आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना महामारी:स्तनपान करणाऱ्या मुलांना कोरोनाचा धोका कमी, आईलाही कॅन्सरपासून वाचवतात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्तनपानाचे फायदे आणि कोरोना काळातील दक्षतेबाबत जाणून घ्या

जगभरात दगवर्षी १ ते ७ ऑगस्टपर्यंत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अलीकडील संशोधनानुसार आईचे दूध मिळू न शकणाऱ्या मुलांचा मृत्युदर इतर मुलांच्या तुलनेत सुमारे १४ टक्के असतो. दरवर्षी ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ८.२३ लाख मुलांना ० ते २३ महिन्यांच्या वयात स्तनपान दिल्यास त्यांना अकाली मृत्यूपासून वाचवले जाऊ शकते. म्हणजे आईचे दूध मिळू न शकल्याने दरवर्षी या मुलांचा मृत्यू होतो. जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे मुलांना स्तनपान देण्यातही मातांच्या मनात अनेक शंका-कुशंका आहेत.

एखाद्या महिलेला कोरोना संसर्ग झाल्याची शंका आली असेल किंवा तिला संसर्ग झाला असेल तरी तिने मुलाला स्तनपान देणे सुरू ठेवावे, असे २३ जून २०२० रोजी डब्ल्यूएचओने जारी केलेल्या शिफारशींमध्ये म्हटले आहे. कारण स्तनपान संसर्गाचा धोका खूप कमी करते. एवढेच नाही, तर आईने मुलाबरोबर एकाच खोलीत राहिले पाहिजे आणि त्याला वारंवार स्पर्शही केला पाहिजे. आईच्या दुधात वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूट्रिशन्स असतात, तसेच स्तनपानाने अनेक रोगांशी लढण्यासाठी मुलाच्या शरीरात अँटिबॉडीज विकसित होतात. आईचे दूध मुलाला श्वसन व गळ्याशी संबंधित संसर्गापासून वाचवते. सडन इन्फंट डेथ सिंड्रोम (सीआयजीएस),अॅलर्जी व टाइप वन मधुमेहासारख्या आजारांचा धोका कमी होतो. मुलांच्या स्तनपानाशी संबंधित फायदे आणि कोरोनाच्या काळात मातांद्वारे स्तनपान करण्याच्या पद्धतींबाबत या अहवालात जाणून घेऊया.

आईसाठीही लाभदायक आहे स्तनपान
आईला अनेक फयदे होतात. स्तनपान केल्याने मातांची गर्भावस्थेपूर्वीची पचनशक्ती पुन्हा प्राप्त करण्यात मदत होते. वजन कमी करण्यासही स्तनपान सहायक आहे आणि गर्भाशयाचे आकुंचन व प्रजनन प्रणालीचे सामान्यीकरण करते. नियमित स्तनपान देणाऱ्या आयांना प्रसूतीनंतरच्या नैराश्याचा धोका कमी होतो.

६ महिने केवळ आईचे दूधच आवश्यक
- मुलाच्या जन्मानंतर ६ महिने दिलेले स्तनपान त्यांचा पुरेशी वाढ, विकास आणि आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे.
- ६ महिन्यांनंतर २ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ मुलांच्या पुरेशा पोषणासाठी आईच्या दुधाबरोबरच पुरेशा प्रमाणात पोषक खाद्यपदार्थदेखील दिले गेले पाहिजेत.

सीडीसीनुसार स्तनपानाच्या वेळी मास्क लावा
सेंटर फाॅर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (सीडीसी) अहवालानुसार आतापर्यंत आई संसर्गबाधित असेल तर मुलालाही संसर्ग होऊ शकतो, याचा पुरावा सापडलेला नाही. तरीही आई कोरोना संसर्गित असेल तर खालीलप्रमाणे दक्षता घेतली पाहिजे.
- तोंडावर मास्क लावा. कमीत कमी २० सेकंद साबणाने हात धुवावेत.
- ब्रेस्ट पंपाचा वापर करावा.
- ब्रेस्ट पंपाचा प्रत्येक भाग चांगल्या प्रकारे स्वच्छ व निर्जंतुक करावा.
- शक्य असेल तर आईने काढून दिलेले दूध मुलाची देखभाल करणाऱ्या इतर महिलेद्वारे त्याला पाजावे.

डॉ. इरिका पटेल
एमएस (स्त्रीरोग) एमसीएच, कन्सल्टंट, नोव्हा आयवीआय फर्टिलिटी, चेन्नई

बातम्या आणखी आहेत...