आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक आजारांमुळे मानसिक क्षमता कमी होते. लॅन्सेटच्या अहवालाप्रमाणे, धूम्रपान, वाईट फिटनेस आणि लठ्ठपणा यांसारखे एकूण १२ घटक मेंदूशी संबंधित स्मृतिभ्रंशासाठी जबाबदार आहेत. स्मृतिभ्रंश स्मृती आणि मेंदूच्या समन्वयाच्या क्षमतेवर गंभीरपणे परिणाम करतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व १२ घटकांवर आपले नियंत्रण असते. म्हणजेच आपल्या इच्छेनुसार आपण त्यात बदल घडवून आणू शकतो. पुरेशा झोपेसोबत जीवनशैलीसंबंधी आजार आणि आहाराकडे लक्ष दिले तर मेंदूची क्षमता कोणत्याही वयात वाढवता येते.
जीवनशैली : रक्तदाब, कोलेस्टेरॉल, साखर नियंत्रण
न्यूजर्सी येथील हॅकेनसॅक युनिव्हर्सिटीच्या मते, उच्च रक्तदाब आणि टाइप २ मधुमेह मेंदूतील छोट्या रक्तवाहिन्या नष्ट करतात. तसेच मेंदूच्या स्मरणशक्तीसाठी काम करणाऱ्या भागाचे नुकसान होते.
अन्न : आहाराचा अर्धा भाग भाज्यांचा असावा
रोजच्या जेवणाचे तीन भाग करा. ताटाचा अर्धा भाग फळे आणि भाज्यांचा असावा. एकचतुर्थांश पातळ प्रथिने आणि एकचतुर्थांश संपूर्ण धान्य असावे. मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी अन्नाची ही पद्धत सर्वात प्रभावी आहे.
श्रवण चाचणी : ऐकण्याच्या क्षमतेशी थेट संबंधित
संभाषणादरम्यान गोष्टी समजण्यात आणि ऐकण्यात समस्या येत असल्यास श्रवण चाचणी करा. ऐकण्याची क्षमता कमी होण्याचा थेट संबंध मेंदूच्या क्षमतेशी असतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.