आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेंटल हेल्थ:बर्नआऊटमुळे वर्क प्रॉडक्टिव्हिटी घटणे शक्य, कोविडच्या काळात 89 % कर्मचाऱ्यांना बसला फटका

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटाच्या एचआर सॉफ्टवेयर मेकर कंपनी बाम्बू एचआर, अँटी वर्कहोलिक पॉलिसीनुसार काम करते.कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालय सोडावेच लागते. आठवड्यात ४० तासांहून जास्त केल्या कर्मचाऱ्यांना बोलणे खावे लागतात. खूप जास्त काम करणारे कर्मचारी बर्न्ड आउट व्यावसायिक होतात. त्याचा फटका संस्थेच्या प्रगतीला बसतो, असे कंपनीचे म्हणणे आहे. बर्नआउट हा शब्द सर्वात पहिल्यांदा १९७० मध्ये अमेरिकन मानस तज्ञ हर्बट फ्रुडनबर्गर यांनी नोकरीतील थकवा जाणून घेण्यासाठी वापरला होता. तीन वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने त्याची पुष्टी केली. नोकरीतील तणाव वेळीच दूर करावा. अन्यथा त्याचे रुपांतर बर्नआउटमध्ये होण्यास वेळ लागत नाही. साध्या भाषेत सांगायचे झाल्यास दीर्घकाळ तुम्हाला खूप जास्त शारीरिक व मानसिक थकव्यात काढवा लागतो तेव्हा त्याचे रुपांतर बर्नआउटमध्ये होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणीच्या कामगिरीत घसरण किंवा कामाबाबत साशंकता निर्माण होणे हे देखील त्याचे लक्षण असू शकते.

चिंता, संताप, नकारात्मकतेत वाढ न्यूयॉर्क विद्यापीठात न्यूरोसायंटिस्ट डॉ. वेंडी सुजुकी यांच्या मते तुम्ही सतत चिंता आणि संतापात राहिल्यास ते बर्नआउट ठरू शकते. आपल्या कामाबद्दल गंभीर न राहणे हे देखील त्याचे संकेत असू शकतात. कामांत टाळाटाळ करणे, अस्वस्थता, उदासिनता इत्यादी देखील बर्नआउटची काही इतर लक्षणे असू शकतात. बर्नआउटमुळे मेंदूच्या सर्किटमध्ये बदल घडून येतो. तसे झाल्यास एकाग्रतेवर वाईट परिणाम होतो.

प्रामाणिक समुपदेशकाची मदत घेता येईल बर्नआउट झाल्यास कामाच्या वातावरणात बदल करण्याची गरज असते. जास्त तणाव असल्यास नोकरी देखील बदलता येऊ शकते. किंवा थेरपिस्ट तसेच मानसतज्ञ किंवा समुपदेशकाची देखील मदत घेऊ शकतात. त्याशिवाय आरोग्यदायी भोजन, व्यायाम, कामातून नियमितपणे विश्रांती घेणे आणि योग्य झोप यातून बर्नआउटशी लढण्यास मदत होत असते.

बातम्या आणखी आहेत...