आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Child Anger Causes; All You Need To Know About Kids Mental Health, Desorder And Treatment, Measure Your Child's Anger With The 'Anger Thermometer': Crying Over Math Questions, Complaining Over And Over Again, No One To Play With...isn't That A Disorder?

मुलाचा राग 'अँगर थर्मामीटर' ने मोजा:गणिताच्या प्रश्नांवर रडणे, पुन्हा पुन्हा तक्रार करणे, एकटाच खेळणे...हा डिसऑर्डर तर नाही ना ?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

1950 च्या अमेरिकन 'अँग्री बॉय' या डॉक्युमेंट्री मध्ये एका 10 वर्षांच्या मुलाला आपल्या शिक्षकाच्या पर्समधून पैसे चोरत असताना पकडला गेल्याचे दाखवलं होते. याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांना मिळते ती ऐकताच त्यांना धक्का बसतो.

त्यांना खूप आश्‍चर्य वाटते याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शांत आणि हुशार दिसणारे मूल असे कसे करू शकते? मुख्याध्यापक मुलाच्या आईला शाळेत बोलावतात, तक्रार करण्याऐवजी आईला त्या समजावून सांगतात की त्यांच्या मुलाला मानसशास्त्रज्ञांच्या मदतीची आवश्यकता आहे.

मुख्याध्यापकांचे म्हणणे ऐकून मुलाची आई मानसशास्त्रज्ञांना भेटते. त्या मुलाशी अनेक वेळा एकट्यामध्ये बोलल्यानंतर मानसशास्त्रज्ञाला कळते की तो त्याच्या घरातील वातावरण योग्य नसल्यामुळे तो परेशान आहे, अस्वस्थ आहे. म्हणूनच तो शांत राहतो आणि नेहमी काहीतरी विचार करत असतो. जेव्हा त्याला काही विचारले असता त्यावेळी एकतर तो गप्प बसतो किंवा त्याला राग येतो.शेवटी, या मुलाच्या वागण्यामागे सर्वात मोठे कारण सापडते ते म्हणजे त्याच्या पालकांमधील भांडणे, ज्यामुळे घरातील वातावरण बिघडलेले असते. आणि त्याचा परिणाम हा त्या मुलावर होत असतो. अमेरिकेच्या 'द मेंटल हेल्थ' फिल्म बोर्डाने ही माहितीपट बनवला आहे. म्हणजेच 72 वर्षांपूर्वीही मुलांचा राग, हट्टीपणा आणि मानसिक आरोग्य ही एक गंभीर समस्या होती.

जर तुमचे मूलही रागावत असेल किंवा तो हट्टी असेल, तर तुम्ही त्याचा कधी विचार केला आहे का की त्याच्यात या सवयी कुठून आल्या आहेत. घरातील बिघडलेल्या वातावरणामुळे मुलाच्या मनात निराशा वाढू लागते आणि अशा स्थितीत त्याचे मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि या अनेक निर्माण होणाऱ्या प्रश्नामुळे तो गोंधळून जातो. हा गोंधळ त्या मुलाच्या रागाचे कारण बनते. रागाच्या भरात ते मूल ओरडते किंवा आक्रमक होते. जर लहान मुलाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर राग येऊ लागला तर त्याचा थेट संबंध त्याच्या मानसिक आरोग्याशी नक्की असतो.

राग आणि तणाव मुलाचे कौशल्य वाढवू शकतात परंतु…

अमेरिकेतील बाल आणि कौटुंबिक मानसशास्त्रज्ञ, डॉ. जॅझमिन मॅकॉय त्यांच्या प्रसिद्ध पुस्तक 'द अल्टिमेट टँट्रम गाइड'मध्ये लिहितात की मुलांमधील राग आणि तणाव त्यांना त्यांची कौशल्ये सुधारण्यास मदत करतात. 'मॉम सायकोलॉजिस्ट' म्हणून ओळखले जाणारे मॅकॉय पुढे म्हणतात - जर हा राग नेहमीसाठी झाला तर तो आजाराचे रूप घेऊ शकतो. म्हणजेच, तुमच्या मुलाचा राग किंवा तणाव त्याला काही प्रमाणात पुढे जाण्यास मदत करू शकतो, परंतु हे जर वेळीच थांबवले नाही, तर हीच गोष्ट मुल आणि पालक दोघांनाही त्रासदायक ठरू शकते. हे सर्व कसे घडते ते जाणून घेऊया.

