आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोविड-19 आणि गर्भावस्था:गर्भातील शिशूला धोका नाही, पण गर्भावस्थेच्या अखेरच्या महिन्यात आईला संसर्गाची जास्त भीती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या या काळात डिसेंबरपर्यंत देशात होणार 2 कोटी मुलांचा जन्म

कोरोना संसर्ग विश्वस्तरीय महामारी आहे, ती गर्भवती महिलांत जास्त गंभीर रूपात दिसू शकते, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती सामान्य महिलांंपेक्षा बरीच कमी झालेली असते. तसेच शरीरात खूप बदल होत असल्याने गर्भवती महिलांनी जास्त काळजी घ्यायला हवी. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सांगितलेल्या फिजिकल डिस्टन्सिंग, स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्यावे. गर्भावस्थेत ३-४ नियमित तपासण्या पुरेशा असतात. गरज असल्यास टेलिकन्सल्टेशनचा प्रयोग करू शकता. सामान्य गर्भावस्थेत तीन सोनोग्राफी (११-१३ आठवडे, १८-२० आठवडे आणि ३२-३४ आठवडे) पुरेशा आहेत. रुग्णालयात जातानाही वर सांगितलेली सावधगिरी बाळगावी. गर्भवती महिलांनी नियमितपणे गरम पाण्याची वाफ घ्यावी. कोमट पाणी प्यायले पाहिजे. पुरेसा पोषक आहार घेतला जावा आणि द्रव पदार्थांचे सेवन वाढवावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे व्हिटॅमिन सी आणि मल्टी व्हिटॅमिन औषधांचे सेवन केले जाऊ शकते. हे सर्व उपाय केल्यास कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो.

4 प्रश्नोत्तरांतून मातृत्वाशी संबंधित सावधगिरीचे आवश्यक उपाय

1) आई होण्याशी संबंधित काळजी कशी घ्यावी?

संसर्गाचा जेवढा धोका सामान्य लोकांना आहे, तेवढाच तो गर्भवतींना आहे. पण गर्भावस्थेच्या शेवटच्या महिन्यात धोका वाढू शकतो. यूके ऑब्स्ट्रिक्ट सर्व्हिलन्स सिस्टीमद्वारे कोरोनादरम्यान रुग्णालयात दाखल ४२७ गर्भवती महिलांवर अभ्यास करण्यात आला. अहवालानुसार, ज्या गर्भवती महिला कोरोनामुळे गंभीर आजारी झाल्या त्या गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यात होत्या.

2) आईपासून गर्भस्थ शिशूला संसर्गाचा धोका आहे?

गर्भस्थ शिशूला संसर्गाचा धोका नाही. अभ्यासात असे समोर आले की, गर्भस्थ शिशूला आईपासून संसर्ग होत नाही. प्रसूतीनंतर स्तनपानातूनही हे इन्फेक्शन नवजात शिशूत पसरत नाही. आईपासून शिशूला फक्त शिंकणे किंवा खोकल्यापासूनच संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे संसर्ग झालेल्या मातांनी चेहरा झाकणे, हात धुणे यासारखी सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

3) आई संक्रमित असेल तर स्तनपान कसे करावे?

स्तनपानाआधी २० सेकंद हात धुवा. फेसमास्क लावणेही गरजेचे. मुलाला आपल्या आईच्या संपर्कात कमी येऊ द्यावे. संसर्ग झालेला असेल अशा स्थितीतही स्तनपान बंद करू नये, कारण त्यामुळे नवजाताला अनेक आजारांबद्दल आवश्यक सुरक्षा मिळते. ज्या मातांना संसर्ग झाली नसेल, त्यांनीही इतर लोकांपासून किमान सहा फूट अंतराचे पालन करणे अनिवार्य आहे.

4) लहान मुलांची काळजी कशी घ्यावी?

संसर्गाची भीती वृद्धांना जास्त आहे, पण तरीही नवजात आणि मेडिकल कंडिशनशी संबंधित मुलांना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. मुलांत कोविडशी संबंधित लक्षणांत वाहते नाक, डायरिया, उलट्या यांसारखी लक्षणे दिसतात. सीडीसी या अमेरिकी संस्थेनुसार, दोन वर्षांखालील मुलांना गुदमरण्याचा धोका असल्याने मास्क लावण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही.

हे अव्वल ५ देश, जेथे जन्मणार सर्वाधिक मुले

भारत - 2.01 कोटी

चीन - 1.35 कोटी

नायजेरिया - 0.64 कोटी

पाकिस्तान - 0.50 कोटी

इंडोनेशिया - 0.40 कोटी

नवजातांसाठी आवश्यक सावधगिरी काय असू शकते?

अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, मुलांना वृद्धांच्या बिछान्यावर झोपू देऊ नये.

डॉ. एच. पाई

कन्सल्टंट गायनाकॉलॉजिस्ट, लीलावती हॉस्पिटल, मुंबई, फॉर्टिस हॉस्पिटल, नवी दिल्ली

बातम्या आणखी आहेत...