आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. अनेक लोक मातेच्या आराधनेसाठी आजपासून 9 दिवसांचा उपवास ठेवतील. या स्थितीत हे जाणून घेणे गरजेचे आहे की 9 दिवस उपवास कसा करावा आणि आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा, जेणेकरून तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही आणि आरोग्यावरही वाईट परिणाम होणार नाही.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते उपवास आपल्या शरीरासाठी चांगला असतो. यामुळे आपल्या शरीरातील ग्रोथ हार्मोन्सची निर्मिती वाढते. यामुळे शरीरात फॅट बर्नची प्रक्रिया वेगवान होते. आयुर्वेदाचार्य डॉ. आर अचल म्हणतात की उपवास शरीरासाठी फायदेशीर आहे. यामुळे पचन संस्थेला आराम मिळतो आणि पचनक्रिया सुधारते. म्हणून आपण उपवासाची प्रक्रिया आणि या दिवसांत काय खाल्ले पाहिजे हे जाणून घेणे गरजेचे आहे.
सांधेदुखी, आर्थरायटिस आणि थायरॉईडपासून मुक्ती
ग्रोथ हार्मोन्स वाढल्याने शरीरात इन्फ्लेमेशने रिड्यूस होते. यामुळे सांध्यांतील सूज कमी होते आणि यामुळे सांधेदुखी आणि आर्थरायटिसची तक्रार हळूहळू कमी होते. याशिवाय उपवासामुळे वार्धक्याची प्रक्रियाही मंदावते. ज्यामुळे वाढत्या वयानुसार होणारे शरीरातील बदल कमी होतात.
उपवासामुळे इन्फ्लेमेटेरी आणि ऑटो इम्युन हेल्थ प्रॉब्लेम्स जसे की आर्थरायटिस आणि थायरॉईडसारख्या आजारांपासून आराम मिळतो.
शरीर होईल डिटॉक्स, गट हेल्थ आणि डायजेशन सुधारेल
सतत 9 ते 10 दिवस उपवास केल्याने शरीर डिटॉक्स होते. यामुळे शरीरात साचलेले डॅमेज्ड प्रोटिन शरीराबाहेर पडतात व नवे प्रोटिन तयार होते. याशिवाय यकृतामध्ये ग्लायकोजेन कमी होऊ लागते. उपवासामुळे गट हेल्थ आणि पचनक्रिया सुधारते. याशिवाय यकृतातील विषद्रव्येही निघून जातात.
7 ते 8 तासांच्या अंतराने खावे
उपवास असल्यास इंटरमिटन्ट फास्टिंग प्रक्रियेने फलाहार करण्याचा प्रयत्न करा. धार्मिक ग्रंथांतही एक दिवसापेक्षा जास्त वेळ उपवासासाठी काही नियम सांगितलेला नाही.
याचा अर्थ आहे की दिवसातून दोन वेळा नक्की खावे. लक्षात ठेवा की जेवणात 7 ते 8 तासांचे अंतर असावे. तुम्ही यादरम्यान पाणी किंवा गरज भासल्यास ज्युस पिऊ शकता. तर तुम्हाला मधुमेह असेल तर उपवास करू नये. यादरम्यान शरीरातील रक्ताची पातळी कमी होऊ शकते जे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
उपवासात तुमचा आहार कसा असावा
उपवासादरम्यान तुमच्या आहारात उच्च कार्बोहायड्रेट जसे बटाटे, साबुदाणा, रताळे यांचा समावेश करावा. साबुदाण्याची खीर किंवा खिचडी खावी. तर रताळे उकडून खाता येईल.
सुका मेवा खा. यामुळे ऊर्जा मिळेल आणि अशक्तपणा जाणवणार नाही. नाष्ट्यात स्किम्ड मिल्सह फळे खावी. याशिवाय दुधासह भिजलेले बदामही खाऊ शकतात. याशिवाय अननस, संत्री, डाळींबाचा ज्युस पिऊ शकता. शरीरात पोषक घटकांची गरज पूर्ण करण्यासाठी केळी, अंगूर, डाळिंब, संत्री अशी फळे खावी. याशिवाय ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते अशी फळे, जसे की टरबूज, अननसला महत्व द्या. उपवासात शरीर हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. यादरम्यान रोज नारळपाणी नक्की प्या.
कोणत्या गोष्टी टाळाव्या
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.