आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातील आत्महत्येचा विचार आधीच कळणार:बायोसेन्सर डेटा सांगणार मनातील कल्लोळ; जीव वाचवण्यासाठी ठरेल उपयुक्त

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हार्वर्ड विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाने लोकांमधील वाढत्या आत्महत्येची प्रवृत्ती जाणून घेण्यासाठी एक नवीन मार्ग शोधला आहे. मानसशास्त्रज्ञांकडे आलेल्या काही लोकांवरही त्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे. हार्वर्ड विद्यापीठातील संशोधक बायोसेन्सर डेटा वापरून एखाद्या व्यक्तीच्या मेंदूत आत्महत्येचा विचार कधी आणि कोणत्या परिस्थितीत निर्माण होतो? हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी काही निवडक लोकांच्या स्मार्ट फोनमध्ये काही अ‌ॅप्स टाकले असून त्यांच्या हाताला डिजिटल बॅंड बांधला आहे. यामुळे मानसशास्त्रज्ञांना त्या लोकांच्या दैनदिन हालचाली पाहता येतील.

GPS द्वारे लोकांचा मागोवा घेणे
या प्रयोगात कॅटलिन क्रुझ नावाच्या तरूणीचाही समावेश करण्यात आला आहे. मानसशास्त्रज्ञाकडून उपचार करून कॅटलिन काही दिवसांपूर्वी घरी गेली आहे. आता मानसशास्त्रज्ञ जीपीएसद्वारे कॅटलिन घर सोडते की नाही, याचा मागोवा घेत आहेत. निघाली तर बाहेर किती दिवस राहते? तिच्या नाडीचा दर किती आहे? नाडीचे ठोके कधी वाढतात, कमी होतात? कॅटलिनच्या झोपेवरही डिजिटल बँडद्वारे लक्ष ठेवले जात आहे. झोपताना तिची झोप किती वेळा मोडते?

जीपीएस आणि डिजिटल बँड काय सांगतात?
या संशोधनाशी संबंधित मानसशास्त्रज्ञ मॅथ्यू नॉक्स म्हणाले की, आम्ही या सर्व गोष्टींची तपासणी करणार आहोत. यामुळे समोरची व्यक्ती आत्महत्येचा विचार करत आहे की नाही. हे कळण्यास मदत होईल. जेणेकरून तिच्या मनात आत्महत्येचा विचार जर आला तर वेळेत तिचा जीव वाचवता येईल. नॉक यांच्या मते, जर एखाद्याची झोप पुन्हा पुन्हा तुटत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्याचा मूड चांगला नाही.

वारंवार घरात फिरणे म्हणजे राग अनावर होणे

एखादी व्यक्ती वारंवार घरामध्ये चकरा मारीत असल्याचे जीपीएस दाखवत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की, त्याला राग येत आहे. अशा प्रकारे एक सेन्सॉर अहवाल तयार केला जातो. परिणाम रागातील विचाराने कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वेळीच काळजी घेता येते. आत्महत्येचा विचार टाळता येईल.

प्रश्नांच्या यादीतून मूड जाणून घेण्याचा प्रयत्न
संशोधक वेळोवेळी रुग्णांना प्रश्नांची यादी पाठवतात. यातून त्या मनोरुग्णांची भावना कशी आहे हे समजते. त्यांना काय बरोबर आणि काय अयोग्य वाटते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करतो आहे.

बातम्या आणखी आहेत...