जर ही लक्षणे मुलामध्ये दिसली तर त्याच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या.

जर मूल अतिक्रियाशील असेल, रागावल्यावर हाथ-पाय आदळआपटत करत असेल, खूप जास्त बोलत असेल किंवा कमी बोलत असेल, हट्टी असेल, मोठे होऊनही अंथरुणात लघवी करत असेल, गप्प राहात असेल, झोप घेत नसेल, कमी खात असेल, जंक फूड जास्त खात असेल तर या सर्व गोष्टी आपल्याला सुचित करतात की कीआता आपल्याला मुलाच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मानसिक आरोग्य विकार म्हणजे काय आणि मुलांमध्ये तो का होतो हे जाणून घेऊ या...

मेंदूतील रासायनिक बदलांमुळे मानसिक विकार होतो

घरातील किंवा घराबाहेरील वातावरणामुळे निर्माण होणारी चिंता, नैराश्य आणि अस्वस्थता यामुळे मेंदूमध्ये काही रासायनिक बदल होतात. याचा परिणाम मुलांच्या भावनांवर आणि वागण्यावर होतो. अशा स्थितीत मुलाच्या मेंदूमध्ये एक प्रकारचे रसायन बाहेर पडते, जे न्यूरोट्रांसमीटर म्हणून ओळखले जाते. हे रसायन सतत सक्रिय असते आणि मेंदूच्या चेतापेशींना संदेश पाठवत असते. तूम्हाला सांगायचे म्हणजे चेतापेशी या मेंदूकडून शरीराच्या इतर भागात सूचना वाहून नेण्याचे काम करते. उदाहरणार्थ, तहान लागल्यावर मेंदूच्या चेतापेशी हाताला सुचना देतात की पाण्याचा ग्लास हातात घे आणि त्या ग्लासातील पाणी तोंडापर्यंत नेण्याची आज्ञा देतात.

प्रत्येक व्यक्तीची विचारधारा आणि प्रत्येक कृती या रसायनाद्द्वारे ठरवली जाते. या रसायनाच्या असंतुलनामुळे बालकांना मानसिक विकारांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

केंब्रिज विद्यापीठाचे प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ मायकेल अँडरसन यांच्या मते, मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरमध्ये GABA नावाचा रासायनिक मित्र देखील असतो. या GABA चे मुख्य काम म्हणजे न्यूरोट्रांसमीटरचे संतुलन राखणे आहे, परंतु मेंदूमध्ये इतर काही रसायने आहेत जी न्यूरोट्रांसमीटर असंतुलित होताच सक्रिय होतात. त्यामुळे GABA नेहमी त्याच्या कामात यशस्वी होतोच असे नाही. याचा परिणाम असा होतो की आपण रागात आणि दुःखात शांतपणे राहून कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे रसायनांच्या या असंतुलनामुळे मुलामध्ये राग, चिडचिड आणि अस्वस्थता निर्माण होते.

मेंदू हा आपल्या स्वतःमध्ये आठवणी साठवून ठेवतो. मेंदूच्या या भागाला हिप्पोकॅम्पस म्हणतात. या भागात असलेला GABA हा मुलाला भीतीमुळे येणारे वाईट विचार आणि स्वप्ने थांबवण्यास मदत करतो. म्हणजे, एखादी वाईट गोष्ट पाहिली किंवा लक्षात आली की आपल्याला होणाऱ्या भीतीपासून वाचवते.

मुलांच्या सवयींमध्ये लपलेली असतात मानसिक आजाराची लक्षणे

राग, घरातील वातावरणामुळे होणारी अस्वस्थता आणि त्यामुळे होणारा मानसिक धक्का याचा परिणाम मुलांच्या सवयींवर होतो. यामुळे मुलांमध्ये पाच प्रकारचे भावनिक विकार निर्माण होऊ शकतात. मुलांच्या कोणत्या सवयीमागे कोणता आजार लपलेला असू शकतो ते समजून घेऊया.

