आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Computer programmer builds covid 19 face mask with an array of voice activated led lights that show when a person is speaking

हसणारा मास्क :कोरोनापासून बचाव करणारा LED मास्क, जो सांगेल आपण कधी बोलता आणि कधी हसता; एका मास्कची किंमत तब्बल 3800 रुपये 

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुमारे एक महिन्याच्या अथक परिश्रमानंतर गेम डिझायनर आणि प्रोग्रामर टेलर ग्लेयल यांनी हा मास्क डिझाइन केला आहे.
  • कपड्याच्या या मास्कमध्ये 16 एलईडी लाईट आहेत, जे मानवाचे वेगवेगळे एक्सप्रेशन्स दर्शवतात.

गेम डिझायनर आणि प्रोग्रामर टेलर ग्लेयल यांनी एक खास मास्क तयार केला आहे. हा मास्क लावून बोलल्यानंतर यातील एलईडी लाइट प्रकाशतात. हा प्रकाश समोरची व्यक्ती कधी बोलते आणि कधी शांत असते हे सांगतो. हा मास्क लावून जेव्हा तुम्ही  हसाल तेव्हा स्माइलीचे चिन्ह त्यावर तयार होते. कपड्याच्या या मास्कवर 16 एलईडी लाइट आहेत.

याची रचना करणारे प्रोग्रामर टेलर म्हणाले की, मला याची गरज भासू लागली आणि तेथून असा मास्क तयार करण्याची कल्पना जन्माला आली. मग, एका महिन्याच्या कठोर परिश्रमानंतर ते तयार झाले. एका मास्कची किंमत सुमारे 3800 रुपये आहे.

कल्पना अचानक मनात आली

अमेरिकन प्रोग्रामर टेलर यांच्या म्हणण्यानुसार, मास्कमध्ये एलईडीशी जोडलेला एक व्हॉईस पॅनेल आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शांत राहते किंवा बोलते तेव्हा त्यातील लाइट्स लागतात. अचानक मास्क बनवण्याची कल्पना मनात आली, असे टेलर म्हणतात. मी खरं तर ऑनलाइन अशा मास्कच्या शोधत होतो, पण जेव्हा मला तो सापडला नाही तेव्हा मी स्वतः तयार केला.

मास्क धुण्यापूर्वी त्यातील एलईडी लाइट काढता येऊ शकतात

टेलर म्हणतात, हा मास्क तयार करण्यास मला एक महिन्याचा कालावधी लागला. हा मास्क कापडाचा असून वॉशेबल आहे. जेव्हा तुम्हाला हा मास्क धुवायचा असेल, तेव्हा त्यातील एलईडी लाइट पॅनेल काढता येऊ शकते. यात 9 वॉल्टची बॅटरी आहे जी एलईडी पॅनेलला सपोर्ट करते.  


यूवी लॅम्पने सॅनिटाइज करणे सोपे 

टेलर यांच्या म्हणण्यानुसार, मास्कचा कापड काढल्यानंतर, त्यातील इतर गोष्टी नियमितपणे यूवी लॅम्पने सॅनिटाइज केल्या जाऊ शकतात. एका मास्कची किंमत सुमारे 3800 रुपये आहे. ते म्हणाले, मी सध्या हा मास्क माझ्यासाठी बनवला आहे, तो विकण्याची माझी सध्या तरी कोणतीही योजना नाही.

हा मास्क धुण्यापूर्वी त्यातील एलईडी लाइटचे पॅनल काढता येऊ शकते.

हा मास्क मुलांसाठी नाही

टेलर म्हणतात की, हा मास्क जे लोक खूप वेळ काम करतात, ते वापरु शकत नाहीत. कारण यात एलईडी लाइट्स आहेत, जे काही तासांनंतर गरम होतात. म्हणून हा मास्क मुलांसाठी  योग्य नाही.

0