आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविड-19 आणि इम्युनिटी:पूर्ण झोप, संतुलित जेवण, नियमित व्यायामच रोगप्रतिकारक शक्तीसाठी सर्वात फायदेशीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चांगल्या प्रतिकारक शक्तीसाठी तणावापासून दूर राहा

देशभरात सध्या रोगप्रतिकारक शक्तीबाबत (इम्युनिटी) चर्चा सुरू आहे. वेगवेगळे दावे केले जात आहेत. वैद्यकीयशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास इम्युनिटी बूस्टरसारखे काही नसते. आपल्या शरीरातच रोग प्रतिकारक क्षमता ए‌वढी सक्षम असते की, ते आजारांचा मुकाबला करू शकते. बहुधा लोकांत अँटीव्हायरल तत्त्वं आणि इम्युनिटी यावरून संभ्रम निर्माण होतो. लिंब आणि हळदीत अँटीव्हायरल घटक असतात. पण कोविडविरोधात उपचार म्हणून ते कितपत प्रभावी आहेत, हे सिद्ध व्हायचे आहे. 

हळदीचे जास्त प्रमाणात सेवन केले जात आहे, तेही शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. त्याच्या सेवनाने ब्लीडिंगसारखी अडचण येऊ शकते. शरीराला नेहमी डिफॉल्ट सेटिंगवर ठेवा. ईश्वराने बनवले आहे तसे. चांगली झोप घ्या, नियमित व्यायाम करा आणि तणावापासून दूर राहा. तुम्हाला इम्युनिटी वाढवण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज भासणार नाही.

इम्युनिटी आणि अँटी व्हायरल घटकांमध्ये असा आहे फरक

एखादे औषध किंवा जेवण इम्युनिटी वाढवू शकते का?

फक्त जेवण आणि औषधे यांचा इम्युनिटीशी संबंध जोडला तर ते चुकीचे ठरेल. कुठल्याही आजाराच्या विरोधात शरीराची प्रतिसाद यंत्रणा अनेक घटकांवर आधारित असते. उदा. आठ तासांची झोप, संपूर्ण विश्रांती, संतुलित जेवण, तणावापासून मुक्ती, नियमित व्यायाम. त्यामुळे शरीरात इंटरफेरॉन्स बनण्यात मदत होते. इंटरफेरॉन्स हा एक घटक आहे, जेव्हा शरीरावर एखाद्या विषाणूचा हल्ला होतो तेव्हा त्या स्थितीत आपल्या पेशी तो रिलीज करतात.

अँटी व्हायरल आणि इम्युनिटी बूस्टरमध्ये फरक काय?

लिंब आणि हळदीत अँटीव्हायरल घटक असतात. बंगालमध्ये पूर्वीपासून लोक कांजण्यापासून बचावासाठी वांग्यासोबत लिंबू खातात. लिंबामुळे कांजण्यापासून बचाव होतो, याचा वैद्यकीय दाखला नाही, पण त्यात त्याची मदत निश्चित होऊ शकते. हळदीत करक्युमिन नावाचा घटक असतो. तो हळदीत ३% असतो. त्यातील फक्त १०%च शरीर शोषून घेते. हळदीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास ब्लीडिंग होऊ शकते.

इम्युनिटीचे पहिले चक्र : इंटरफेराॅन

जेव्हा विषाणूचा हल्ला होतो तेव्हा शरीर इंटरफेरॉन्स सोडते. तो बहुतांश विषाणूंना पहिल्या टप्प्यातच संपवतो. जेव्हा शरीर विश्रांती घेते, तेव्हा इंटरफेरॉन्स रिलीज होतात. त्यामुळे डॉक्टर विश्रांतीचा सल्ला देतात.

दुसरे सुरक्षा चक्र : पांढऱ्या पेशी

रक्कात पांढऱ्या पेशी असतात, त्यात एक प्रकार सायटोटॉक्झिक पेशींचा असतो. त्या संसर्गाच्या संपर्कात येतात आणि परफॉरिन नावाच्या रसायनाने त्याला छिद्र पाडतात. ग्रेंझाइम्स रिलीज करून त्यांना नष्ट करतात. या प्रक्रियेत त्याही नष्ट होतात.

तिसरे सुरक्षा चक्र : अँटी बॉडीज

विषाणूशी लढताना आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम अँटी बॉडीज तयार करते. या अँटी बॉडीजच आपल्या शरीराला पुन्हा विषाणूंपासून संक्रमित होण्यापासून वाचवतात. लसही साधारणत: अशाच यंत्रणेवर काम करते.

डॉ. देबाशीष दांडा

प्रोफेसर आणि संस्थापक, क्लिनिकल इम्युनॉलॉजी अँड ऱ्ह्यूमेटॉलॉजी, सीएमसी वेल्लोर.

बातम्या आणखी आहेत...