1- रिएक्टिव एडजस्टमेंट डिसऑर्डर (RAD)

अशी मुले इतर मुलांच्या तुलनेत अतिशय मोजक्या भावना व्यक्त करतात. त्यांच्यासोबत वाईट वागले तरी त्यांना पश्चाताप होत नाही. चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत भावना भडकल्या तरीही अशी मुले आपली प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत. अशा मुलांना पाहून तुम्हाला वाटेल की त्यांना आई-वडिलांच्या प्रेमाची आणि काळजीचीही आवश्यकता नाही, पण प्रत्यक्षात तसे नसते. अशा मुलांना त्यांच्या गरजा आणि मनातील भाव व्यक्त करणे जमत नाही. या मुलांकडून त्यांची आवडती खेळणीही कोणी काढून घेतली तरी ते नाराज होत नाहीत.

2- एडजेस्टमेंट डिसऑर्डर (AD)

हा आजार मुलांच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना किंवा अचानक झालेल्या बदलांमुळे होतो. यामध्ये, मुलाची प्रतिक्रिया भावनिक असू शकते, जसे की मूलाचे उदासीन, दुःखी होणे, अचानक घाबरणे. या समस्येने ग्रस्त असलेले मूल उद्धटपणाने किंवा इतरांशी वाईट व्यवहार करू शकतो.

3- पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD)

या समस्येने आजारी असलेली लहान मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांना सतत वाईट विचार येतात. ते बहुतेक फक्त वाईट गोष्टींचाच विचार करतात. त्यांचे मन वाईट घटनांच्या आठवणीत किंवा अप्रिय घटनांच्या फ्लॅशबॅकमध्ये मग्न राहते. म्हणजेच त्यांच्या मेंदूला साठवून ठेवणारा हिप्पोकॅम्पस हा भाग त्यांना त्या घडलेल्या वाईट गोष्टींची आठवण करून देत राहतो. यामुळे अशी आजारी मुले कमी झोपतात, शाळेत भांडणं किंवा अस्वस्थ दिसू शकतात. मूल अनेक ठिकाणी जाण्याचे टाळतात आणि घाबरतात. या मुलांमध्ये नैराश्य, डोकेदुखी किंवा पोट दुखण्यासारखे लक्षणेही दिसून येतात.

4- एक्यूट स्ट्रेस डिसऑर्डर (ASD)

या आजाराची लक्षणे PTSD (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) सारखीच असतात. ते एखाद्या अतिशय वाईट घटना किंवा भावनिक घटना घडल्यानंतर काही दिवसांनी किंवा एक किंवा दोन महिन्यांत दिसतात. अशा परिस्थितीत, मानसोपचार तज्ज्ञांची त्वरित मदत घेतल्यास ASD ची समस्या बरी होते. तसेच, PTSD सारख्या समस्यांचा धोका टळतो.

5- डिसहिबिटेड सोशल एंगेजमेंट डिसऑर्डर (DSED)

या आजाराने ग्रस्त असलेली मुले अनोळखी लोकांशी संवाद साधण्यास सोयीस्कर असतात. त्यांना इतरांमध्ये मिसळायला जास्त वेळ लागत नाही. अशी मुले कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत जायला तयार असतात. कधी कधी ते पालकांना न सांगता अनोळखी व्यक्तींसोबत कोठेही फिरायलाही निघून जातात.

मुलांमध्ये अशी लक्षणे दिसली तर त्याचा सामना कसा करावा

अनेक संशोधकांचे असे म्हणणे आहे की बहुतेक पालक आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलणे टाळतात. त्यांना या विषयावर बोलायला लाज वाटते. त्यामुळेच अशा विषयांवर चित्रपट, नाटके, पथनाट्ये तयार केली जातात, बॅनर लावले जातात. ज्यामुळे लोकांना या विषयाची जास्तीत जास्त माहिती मिळावी आणि त्यांना या विषयाचे गांभीर्य लक्षात यावे.

चाइल्ड काउंसलर डॉ.राजीव मेहता सांगतात की, मुलांमध्ये राग, तणाव यासारखी लक्षणे सतत दिसत असतील, तर नाराज होण्याऐवजी पालकांनी समजून घेऊन त्या समस्या सोडविण्याचे मार्ग समजून घेतले पाहिजे. मुलाला आलेल्या रागावर मुलाला जाणून घेण्याचा आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, उलट त्याच्यावर रागावू नका.

