आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१८ वर्षांपर्यंत : एक तास खेळ, ८ तास झोप आवश्यक व्यायाम : वय ५-१७ वर्षे असेल तर रोज साधारण ६० मिनिटे व्यायाम करावा. लहान मुलांनी तंदुरुस्त राहण्यासाठी खेळावे, तर किशोरवयीन मुलांनी हलका व्यायाम आणि परिश्रम करावेत.
आहार : शरीराचा विकास होण्याचे हे वय आहे. या वयात रोजच्या आहारात ४० ते ६५% कर्बोदके, १० ते २५% प्रथिने आणि १५ ते ३५% फॅट घेतले पाहिजेत. मांस, अंडी, बीन्स, नट्स, बिया, सोया, पोल्ट्री फूड हे प्रोटीन्स म्हणून देता येतील, तर फॅटमध्ये मासे, दही हे चांगले पर्याय आहेत. होलग्रेन ब्रेड, तपकिरी तांदूळ, फळे आणि भाज्या कर्बोदकांमधे देऊ शकता. मुले खूप खेळतात, त्यामुळे हायड्रेटेड राहण्यासाठी ताक, लिंबूपाणी, नारळपाणी वेळोवेळी द्या.
झोप : या वयात ८ ते १० तासांची झोप आवश्यक असते.
१८-६४ वर्षे : आठवड्यात ५ तास व्यायाम अवश्य करा
व्यायाम : दर आठवड्याला १५० ते ३०० मिनिटे मध्यम व्यायाम करावा.
आहार : वयाच्या ३५-४० नंतर हाडे कमकुवत होऊ लागतात. अधिक कॅल्शियम आवश्यक आहे. म्हणूनच ब्रोकोली, संत्री, हिरव्या पालेभाज्या, दूध यांचा आहारात समावेश करावा. दुग्धजन्य पदार्थ जास्त घ्या. तसेच फायबर मिळेल अशा गोष्टी खा. उदा. फळे, भाज्या, बार्ली, ओट्स, भरड धान्य. त्यामुळे पचनक्रिया नीट राहते.
झोप : वयाच्या ६० वर्षांपर्यंत ७ तासांची झोप पुरेशी मानली जाते. ६१ ते ६५ दरम्यान ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे. ६५ वर्षांपुढील ः रोज ३० ग्रॅम सुकामेवा खाल्ल्याने वाढते वय
व्यायाम : आठवड्यात पाच दिवस १५० मिनिटांचा मध्यम व्यायाम पुरेसा आहे. शरीरात पूर्वीसारखी चपळता राहत नाही, त्यामुळे धावणे व कठीण व्यायाम टाळावा.
आहार : शरीर शरीर जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषून घेण्यात अशक्त होते, तर औषधांमुळे पोषकद्रव्ये शोषून घेण्याची क्षमताही कमी होते. भूक कमी होऊ शकते. दररोज सुमारे ३० ग्रॅम सुकामेवा घेण्याचा प्रयत्न करा. फळांचा रस किमान १५० मिली घ्या. या वयात व्हिटॅमिन बी १२ देखील महत्त्वाचे आहे. यामुळे लाल रक्तपेशी तयार होतात.
झोप : ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांनी ७ ते ८ तास झोपले पाहिजे.
डॉ. ल्यूक कुटिन्हो होलिस्टिक न्यूट्रिशन आणि लाइफ स्टाइल मेडिसिन
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.