आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेस्ट इम्प्लांटमुळे कॅन्सरचा धोका:अमेरिकेत दरवर्षी 4 लाख महिला करून घेत आहेत सर्जरी, यामुळे नवीन कॅन्सर होण्याची शक्यता

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूएस फूड अँड ड्रग अ‌ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने महिलांना ब्रेस्ट इम्प्लांट-संबंधित कर्करोगाच्या धोक्याचा इशारा दिला आहे. FDA ने म्हटले आहे की, ज्या महिलांनी ब्रेस्ट इम्प्लांट केले आहे किंवा करण्याचा विचार करत आहेत त्यांना नवीन प्रकारच्या कर्करोगाचा धोका राहू शकतो.

कँसरचे नाव कार्सिनोमा
या कर्करोगाला कार्सिनोमा म्हणतात. हा जखम झालेल्या ऊतीमध्ये वाढू शकतो आणि संपूर्ण इम्प्लांटचा ताबा घेऊ शकतो. सध्या अशी प्रकरणे खूपच कमी आहेत, मात्र महिलांनी काळजी घ्यावी. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा कॅन्सर ब्रेस्ट इम्प्लांट करताना वापरल्या जाणाऱ्या सिलिकॉन किंवा सॅलीनमुळे होत आहे.

वास्तविक, ब्रेस्ट इम्प्लांटमध्ये वापरले जाणारे हे पदार्थ स्तनाच्या पेशींवर फ्रिक्शन (घर्षण) निर्माण करून जखम करतात. हे कर्करोगाचे कारण बनत आहे. कर्करोगाचा हा प्रकार दशकभरापूर्वी ओळखला गेला होता. त्यानंतरही हे इम्प्लांट बाजारात उपलब्ध होते. अनेक प्रकरणांमध्ये इम्प्लांटच्या अनेक वर्षांनंतरही कर्करोगाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

मधुमेह असलेल्या महिलांना जास्त धोका
कार्सिनोमा कर्करोगाची लक्षणे स्तनामध्ये सूज, वेदना, गाठ किंवा त्वचेचा रंग बदलणे या स्वरूपात दिसून येत आहेत. धूम्रपान करणाऱ्या आणि मधुमेह असलेल्या महिलांना धोका अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. एफडीए तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ते महिलांना इम्प्लांट काढून घेण्यास सांगत नाहीत, तर त्यावर लक्ष ठेवण्यास सांगत आहेत. तसेच काही अडचण असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

अमेरिकेत 4 लाख महिला ब्रेस्ट इम्प्लांट करत आहेत
ब्रेस्ट इम्प्लांटमधून होणार्‍या कॅन्सरची चिंता आहे कारण अमेरिकेतील सुमारे 4 लाख महिला दरवर्षी ब्रेस्ट इम्प्लांट करत आहेत. यापैकी एक लाख महिला स्तनाचा कर्करोग होऊ नये इम्प्लांट करत आहेत. तर स्तनाला चांगला आकार देण्याचा 3 लाख महिलांचा हेतू आहे.

बातम्या आणखी आहेत...