आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायकृतात तयार होणारे कोलेस्टेरॉल हार्मोन्सच्या नियंत्रणासारख्या अनेक कामांना मदत करते. गुड कोलेस्टेरॉल(हार्ड डेन्सिटी लिपोप्रोटीन) आरोग्य सुधारते. (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन) एलडीएलची जास्त मात्रा नुकसान करते. याला बॅड कोलेस्टेरॉल म्हणतात. हे धमन्यांत ब्लॉकेज निर्माण करून हार्ट अटॅकचे कारण होते. स्टॅटिंस औषध आणि जीवनशैलीत बदल करून ते कमी करू शकतो.
{स्टॅटिंस का आवश्यक? कसे काम करते? स्टॅटिंस द्यायचे की नाही डॉक्टर ठरवू शकतात. औषध द्यायलाच पाहिजे याची गरज नाही. जीवनशैलीतील बदलातूनही असे करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. हे यकृतात कोलेस्टेरॉलचे उत्पादन घटवते. आधीपासून रक्तात असलेले कोलेस्टेरॉल कमी करते. यामुळे धमन्यांत गुठळी बनण्याची शक्यता कमी होते. कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या अन्य औषधांपेक्षा स्टॅटिन्स औषधात हाच फरक आहे की, हे स्रोताला निशाणा बनवून उत्पादन कमी करते. अन्य औषध बनल्यानंतर त्याला कमी करते.
{स्टॅटिंस कुणाला दिले जाते? आधी स्टॅटिंस देण्यासाठी एकूण कोलेस्टेरॉल विशेषत: एलडीएल स्तराकडे लक्ष दिले जात होते. मात्र, आता वय एक महत्त्वाचा पैलू झाला आहे. ५० ते ५९ वयात याचा वापर दर वाढला आहे. ६० ते ७४ वयासाठी तो मंद झाला आहे. मधुमेहासोबत उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी उच्च असल्यास स्टॅटिंसचा सल्ला देण्याची जास्त शक्यता आहे.
{जास्त कोलेस्टेरॉल झाल्यास स्टॅटिंस देता येईल? हृदयाच्या आजारासाठी एचडीएल केवळ एक कारक आहे. स्मोकिंग, हाय बीपी, मधुमेहातही याची प्रमुख भूमिका आहे. डॉक्टर हाय कोलेस्टेरॉलसोबत वय, शारीरिक स्थिती, कौटुंबीक पार्श्वभूमी, अन्य आजारही पाहतात. जोखमीच्या आकलनाच्या मानकांंतर्गत ९ कारकांवर विचार होतो. यामुळे १० वर्षांत आजाराची शक्यता पाहिली जाते. यात डॉक्टर विना औषधाच्या जीवनशैलीत बदलाच्या माध्यमातून जोखीम कमी करू शकतात. स्मोकिंग सोडून एलडीएल कमी करू शकता. योग्य आहार आणि नियमित व्यायामामुळे काही महिन्यांत कोलेस्टेरॉल पातळी प्रमाणात आणली जाऊ शकते.
{ याचे साइड इफेक्ट्स आहेत का? प्रत्येक औषधाचे साइड इफेक्ट आहेत. स्टॅटिंस अपवाद नाही. स्टॅटिंस ४० वर्षांपासून वापरात आहे. साइड इफेक्ट्सवर बराच डेटा आहे. . मधुमेह आहे किंवा स्टॅटिंस इफेक्ट्सने घेत आहेत. मधुमेह आणि स्टॅटिंस घेतल्यावर शर्करा स्तर वाढत असेल तर टाइप २चा धोका वाढू शकतो. अशात उपचारात बदल आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.