्यास, आतड्यात व मूत्राशयाच्या नियंत्रणात असंतुलन व समस्याही उद्भवतात.

५. हा आजार टाळता येतो?
हृदय चांगले असल्यास धोका कमी

त्यावर नियंत्रण ठेवल्यास उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, मधुमेह होण्याचा धोका कमी होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. हृदयरोग वाढल्यामुळे अल्झायमरचा धोकाही वाढतो. हृदयाशी संबंधित आजारांना टाळूनही हे टाळता येऊ शकते.

डॉ. जॉय देसाई
(एमडी,डीएनबी)
डायरेक्टर अँड हेड, न्यूरॉलॉजी जसलोक हाॅस्पिटल, मुंबई