आता आम्ही तुम्हाला सांगत आहोत की मुल या समस्यांशी झुंजत आहे हे कसे समजावे…

1- जेव्हा सहा वर्षांचे समजूतदार मुल वारंवार रागराग करत असेल

मुलं लहान वयात खूप राग व्यक्त करतात, पण वयाच्या 6 वर्षानंतर मुलांना त्यांच्या भावना समजू लागतात, तसेच ते स्वतःवर नियंत्रण ठेवायलाही शिकतात. वयाच्या सहा वर्षानंतरही जर तुमचा मुलगा रागराग करत असेल त्याचा अर्थ असा की त्याला एंगर म्हणजे रागाच्या समस्येने ग्रासले आहे. जर मुल त्याची खेळणी योग्य ठिकाणी ठेवत नसेल, शाळेसाठी तयार होताना त्रास देत असेल, गृहपाठ वेळीच करत नसेल, जर यागोष्टी तो एकावेळी सांगितल्यानंतरही ऐकत नसेल त्याला वारंवार सांगावे लागत असेल किंवा त्याला त्यासाठी मोठ्याने रागवावे लागत असेल तर अशी लक्षणे चांगली नाहीत. .

2- गणिताच्या प्रश्नांवर तो चिडत असेल किंवा शाळेतून त्यांच्या वर्तणुकीवरून वारंवार सुचना येत असतील

मुलांना प्रत्येक स्पर्धेत जिंकायचे असते. तसे झाले नाही तर ते निराश होतात, पण त्यांची चिडचिडेपणा आणि राग जास्त काळ टिकत असेल तर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. जर मुल गणिताच्या प्रत्येक अध्यायात रडायला लागला तर समजून घ्यावे की त्याला समस्येने ग्रासले आहे.जर मुल शालेय उपक्रमांमध्ये भाग घेत नसेल आणि मुलाच्या शाळेतील प्रोग्रेस रिपोर्ट व्यवस्थित नसेल आणि शिक्षकांचे वेळोवेळी निरोप किंवा तक्रार येत असतील तर अशावेळी शिक्षकांना भेटून मुलाचे वर्तन समजून घेणे आवश्यक आहे.

3- तुमच्या मुलाशी कोणीही खेळत नाही किंवा तुमचे मूल तक्रार करते

मुलाची इतर मुलांशी असलेली मैत्रीही त्याची समस्या समजून घेण्यास मदतच करते. जर तुमच्या मुलासोबत शाळेत कोणी खेळत नसेल. जर तुमचे मूल प्रत्येक गेममध्ये जिंकण्यासाठी स्वता नियम बदलत असेल किंवा हार झाली तर खेळणे सोडून देत असेल किंवा हरल्यावर मारामारी करत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. जर प्रत्येक वेळी मुल असे म्हणत असेल की दुसऱ्या मुलानेच पहिल्यांदाचा त्याच्याशी भांडण सुरू केले आहे किंवा ते म्हणत असेल की शिक्षकच त्याला चांगले शिकवत नाहीत आणि त्याच्याशी चांगला व्यवहार करत नाही आणि जर मुलाने त्याच्या रागाचे समर्थन केले तर त्याची ही समस्या चिंतेची बाब आहे. मुलाच्या या वागण्याला ब्लेम गेम असे म्हणतात.

4- मुलाला प्रत्येक गोष्टीचा राग येतो आणि मग रडायला लागते

जर मुलाला प्रत्येक गोष्टीचा राग येत असेल तर समजून घ्या की त्याच्या आतल्या भावना आणि ऊर्जा योग्यरित्या बाहेर पडत नाही. ज्यावेळी त्याला राग येतो तेव्हा रागात तो आदळआपट करत असेल आणि शेवटी रडायला लागते. जर मुल असे सतत वागत असेल तर पुढे जावून अशी मुले स्वतावरच राग काढत असतात.

5- हातपाय मारणे किंवा आपल्याला दुख व्हावे यासाठी वाईट अथवा चुकीचे बोलणे

मुल जर रागाने जमीनीवर हात-पाय मारू लागला किंवा जमिनीवर लोळत असेल. त्याच्या हातात जे आले ते फेकून देत असेल किंवा तूम्हाला मारत असेल तर वेळीच सावध व्हा. अशी मुले त्यांची आवडती खेळणी फोडतात किंवा फेकून देतात. तुमचे लक्ष स्वताकडे वेधून घेण्यासाठी आणि तुमची त्याने केलेल्या कृतीवर प्रतिक्रिया पाहण्यासाठी कोणत्याही थराला जातात किंवा तुम्हाला दुखावण्यासाठी अयोग्य भाषा वापरतात तर ही परिस्थिती चिंताजनक आहे.

मुलांचा राग शांत करण्यासाठी सुरुवातीपासूनच काही उपाय योजना करावे लागतील...

