आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशुचिकित्सकाला संसर्ग:मांजरीपासूनही विषाणू संसर्ग होण्याचा धोका, पशुचिकित्सकाला संसर्ग झाल्याचा एका नव्या संशोधनाचा निष्कर्ष

अॅमिली अँथेस14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी कोरोना विषाणूबाधित एका पाळीव मांजरीपासून थायलंडमध्ये एका पशुचिकित्सकाला संसर्ग झाल्याचा एका नव्या संशोधनाचा निष्कर्ष आहे. या मांजरीपासून माणसांमध्ये कोरोना संसर्ग पसरण्याचे हे पहिले प्रकरण आहे. तथापि, एकूणच मांजरींपासून माणसांना संसर्ग होण्याचा धोका खूप कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. थायलंडच्या प्रिन्स सोंगकला विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी लिलिहेल्या रिसर्च पेपरनुसार, मांजरीच्या दोन्ही मालकांनी मांजरीत कोविड-१९ संसर्ग पसरवला असावा.

यानंतर मांजर पशुचिकित्सकाच्या तोंडावर शिंकली असावी. तथापि, मांजर आणि इतर तीन लोकांमध्ये विषाणूचा एकसारखाच व्हेरिएंट आढळल्याचे जीनोम तपासात समजले. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मांजरी माणसांमध्ये संसर्ग पसरवण्याऐवजी माणसांपासून त्यांनाच संसर्ग होण्याची अधिक शक्यता आहे. विषाणूबाधित लोकांनी आपल्या पाळीव प्राण्यांबाबत अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे, असा धडा यातून मिळतो. ओंटारियोतील गुलेप विद्यापीठातील पशूंतील संसर्गजन्य आजारांच्या डॉक्टर स्कॉट व्हीस म्हणतात, प्राण्यांचे मालक आणि व्हेटर्नरी डॉक्टरांनीही सावध राहणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...