आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, उच्च रक्तदाब (बीपी) हे स्ट्रोक आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे मुख्य कारण आहे. नियमित तपासणी करून त्याचे धोके टाळता येतात. घरच्या घरी रक्तदाब तपासण्यासाठी होमडिक्स नावाच्या कंपनीने असा ब्लडप्रेशर मॉनिटर तयार केला आहे, जो मनगटावर बांधून सहजपणे रक्तदाब तपासता येतो.
तो कसे काम करतो : प्रथम त्यात तारीख आणि वेळ सेट करा. हा मॉनिटर डाव्या हाताच्या मनगटावर बांधा आणि तळवा वरच्या बाजूस ठेवा. आता कोपर टेबलवर ठेवा, जेणेकरून मॉनिटरवर बांधलेला पट्टा आणि हृदय दोन्ही समान पातळीवर येतील. आता स्टार्ट बटण दाबा. ते दाबताच पट्ट्यामध्ये हवा भरली जाईल, त्यामुळे तो फुगत जाईल. रक्तदाब चाचणी पूर्ण झाल्यावर त्याची हवा आपोआप बाहेर पडते, त्यामुळे ते डिफ्लेटेड होते. तुमचा रक्तदाब आता मॉनिटरच्या स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.