आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रग्नेंसीमध्ये लस न घेणे धोकादायक:​​​​​​​कोरोनामुळे गर्भातील बाळात जाणवते रक्त आणि ऑक्सीजनची कमतरता, हेच मृत्यूचे कारण

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत जगभरात 59 लाख लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. हा विषाणू गर्भातच मुलांना मारू शकतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. लसीकरण न केलेल्या गर्भवती महिलांसोबत ही दुर्घटना होऊ शकते. आर्काइव ऑफ पॅथॉलॉजी अँड लॅबोरेटरी मेडिसिनमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनात याचे कारण सांगण्यात आले आहे.

64 स्टिल बर्थ्सवर झाला अभ्यास
USA Today म्हणण्यानुसार, 44 सदस्यीय ग्लोबल टीमने 12 देशांतील 64 स्टिल बर्थ्स म्हणजेच गर्भात मृत्यू झालेल्या प्रकरणांचा अभ्यास केला. यासोबतच शास्त्रज्ञांनी 4 नवजात मृतांचाही अभ्यास केला. ही सर्व प्रकरणे लसीकरण न झालेल्या गर्भवती महिलांमध्ये कोरोना संसर्गाशी संबंधित आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की सर्व प्रकरणे डेल्टा व्हेरिएंटची होती.

कोरोना नाळ नष्ट करतो
संशोधनात असे आढळून आले आहे की कोरोना विषाणू प्लेसेंटाला (नाळ) नुकसान पोहोचवतो. यामुळे, बाळाला गर्भाशयात ऑक्सिजनची कमतरता जाणवते, ज्यामुळे त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. शास्त्रज्ञांचे असे मानने आहे की हा विषाणू रक्ताद्वारे प्लेसेंटापर्यंत पोहोचतो आणि त्याला निकामी करतो. या प्रक्रियेचे नाव विरेमिया आहे.

संशोधनात, 68 प्रकरणांमध्ये, सरासरी 77% प्लेसेंटा नष्ट झाली होती आणि बाळाला त्यातून कोणताही सपोर्ट मिळत नव्हता. हा विषाणू प्लेसेंटाच्या टिशूजना मारतो, ज्यामुळे स्त्रीच्या शरीराचे नुकसान होते जे कधीही बरे होऊ शकत नाही.

रक्ताच्या गुठळ्यांनी नाळ होते ब्लॉक
जवळजवळ सर्व प्रकरणांमध्ये, गर्भवती महिलेमध्ये फायब्रिन नावाच्या प्रथिनाचे प्रमाण वाढलेले आढळले. या प्रोटीनमुळे रक्त गोठते. त्यामुळे गर्भातील बाळापर्यंत रक्त आणि ऑक्सिजन पोहोचू शकत नव्हते. याशिवाय, महिलांमध्ये प्लेसेंटाच्या सेल्स डॅमेज झाल्यामुळे आवश्यक नसणाऱ्या पेशींचे प्रमाण इतके वाढले होते की ते बाळ आणि आई यांच्यातील अडथळा बनले होते.

प्लेसेंटाशी संबंधित आणखी एक कॉम्प्लिकेशन
संशोधनात 97% प्रकरणांमध्ये प्लेसेंटाशी संबंधित आणखी एक कॉम्प्लिकेशन दिसून आले. क्रॉनिक हिस्टियोसाइटिक इंटरव्हिलाइटिस नावाच्या दुर्मिळ इन्फ्लेमेटरी सेल्स जमा होत होत्या. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे देखील कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होत आहे.

शास्त्रज्ञांचे असे मानने आहे की, असे अनेक व्हायरस आणि बॅक्टेरिया इन्फेक्शन्स आहेत, ज्यामुळे प्रेग्नेंसी दरम्यान प्लेसेंटा डॅमेज होते. मात्र कोरोना व्हायरसने हे पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता आहे.

कोरोना व्हॅक्सीन आईसोबतच बाळाचेही संरक्षण करते
आधीच्या संशोधनानुसार, कोरोना लसीमुळे शरीरात तयार होणारे अँटीबॉडीज आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचेही संरक्षण करतात. हे ऍन्टीबॉडीज आईमार्फत मुलामध्ये जातात आणि त्याच्या जन्मानंतरही कोरोना संसर्गाशी लढू शकतात.

बातम्या आणखी आहेत...