आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायन्स ऑफ वॉकिग:दररोज 20 मिनिटे ब्रिस्क वॉक केल्याने कोरोनाचा धोका निम्मा कमी होतो

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या लिसेस्टर युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर टॉम येट्स यांच्या संशोधनानुसार ब्रिस्क वॉक करणाऱ्या लोकांना कोविड-१९ मुळे मृत्यूचा धोका जवळपास एकचतुर्थांश असल्याचे आढळले. विषाणूच्या गंभीर संसर्गाचा धोकाही या लोकांमध्ये अर्ध्याहून कमी होता. ब्रिस्क वॉक किंवा वेगाने चालणारे लोक २० वर्षे जास्त जगतात. कारण वेगानेे चालण्यामुळे हृदय तंदुरुस्त राहते. त्यामुळे ऑक्सिजनचा शरीरात चांगला वापर होतो. २०१५ मध्ये द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात आढळले की, दररोज २० मिनिटांच्या ब्रिस्क वॉकने मृत्यूचा धोका ३०% पर्यंत कमी होतो.

धावणे-चालणे याच्या मधली स्थिती म्हणजे ब्रिस्क वॉक
धावणे व चालण्याच्या मधल्या स्थितीला ब्रिस्क वॉक म्हणतात. म्हणजे तुम्ही बोलू शकाल, पण गाणे गाऊ शकणार नाही, एवढा चालण्याचा वेग.

याचे फायदे काय?
मायो क्लिनिकमध्ये प्रकाशित संशोधनानुसार हे तणाव व औदासीन्य कमी करते. २० मिनिटांच्या ब्रिस्क वॉकमध्ये व्यक्ती एक मैल चालते, त्यात ९०-११० कॅलरी बर्न होतात. क्लीव्हलँड क्लिनिकनुसार हे हृदयगतीही दुप्पट करते. मेंदू अधिक सक्रिय होतो. सामंजस्याची क्षमता वाढते.

वॉक करताना या चुका केल्यास होऊ शकते नुकसान
हात सरळ ठेवणे :
द जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल बायोलॉजीच्या अभ्यासानुसार हात सरळ ठेवल्याने वेग कमी होतो. हात सुमारे ९० अंशांत वाकवून कोपर शरीराला खेटून ठेवल्यानेच वॉकिंगचा अधिक फायदा मिळतो.

वाकून चालणे : फ्लोरिडा येथील रेसवॉकिंग कोच बोनी स्टीन यांच्या म्हणण्यानुसार वाकून चालण्याने शरीराला जखम होऊ शकते. वॉक करताना मान सरळ ठेवावी, त्यामुळे मणकाही सरळ राहील. चालताना नजरेने अंदाजे १० ते ३० फुटांची रेंज कव्हर करा.

लांब ढांगा टाकणे : स्पोर्टमेडबीसी फिटनेस वेबसाइटनुसार लांब ढांगा टाकल्यामुळे पाय आपल्या गुरुत्वाकर्षण केंद्राच्या पुढे जातात. त्यामुळे गुडघ्यांना इजा होण्याची शक्यता असते. गुडघा लॉक होतो. तो शॉक अॅब्झॉर्ब करू शकत नाही. त्यामुळे वेदना होतात.

पाय सपाट ठेवणे : वेगा मेथडचे संस्थापक जो वेगा यांच्या म्हणण्यानुसार चालताना आधी टाच जमिनीला लागली पाहिजे. सपाट पाय ठेवल्यास ऊर्जा हस्तांतरणात अडचण येते. तसेच पायात वेदना होण्याची समस्याही वाढू शकते.

बातम्या आणखी आहेत...