आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूप थंडी वाजत असेल तर…:अशक्तपणा, मधुमेह, रक्ताभिसरण व थायरॉइडची समस्या व अपूर्ण झोप हीसुद्धा असू शकतात कारणे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात थंडी वाजणे साहजिक आहे, पण कमी थंडीत दिवसभर हुडहुडी भरत असेल किंवा हात- पाय थंड पडत असतील तर हे काही आजार किंवा शारीरिक कमतरतेचे लक्षणही असू शकते. शरीरातील लोहाची कमतरता किंवा अशक्तपणा हेदेखील अति थंडी वाजण्याचे प्रमुख कारण आहे. त्याचप्रमाणे तुमचे हात-पाय थंड पडत असतील, परंतु उर्वरित शरीर सामान्य असेल तर शरीरात रक्ताभिसरण कमी होणे हे एक कारण असू शकते. वाईट रक्ताभिसरणामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये योग्य प्रमाणात रक्त पोहोचत नाही, त्यामुळे शरीरात पुरेशी उष्णता निर्माण होत नाही. परिणाम जास्त थंडी वाजणे किंवा हुडहुडीच्या स्वरूपात दिसतो. खरं तर हुडहुडीमुळे स्नायूंमध्ये तणाव निर्माण करून त्यांना आरामशीर स्थितीत आणते, त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, मधुमेहामुळे हात आणि पायांच्या मज्जातंतूंनाही नुकसान होते, त्यामुळे त्यांना थंडी अधिक वाजण्याची शक्यता असते. हिवाळ्यात जास्त थंडी वाजत असेल तर या ८ कारणांचा नक्की विचार करा.

तुमचे हात-पाय थंड राहत असतील तर ही कारणे असू शकतात 1) थायरॉइडची कमतरता थायरॉइडच्या कमतरतेला हायपोथायरॉइडिझम म्हणतात. थायरॉइड ग्रंथी पुरेसे थायरॉइड संप्रेरक सोडू शकत नाही, तेव्हा चयापचय मंदावते. शरीरात पुरेशी उष्णता निर्माण होत नाही. केस गळणे, अनियमित मासिक पाळी आणि अचानक वजन वाढणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. {असे ठेवा नियंत्रण : लिंबूवर्गीय फळे, सफरचंद, बटाटे, काजू फायदेशीर आहेत. 2) अशक्तपणा लोह लाल रक्तपेशींना संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते, त्यामुळे शरीर उष्णता निर्माण करण्यास सक्षम होते. लोहाच्या कमतरतेमुळे थायरॉइडच्या कार्यावरही परिणाम होतो. त्वचेचा पिवळसरपणा, एकाग्रता आणि श्वास घेण्यात अडचण ही त्याच्या कमतरतेची मुख्य लक्षणे आहेत. {असे भरून काढा : पालेभाज्या, नट आणि फोर्टिफाइड पदार्थांचे सेवन करा.

3) मधुमेह वाढलेल्या मधुमेहामुळे हात आणि पायांच्या नसांना नुकसान होते. मज्जातंतू मेंदूला विविध संदेश पाठवत असल्याने त्यांचे नुकसान तापमानाशी संबंधित संदेशावर परिणाम करते. वारंवार लघवी, थकवा, कोरडे तोंड ही मधुमेहाची प्रमुख लक्षणे आहेत. {असे ठेवा नियंत्रण : दररोज ३० मिनिटे वेगाने चाला.

4) निर्जलीकरण पाणी शरीरातील उष्णता पकडते आणि तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी ते हळूहळू सोडते, परंतु शरीराला त्याची कमतरता जाणवू लागल्यावर ते कमी किंवा उच्च तापमानास संवेदनशील बनते. डोकेदुखी, वारंवार कोरडे तोंड, लघवी घट्ट होणे ही त्याची लक्षणे आहेत. {असे भरून काढा : रोज ८ तरी ग्लास पाणी प्या. व्यायाम करत असल्यास प्रमाण वाढवा.

5) कमी व्हिटॅमिन बी-१२ व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो, ते शरीरात हुडहुडी भरण्याचे एक प्रमुख कारण आहे. हात, पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे, चालण्यात समस्या, थकवा, अतिसार किंवा मळमळ ही त्याच्या कमतरतेची मुख्य लक्षणे आहेत. {असे भरून काढा : दुग्धजन्य पदार्थ, पोल्ट्री व मांसाहार ही कमतरता भरून काढू शकतात.

6) वजन कमी वजन कमी असणे म्हणजे शरीरातील चरबी कमी असणे. फॅटी टिश्यू हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. त्यांच्या कमतरतेमुळे शरीर पुरेशी उष्णता निर्माण करू शकत नाही, त्यामुळे थंडी जास्त जाणवते. याशिवाय शरीरातील स्नायूंचे प्रमाण कमी झाल्यामुळेही हीच परिस्थिती उद्भवते. {असे ठेवा कायम : आठवड्यात ३ दिवस वेट ट्रेनिंग वा रेझिस्टन्स एक्सरसाइज करा.

7) कमकुवत रक्ताभिसरण कमकुवत रक्ताभिसरणामुळे हात-पायांपर्यंत रक्त पोहोचत नाही. हृदयविकारही याला कारण असू शकतो. वास्तविक, हृदयविकारामुळे हृदयाला रक्त पंप करण्यात अडचण येते. कमकुवत रक्ताभिसरणामुळे त्वचेचा रंग पिवळा किंवा निळा होऊ लागतो. {असा करा बचाव : आठवड्यातून १५० मिनिटे मध्यम व्यायाम करा.

डॉ. संजय गुजराती कन्सल्टंट फिजिशियन, ज्युपिटर ग्रुप्स ऑफ हॉस्पिटल्स

बातम्या आणखी आहेत...