आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:मुलांची खेळणी, कारचे इंटेरिअर, सोफ्यात आगीपासून बचावासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनामुळे कर्करोगाचा मोठा धोका : संशोधन

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरगुती वापराच्या वस्तूंतील फ्लेम रिटार्डेंटबाबत अमेरिकी संशोधक करतेय जनजागृती

लिझा ग्रॉस
ड्यूक विद्यापीठातील केमिस्ट डॉ. हिदर स्टेपल्टन खेळण्यांना आगीपासून बचावासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी रसायनावर त्यांच्या सहकाऱ्यासोबत चर्चा करत होत्या. जवळच त्यांचा एक वर्षाचा मुलगा खेळत होता. त्यांचा मुलगा ज्या पॉलिस्टर टनलसोबत खेळत होता त्यावरील टॅग बघून ते दचकले. त्यावर लिहिले होते की, कापड ज्वलनशील मानकांच्या दृष्टीने तयार केले आहे. टनलच्या कपड्यात केमिकल फ्लेम रिटार्डेंटचा वापर करण्यात आला होता. डॉ. स्टेपल्टन यांनी त्या कापडाची प्रयोगशाळेत तपासणी केली. त्यात फ्लेम रिटार्डेंट म्हणून क्लोरिनेटेड ट्रिस केमिकलचा वापर केल्याचे बघून त्यांना धक्का बसला. ते कर्करोगाला कारणीभूत ठरते. तसेच थेट डीएनएतही बदल करण्याची त्यात क्षमता असल्याने पायजमा तयार करणाऱ्या कंपन्यांनी अनेक वर्षांपूर्वी या रसायनाचा वापर बंद केला होता.

१९७०च्या दशकात फ्लेम रिटार्डेंटचा वापर ज्वलनशील मानक पूर्ण करण्यासाठी सुरू झाला. मात्र, आता नर्सिंग पिलो, बेबी प्रॉडक्ट, मुलांच्या ट्रॉली, कारचे इंटेरिअर, सोफा, पलंग, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम साहित्य, कपडे आदींत आगीपासून बचावासाठी रसायन म्हणून त्याचा वापर होतो. त्यात क्लोरीन, ब्रोमीन वा फॉस्फरस असल्याने ते धोकादायक असल्याची चिंता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. अमेरिकेत मुलांच्या खेळण्यांत फ्लेम रिटार्डंेटचा वापर थांबवण्याचे नियम नाहीत. संशोधकांनी अनेकदा फ्लेम रिटार्डेंटच्या आरोग्यावरील गंभीर परिणामांचा मुद्दा उपस्थित केला, मात्र सरकारने त्यावर बंदी घातली नाही. सरकारची वाट न बघता डॉ. स्टेपल्टन यांनी कोणत्या खेळण्यांमध्ये जीवघेण्या रसायनाचा वापर होतो हे शोधण्यात आयुष्य घातले. त्या अशा रसायनाचा वापर टाळण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता आणत असून कंपन्यांनाही सल्ला देत आहेत.

हार्मोन असंतुलनच नव्हे तर, मुलांची आयक्यू लेव्हलही करते कमी
विविध फ्लेम रिटार्डेंटवरील संशोधनात आढळले की, त्यापासून आरोग्याचे मोठे नुकसान होते. ब्रोमीन फ्लेम रिटार्डेंटमुळे कर्करोग होऊ शकतो. ते हार्मोन्सला असंतुलित करू शकते. रिप्रॉडक्टिव्ह सिस्टिमचे नुकसान करू शकते. एवढेच नव्हे तर मुलांमध्ये आयक्यू लेव्हल कमी होणे, वर्तणूक समस्या तसेच हायपर अॅक्टिव्हिटी, आक्रमकता, गुंडगिरीसारखी समस्याही होऊ शकते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser