आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटोमॅटो ही जवळपास प्रत्येक घरातनेहमी मोठ्या प्रमाणात खाल्ली भाजी आहे, पण ती फक्त भाजी नसून ते एक सुपरफूडदेखील आहे. टोमॅटो वजन, दृष्टी, रक्तदाब, आपल्या रक्तातील साखर संतुलित ठेवण्यासोबतच कर्करोग, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते. टोमॅटो शिजवून खाल्ल्याने त्याच्या पेशींचा थर तुटतो, त्यामुळे शरीर त्यातून पोषक तत्त्वे चांगल्या प्रकारे शोषून घेते.
-भरपूर अँटिऑक्सिडंट्स : टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे कॅरोटीनॉइड असते. त्यात अँटिऑक्सिडंटचे गुणधर्म आहेत. यामुळे त्याचा रंग लाल आहे. लायकोपिन फ्री-रॅडिकल्सशी लढण्याव्यतिरिक्त कोलेस्टेरॉल कमी करते, प्रतिकारशक्ती वाढवते. रक्तवाहिन्या कडक होण्यापासून प्रतिबंधित करते. रक्त गोठण्याचा धोका कमी होतो.
-कर्करोगापासून बचाव : हार्वर्ड स्कूलच्या पोषण विभागानुसार टोमॅटोमध्ये बीटा कॅरोटीन आढळते. अमेरिकन नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनात आढळले की, लायकोपिन आणि बीटा-कॅरोटीन दोन्ही एकत्रितपणे प्रोस्टेट कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका कमी करतात.
-डोळे निरोगी ठेवतात : टोमॅटोमध्ये ल्युटीन व झेक्सॅन्थिन नावाचे कॅरोटीनॉइडदेखील असतात. हे कॅरोटीनॉइड डोळ्यातील पडदा व डोळ्याच्या लेन्समध्येही आढळतात. हे कॅरोटीनाॅइड्स डोळ्यांना नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी प्रकाश व हानिकारक किरणे फिल्टर करतात.
-हृदयविकाराचा धोका कमी : टोमॅटोमध्ये लायकोपिन, बीटा-कॅरोटीन, फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनॉइड्स व व्हिटॅमिन ई आढळतात. ते लिपोप्रोटीन आणि संवहनी पेशींचे ऑक्सिडेशनपासून संरक्षण करतात. खरं तर ऑक्सिडेशनमुळे रक्तवाहिन्यांत प्लॅक जमा होतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. याशिवाय टोमॅटोमुळे रक्तदाब आणि वाईट कोलेस्टेरॉलही कमी होते. वाईट कोलेस्टेरॉल हे हृदयविकाराचे सर्वात मोठे कारण आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.