आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोविड-19:कर्करोगग्रस्तांमध्ये कोरोना संसर्गानंतर जीभ पांढरी होण्यासारखी लक्षणे दिसतात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविड-19 दरम्यान कॅन्सरच्या रुग्णांची देखभाल

२०२५ पर्यंत भारतात कर्करोगपीडितांची संख्या जवळ जवळ १५.७ लाख होईल. ही सध्याच्या तुलनेत १३.९ लाखांपेक्षा १२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सध्या देशात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ३३ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोना महामारीमुळे कर्करोग झालेल्या रुग्णांच्या उपचार पद्धतीत खूप मोठे बदल झाले आहेत. कॅन्सर झालेल्या रुग्णांच्या उपचारांबाबत अनेक संशोधक द्विधा मन:स्थितीत आहेत. या कारणांमुळे या रुग्णांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. याचे अजून एक कारण म्हणजे या रुग्णांची कमकुवत म्हणजे अतिशय कमी झालेली प्रतिकार शक्ती होय. तज्ज्ञांच्या एका टीमकडून अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील मोंटेफोर मेडिकल सेंटरमध्ये २१८ रुग्णांचा अभ्यास केला जात आहे. हे सर्व रुग्ण कोरोना विषाणूने संसर्गित झालेले आहेत.

१८ मार्च ते ८ एप्रिल यामध्ये एका अभ्यासात वैज्ञानिकांच्या मते, ६१ टक्के रुग्णांचा मृत्यु हा कोरोनामुळे झाला आहे, जो एकुण संख्येच्या २८ टक्के आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, या काळात अमेरिकेत कोरानाने होणा-या मृत्युचा दर हा ५.८ टक्केच होता. लॉकडाउनच्या घोषणेनंतर कर्करोगाचे रुग्ण हे दवाखान्यात जाण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी घाबरत आहेत.

अमेरिकेत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनुसार ज्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू आहेत त्या लोकांची प्रतिकार शक्ती कमकुवत असते. खरे तर केमोथेरेपीसारख्या उपचार पद्धतींमुळे पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती होत नाही. पांढऱ्या रक्तपेशी या प्रतिकार शक्ती वाढण्याच्या प्रक्रियेचा मुख्य अंग आहेत. अशा व्यक्तींना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. पण यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

कॅन्सर रिसर्च यूकेच्या एका अहवालानुसार, कर्करोगावरील उपचाराने बऱ्या झालेल्या व्यक्तीलाही कोरोना संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. अशा परिस्थितीत या लोकांनी डॉक्टरांनी व शासनाने दिलेल्या सूचना पाळण्यासह योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

कर्करोगग्रस्तांमध्ये दिसणारी कोरोना संसर्गाची लक्षणे व दक्षता
कॅन्सरपीडितांमध्ये कोरोनाची दिसू शकतात अशी लक्षणे

- ताप
- घाम येणे, अंग कापणे
- जीभ किंवा तोंडाला जखम, जिभेवर पांढरा थर जमा होणे
- कफ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे
- लघवी करताना जळजळ, लघवीतून रक्त पडणे, अधिक फेस होणे
- पोट दुखणे किंवा मुरडा येणे
- घसा बसणे
- सायनसचा त्रास वा कान आणि डोके दुखणे

या कर्करोगग्रस्तांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे
- रेडिओथेरपी घेणारे रुग्ण
- केमोथेरपी होत आहे किंवा मागील ३ महिन्यांत केमोथेरपी चालू आहे
- गेल्या सहा महिन्यांत ज्या रुग्णांचे स्टेम सेल प्रत्यारोपण झाले आहे
- जे रुग्ण सध्या औषधे घेत आहेत
- विशिष्ट प्रकारचे रक्त किंवा लिम्फॅटिक सिस्टिम असलेले लोक, जरी त्यांना उपचारांची आवश्यकता नसली तरी त्यांना कोरोना संसर्गाचा धोका असतो.

जास्त धोका असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू ठेवणे आवश्यक
कोरोना विषाणूमुळे आपल्या आरोग्य व्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची प्रकर्षाने जाणीव झाली. त्यामुळे वैद्यकीय व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. अशा परिस्थिती कॅन्सरपीडित रुग्णांच्या उपचाराची, त्यांच्या उपचारादरम्यान होणाऱ्या प्रवासाची वेळ आणि पद्धत ठरवणे गरजेचे आहे. कॅन्सर रुग्णांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केंद्रे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. योग्य पद्धतीने प्रोटोकॉल, अत्याधिक सुरक्षेचे नियम पाळणे गरजेचे आहे. रुग्ण विषाणूच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत हाय रिस्कच्या रुग्णांची देखभाल थांबवणे योग्य ठरणार नाही.

डॉ. शिशिर शेट्टी
कन्सल्टंट, सर्जिकल ऑन्कोलॉजी, अपोलो रुग्णालय, नवी मुंबई