आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझोपण्यापूर्वी ४५ मिनिटे मोबाइल दूर ठेवा, संगीत ऐका
स रासरी एक भारतीय रोज सुमारे ५ तास मोबाइलवर घालवतो. हा मोबाइल डोळे, मान, खांदे, पाठ आणि डोळ्यांच्या मांसपेशींवर ताण निर्माण करत आहे. मेलाटोनिन हार्मोनवर त्याचा परिणाम होतो. यामुळे नियमित झोपेत बाधा निर्माण होते.
जर झोपण्यापूर्वी ४५ मिनिटे मोबाइल बाजूला ठेवून आवडीचे संगीत ऐकले तर मज्जासंस्था शांत होतात, श्वास व हृदयाचे ठोकेही स्थिर होतात.
कामादरम्यान चाला, रोज दोन तास उभे राहून काम करा
दि वसाचा आपला बहुतांश वेळ बसून घालवला तर हृदयरोग, कॅन्सर, स्थूलपणा आणि टाइप-२ मधुमेह विकाराचा धोका वाढतो. आयसीएमआरच्या सर्वेक्षणानुसार भारतात सुमारे ४२% लोक इनअॅक्टिव्ह श्रेणीत मोडतात.
जर दिवसभरात दोन तास उभे राहाल किंवा कामादरम्यान चालाल तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारेल, हृदयरोग व मधुमेहाचा धोका कमी होईल.
ड्रिंक फूड, च्यू वॉटर... भोजनाच्या या तत्त्वाचा अंगीकार करा
प चन यंत्रणा म्हणजे शरीराचा दुसरा मेंदू मानला जातो. टीव्ही-मोबाइल आपण पाहत भोजन करत असू तर अनेकदा गरजेपेक्षा अधिक किंवा अन्न चाऊन खात नाहीत. त्यामुळे वजन वाढते. म्हणून म्हटले जाते, ड्रिंक युवर फूड, च्यू युवर वॉटर.
जर अन्न पाण्यासारखे मुलायम होईल असे चावून खाल्ले...अन् पाणी हळूहळू प्राशन केले तर पोषक घटक अिधक मिळतील. पचनक्रिया सुधारेल.
रोज १ शुगर ड्रिंक कमी घ्या, त्याऐवजी सूप घेणे उत्तम
भा रतात २४ टक्के महिला आणि २३ टक्के पुरुष स्थूल आहेत. साखर असलेली पेये शरीराचे वजन वाढवतात. किशाेरवयीन मुलांच्या वजनवाढीचे हेच कारण आहे. यामुळे रक्तदाब, हृदयविकारसारख्या आजारांचा धोका वाढत जातो.
जर रोजच्या आहारातील एकूण शुगर ड्रिंकपैकी एक जरी कमी केले तर मधुमेहाचा धोका २५% कमी होतो. याऐवजी तुम्ही सूप घेऊ शकता.
पिझ्झा, बर्गर खाल तेव्हा कोमट पाणी जरूर प्यावे
पि झ्झा, बर्गर किंवा अधिक तळीव पदार्थ भोजनात असतील तर यामुळे कोलेस्टेरॉल वाढते. हेच नंतर हृदयविकारासारख्या आजाराचे कारण ठरू शकते. आठवड्यात एकदा जरी असे अन्न घेतले तरी हृदयविकार व स्ट्रोकचा धोका वाढतो.
जर असे पदार्थ सेवन केल्यानंतर कोमट पाणी प्याल तर पचनगती वाढेल, टॉक्सिनही बाहेर पडतात.
डॉ. रमाकांत पांडा
कार्डियाक सर्जन, एशियन
हार्ट इन्स्टिट्यूटचे प्रमुख
चांगले आरोग्य एक सोपे सूत्र आहे... मोजके भोजन करा, दीर्घ श्वास घ्या, संयम बाळगा, आनंद वाढवा... इतरांना द्या. जे काम कराल ते आवडीने करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.