आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुमच्या जीवनशैलीत अशा काही गोष्टी असू शकतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. उदा. डबाबंद अन्न, रूम फ्रेशनर, रंग इ. त्यांचा वापर मर्यादित किंवा शहाणपणाने केल्यास कर्करोगाचा धोका कमी असतो.
डबाबंद खाद्यपदार्थ खारट, संरक्षित आणि स्मोक्ड पदार्थांमध्ये नायट्रेट्स जोडले जातात, जेणेकरून ते दीर्घकाळ खराब होऊ नयेत. पण हे पदार्थ शरीरात पोहोचतात तेव्हा नायट्रेट एन-नायट्रोज कंपाऊंडमध्ये बदलते, त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
रूम फ्रेशनर बहुतांश रूम फ्रेशनर सुगंधासाठी फॉर्मल्डिहाइड किंवा नॅप्थालीनसारख्या पदार्थांचा वापर करतात. हे रूम फ्रेशनर्स हवेत रसायने सोडतात, त्यामुळे कर्करोग होऊ शकतो.
माउथ फ्रेशनर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या म्हणण्यानुसार, चुटकी, स्वीटी, पान बहार, पान मसाला इ. सुपारी (तंबाखूविरहित) असलेले माउथ फ्रेशनर्सही कर्करोगास कारणीभूत ठरतात.
केसांना लावायचा रंग हेअर डाय उत्पादने अंतःस्रावी प्रणालीवर परिणाम करतात. अंतःस्रावी प्रणाली शरीरातील ग्रंथींचा एक समूह आहे, तो कार्ये करण्यासाठी हार्मोन्स सोडतो. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
टॅल्कम पावडर टॅल्कम पावडर मुख्यतः टॅल्कपासून बनलेली असते. त्यात अभ्रक नावाचा धातू असू शकतो. हा अभ्रक श्वासोच्छ्वासाद्वारे फुप्फुसात जातो आणि कर्करोग होऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.