1- मुलाच्या रागाला घाबरुन जावू नका, तो ओरडला तर तूम्ही ओरडू नका

तुमच्या मुलाच्या रागाशी लढण्याऐवजी त्याच्या रागाला प्रेमाने सामोरे जा आणि रागावर नियंत्रण ठेवायला शिकवा. हे एक कौशल्य आहे जे त्याला तो मोठा झाल्यावरही त्याच्या कामी येईल. जर मुल तुमच्यावर ओरडत असेल तर तुम्ही त्याच वेळी त्याच्यावर ओरडणे योग्य नाही. यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. पालकांनी हे समजून घेणे महत्वाचे आहे की तीन वर्षांच्या वयापासून मुलाला ज्या सवयी विकसित होत आहेत त्या त्याच्या विकासाचा एक भाग आहेत. मुलांसाठी चांगल्या सवयी निश्चित करणे ही पालकांची जबाबदारी आहे.

म्हणजेच जेव्हा मूल रागावते तेव्हा त्याने तुम्हाला त्याची नाराजी कसे सांगावे, यासाठी पालकांनी मुलाला आपल्या भावना कशाप्रकारे व्यक्त करायच्या हे समजावून सांगावे. त्याला काय बोलावे आणि कसे बोलावे ते शिकवा. जसे मुलाने सांगावे की मला राग आलाय, मी चांगले वाटत नाही, मी आनंदी नाही, मला ते आवडत नाही. म्हणजेच, मुलाने हे शिकले पाहिजे की भावना व्यक्त करणे चांगली गोष्ट आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने व्यक्त करणे योग्य नाही.

2- मुलांना शिकवा भावना व्यक्त करण्याची भाषा

मुलांना राग आल्यावर काय होते ते शिकवा. कौटुंबिक आणि बाल मानसशास्त्र तज्ज्ञ मॅकॉय देखील हेच सांगतात की अशा वेळी थोडा वेळ थांबून रागाच्या वेळी शरीरात काय बदल होतात किंवा शरीराला कसे वाटते हे जाणून घेतले पाहिजे. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय वाटत आहे हे तुम्हाला कसे कळेल? हा एक महत्त्वाचा अनुभव आहे.

3- समस्येला नाव द्या जेणेकरून ते सोडवता येईल

अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॅन सिगेल यांच्या मते, जेव्हा तुम्हाला मनावर खूप ताण तणाव असेल आणि त्यामुळे नैराश्य जाणवत असेल तेव्हा तुम्ही त्या समस्येला समजून घ्या आणि त्या समस्येला एखादे नाव देऊन तुमची समस्या 50 टक्क्यांनी कमी करू शकता. डॅनने आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्याला एक नाव दिले आहे. ते म्हणजे 'नेम इट टू टेम इट' म्हणजेच समस्या ओळखा आणि ती सुधारण्यासाठी त्याला नाव द्या. सर्व बालविकास तज्ञांचे मत सुद्धा या सारखेच आहे.

डॅनचा असाही विश्वास आहे की मुलांना त्यांच्या भावना ओळखण्यास आणि त्यांना नाव देण्यास शिकवले पाहिजे, जेणेकरुन जेव्हा मूल त्या परिस्थितीतून जाईल तेव्हा तो त्याबद्दल बोलू शकेल. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी, त्याला इतर मुलांची फोटो दाखवा ज्यामध्ये मुल हसत आहेत, मुले हसताना दिसत आहेत किंवा रागावलेले दिसत आहेत.

4- जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा मुलांना नक्की सांगा

अनेकदा पालकांना असे वाटते की त्यांनी आपल्या मुलांचे त्यांच्या इमोशंसपासून दूर ठेवले पाहिजे, किंवा त्यांना ते कळू दिले नाही पाहिजे, मात्र, रागाच्या भरात किंवा निराशेच्या वेळी मुलांसमोर आपल्या भावना व्यक्त करणे हा मुलांसाठी धडा ठरू शकतो. मात्र, प्रत्येक वेळी तुम्ही जर तसेच कराल तर मूल तुमची नाराजी हलकेच घेऊ शकते. त्यासाठी मुलाच्या कोणत्या वागणुकीवर आपली नाराजी कशी व्यक्त करायची हे तूम्हाला ठरवायचे आहे.

