आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य:ढोबळ्या मिरचीमुळे सुधारते रोग प्रतिकारशक्ती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोग प्रतिकारकशक्ती चांगली असणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही

रोग प्रतिकारकशक्ती चांगली असणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही. त्यामुळे हिरव्या भाज्यांसोबत हिरवी मिरची खाऊन आपली प्रतिकारकशक्ती वाढवा. यात तुम्ही ढोबळ्या मिर्चीचा वापर करू शकता. पोटाचे अल्सर, फ्लू, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या गंभीर आजारांपासून बचाव होण्यासाठी ढोबळी मिरची अत्यंत फायदेशीर ठरते. व्हिटॉमिन सी युक्त ढोबळ्या मिरचीमुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. फ्लू, संसर्गापासून संरक्षण होते.

> ढोबळ्या मिरचीमुळे मेटाबॉलिझम सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्याच्या अनेक सप्लीमेंट्स, गोळ्यांमध्ये याचा वापर केला जातो. त्यामुळे आहारात विविध रंगी मिरच्यांचा अवश्य समावेश करा.

> पोटातील हानीकारक बॅक्टेरियांपासून वाचण्यासाठी आणि पोटांचे अल्सर रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे पचन सुधारते आणि अपचनाचा त्रास कमी होतो.

> नाकातील वायुमार्गाची स्वच्छता करते आणि बंद नाकामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

> अभ्यासानुसार, ढोबळी मिरची खाल्ल्याने चाळीस वर्षांच्या वरील व्यक्तींच्या कोंग्निटिव्ह फंक्शनमध्ये सुधारणा होण्यास मदत होते.

बातम्या आणखी आहेत...