आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचारोळीचा वापर फक्त मिठाई किंवा खीरमध्येच केला जात नाही, तर आरोग्याच्या अनेक समस्यांसाठीही खूप फायदेशीर मानले जाते. प्रोटीनचा खूप चांगला स्रोत असलेले ड्रायफ्रूट आहे.
यामध्ये व्हिटॅमिन बी 1, बी 2 आणि व्हिटॅमिन C देखील भरपूर आहे. चारोळ्यामध्ये लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी अनेक खनिजे आढळतात. आहारतज्ञ मेघा सिंह यांच्यानुसार,आपल्या आहारात चारोळीच्या काही दाण्यांचा समावेश करून आपण अनेक आरोग्य समस्यांपासून मुक्त होऊ शकतो.
मायग्रेनचे दुखणे, पिंपल्स यासारख्या समस्यांपासून सुटका
मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास असल्यास चारोळी बारीक करून कपाळावर लावा किंवा दुधात मिसळून प्या. यामुळे डोकेदुखीपासून सुटका मिळेल.
तुम्ही चेहऱ्यावर पुरळ आणि मुरुमांमुळे त्रस्त असाल तर चारोळीची पेस्ट तयार करा आणि त्यात ऑलिव्ह ऑइल मिसळून चेहऱ्यावर लावा. काही दिवसात पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळेल.
(डायरिया)अतिसारावर गुणकारी
रोज चारोळी खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. जुलाब किंवा डायरिया समस्येने त्रस्त असाल तर चारोळीच्या तेलात बनवलेले दलिया, खिचडी किंवा ओट्स खा.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात चारोळीचा समावेश करा
जर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत आणि संसर्ग किंवा विषाणूमुळे असुरक्षित असेल, तर तुमच्या आहारात चारोळीचा समावेश करा. तुम्हाला सर्दी आणि तापेमुळे त्रास होत असेल तर चारोळीच्या काही बिया दुधात उकळून प्या.
रक्तातील साखर राहील मेंटेन
चारोळीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे अल्सरसारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांनी चारोळी चूर्ण रोज दुधात उकळून पिऊन प्यावे. चारोळीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे ते रक्तातील साखरेचे प्रमाण राखण्याचे काम करते.
केस गळणे थांबवते
केसांच्या पोषणासाठी अतिशय फायदेशीर मानल्या जाणार्या चारोळीमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आढळतात. त्यात मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत, जे केसांना हायड्रेट ठेवते आणि तुटणे टाळते. केसांना चारोळीचे तेल किंवा मास्क लावल्याने केसांना कंडिशनरची गरज भासत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.