5- खोल श्वास घेणे किंवा उलट मोजणी शिकवा

मुलाला त्यांचा राग कमी करण्यासाठी हा एक प्रकारचा प्रयोग आहे ज्यामध्ये पालक अनेक पद्धतीने ते करू शकतात. काही मुले दीर्घ श्वास घेऊन राग शांत करण्यात यशस्वी होतात, तर काहींना उलट मोजणी मदत करते. त्याच वेळी, काही मुलांना राग कमी करण्यासाठी शारीरिक श्रम करावे लागतात.

मॅकॉय पुढे म्हणतात की मुलांना शिकवा आनंदी होणे, उदास होणे याप्रमाणे रागावणे सुद्धा स्वाभाविक क्रिया आहे. फक्त त्यांना राग कसा व्यक्त करायचा ते शिकवा आणि तो कमी करण्यासाठी युक्त्या किंवा कौशल्य पण शिकवा.

6- मुलाच्या मनाचेही ऐका

पालकांनी लक्षात ठेवावे की, मुलांना अशा सर्व संधी द्याव्यात जेथे ते पालकांसमोर त्यांच्या भावना सहजपणे व्यक्त करू शकेल. पालकांशी मुलांचे हे कनेक्शन आवश्यक आहे. मुलांशी सतत संवाद साधला पाहिजे, जेणेकरून ते त्यांच्या भावना व्यक्त करण्यास सोयीस्कर असतील आणि त्यांचे विचार खुलेपणाने व्यक्त करू शकतील. रागाच्या भरात जर मुलाला ते व्यक्तच करता येत नसेल तर ही गोष्ट त्याला आयुष्यभर त्रास देईल. एकतर तो राग दाबेल किंवा तो आक्रमक किंवा अयोग्य वागेल.

7- जर मुलाला राग आला तर त्यांना पेंटिंग किंवा कलरिंग करायला सांगा

रागाचं कारण जाणून घेणं गरजेचं आहे, योग्य पद्धती आणि शब्द निवडण्यासोबतच मुलांच्या वागणुकीतही बदल जाणवेल. मुलांना राग यायला लागल्यावर काय करावे हे शिकवा. उदास असताना वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांच्या खोलीत किंवा शांत ठिकाणी जायला सांगा. त्यांना बरे वाटेपर्यंत पेंटिंग, कलरिंग किंवा काही गोष्टी एक्टिव्हिटी करण्यास सांगा ज्यात त्यांना आनंद वाटतो. याशिवाय मुलाला आवडता खेळ किंवा खेळणी द्या. असे केल्याने, ते देखील शांत होतील, त्यातूनच ते स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास शिकतील आणि भविष्यात त्याच्या वागणुकीतून जबाबदार होतील

8- राग व्यक्त करणारे शब्द मुलाला माहीत असावे

मुलांना प्रथम रागाची भाषा आणि शब्दावली शिकवा जेणेकरून ते त्यांना योग्यरित्या ओळखू शकतील आणि राग पालकांपर्यंत पोहोचवू शकतील. त्यासाठी आनंद, दुःख, भीती, निराशा, एकटेपणा अशा भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांचा अर्थ मुलाला कळायला हवा. पालकांनी त्यांना हे शब्द समजून घेण्यास मदत करावी

9- मुलांना अँगल थर्मामीटर बनवायला शिकवा

मुलांना एका कागदावर अँगल थर्मोमीटर बनवायला शिकवा, ज्यामध्ये शून्य ते 10 अंक असतील. या थर्मामीटरमध्ये शून्य म्हणजे 'मी रागावलेला नाही'. 5 म्हणजे 'मला थोडा राग येतो' आणि 10 म्हणजे 'मला जास्त राग येतो' जेव्हा मुलाला राग येऊ लागतो तेव्हा त्याला या थर्मामीटरवर नंबर लिहायला सांगा. यामुळे मुलाला रागावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होईल.

10- राग कमी होत नसेल तर अँगर मॅनेजमेंट काउंसेलिंग' करा

इतके प्रयत्न करूनही जर मुलाचा राग कमी झाला नाही तर त्याला वैद्यकीय मदतीची गरज भासू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे मूल लहानसहान गोष्टींवर रागावते, तर मानसिक आरोग्य व्यावसायिकांना भेटा. मुलाच्या रागामागील कारणे ओळखून तो 'अँगर मॅनेजमेंट काउंसेलिंग' करतो.

बातम्या आणखी आहेत...