आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या काळात डोळे:डोळ्यांसाठी योग्य फाँट, भरपूर पाणी गरजेचे, 20-20-20 चे सूत्र वापरा

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑनलाइन शिक्षणाच्या दिवसांत अशी घ्या डोळ्यांची काळजी

कोरोना काळात मुलांचा मोबाइल फोनसोबत घालवला जाणारा वेळ वाढला आहे. मग तो ऑनलाइन शिक्षणासाठी असो की गेम खेळण्यासाठी. मोबाइलचे अनेक फायदे असले तरी डिजिटल उपकरणांच्या अत्याधिक वापरामुळे डोळ्यांवर दुष्परिणाम होतो हे निश्चित. पण डिजिटल लर्निंग आता न्यू नॉर्मल आहे आणि आता ही स्थिती दीर्घ काळापर्यंत राहणार आहे. मोबाइल फोनच्या अत्यधिक वापरामुळे डोळ्यांवर रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा परिणाम सर्वाधिक होतो. लहान मुलांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यांची नर्व्हस सिस्टीम पूर्णपणे विकसित झालेली नसते. डोळ्यांची ही समस्या कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम किंवा डिजिटल आय स्ट्रेन या नावाने ओळखली जाते. फोन किंवा डिजिटल उपकरणांच्या अत्याधिक वापरामुळे झालेल्या आहेत अशा सर्व समस्या यातही येतात. त्यामुळे थोडी काळजी घेतली तर तुम्ही तुमचे स्वत:चे आणि तुमच्या मुलांचे डोळे सुरक्षित ठेवू शकता. कोणती काळजी घेता येऊ शकते हे येथे जाणून घेऊया.

गॅजेटचा जास्त वापर करत असाल तर खालीलप्रमाणे काळजी घ्या

1. डेस्कवर काम करताना कॉम्प्युटर स्क्रीन डोळ्यांच्य पातळीपेक्षा थोडा खाली २० इंच अंतरावर किंवा आपल्या हाताच्या लांबी एवढ्या अंतरावर ठेवा.

2. जर मुलाला पूर्वीपासूनच कमजोर दृष्टीमुळे चष्मा लागला असेल, तर कॉम्प्युटर किंवा मोबाइल वापरताना चष्मा अवश्य लावायला सांगा.

3. स्क्रीन पाहताना आपण पापणी लवणे विसरतो. त्याची आठवण ठेवा, त्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा आणि धूसर दिसणे या समस्यांपासून तुमचा बचाव होईल.

4. स्क्रीन सतत पाहणे टाळावे. प्रत्येक २० मिनिटे स्क्रीन पाहिल्यानंतर डोळे २० सेकंद अवधीसाठी २० फूट दूर पाहून ब्रेक द्या.

5. आपल्या गॅजेटचे स्क्रीन नेहमी स्वच्छ ठेवा. कोरड्या फडक्याने ते पुसत राहा. त्यावर बोटांचे ठसे उमटू देऊ नका.

6. स्क्रीनजवळ आणि जवळपास पुरेसा प्रकाश असेल याची काळजी घ्या. गॅजेटचे ब्राइटनेसही मेंटेन करा. म्हणजे ब्राइटनेस खूप कमी किंवा खूप जास्त नसावा.

7. थकल्यानंतर डोळे चोळणे टाळावे. कारण यामुळे डोळ्यांत संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते.

8. मोबाइलवर वाचताना अत्यधिक तणाव टाळण्यासाठी फाँटचा आकार बदलून तो मोठा करावा.

9. मुलांना पुरेशी झोप आणि भरपूर पाणी पिण्यास सांगावे, कारण पाणी कमी प्यायल्याने डोळ्यांतील कोरडेपणाची लक्षणे वाढू शकतात.

जगभरातील संशोधनांत या पद्धतीही सांगितल्या आहेत..

- स्मार्टफोन, कॉम्प्युटर वा टॅब्लेटच्या स्क्रीनवर मॅट स्क्रीन फिल्टर लावा. चमक कमी होईल.

- डिव्हाइसच्या सेटिंगमध्ये नाइट मोड आणि ब्लू लाइट फिल्टरचा वापर करा.

- डार्क थीमचा पर्याय असल्यास तो निवडा. डोळ्यांवरील ताण कमी होईल. व्हॉट्सअॅपसारख्या अॅप्ससाठी हा पर्याय उपलब्ध आहे.

- मोठ्या स्क्रीनवर रिझोल्युशन वाढते. म्हणून कॉम्प्युटर वा लॅपटॉपची स्क्रीन २० इंचांपेक्षा कमी नसेल, याची काळजी घ्या.

डॉ. सुनीता दुबे

वैद्यकीय अधीक्षक प्रमुख-ग्लुकोमा सर्व्हिसेस

डॉ. श्राॅफ चॅरिटी नेत्रालय, नवी दिल्ली

बातम्या आणखी आहेत...