आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचे साइड इफेक्ट्स:संसर्गबाधितांची चव व वास घेण्याची क्षमता संपू शकते

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशा लोकांचा आहार, जगण्याचा आनंद कमी होतो, त्यांना सामाजिक अंतराची जाणीव होत राहते

रोनी केरिन रॉबिन
कोरोनाचा संसर्ग होण्याचे एक लक्षण म्हणजे गंध क्षमता (अॅनोस्मिया) कमी होणे. म्हणून काही लोकांना अन्नाची चव जाणवत नाही. अनेक रुग्णांत काही काळानंतर गंध व चव घेण्याची क्षमता परत येते, परंतु काही लोकांच्या बाबतीत असे होत नाही. काही तज्ज्ञांना संशय आहे की, विषाणू संसर्ग मोठ्या संख्येने लोकांना वास आणि चवीपासून कायमचा वंचित करू शकतो.

गंधाचा संबंध चव आणि भुकेशी आहे, असे न्यूयॉर्कच्या आयकॉन मेडिसिन स्कूलचे न्यूरोसायन्सच्या मानसशास्त्र, प्रोफेसर डॉ. डोलोरेस मालास्पिना म्हणतात. अॅनोस्मिया लोकांचे खाण्या-पिण्याचा आनंद हिरावतो. याचा परिणाम मूड आणि जीवन जगण्याच्या आनंदावर होतो. अनेक पीडितांना अत्यंत अस्वस्थ वाटते.

सामाजिक अंतर वाढते : काही अभ्यासांतून कळले की, अॅनोस्मिया सामाजिक अंतर निर्माण करतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलचे न्यूरोबायोलॉजीचे प्राध्यापक डॉ. संदीप रॉबर्ट दत्ता म्हणतात की, आठवणी आणि भावनांचा गंधाशी सखोल संबंध आहे. वास एखाद्या व्यक्तीचा वातावरणाबद्दल विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो. ब्रिटनमध्ये झालेल्या संशोधनात अनेक लोक म्हणाले की, आमचा खाणेपिणे व सामाजिक भेटीगाठींचा आनंद संपला. यामुळे संबंध कमकुवत झाले आहेत. वास घेण्याच्या क्षमतेच्या अभावामुळे नैराश्याचा धोका असतो.

अपघाताचा धोका
वास घेण्याची शक्ती मानवांना सतर्क करण्याची प्रणाली म्हणून कार्य करते. आग किंवा वायू गळतीसारख्या गोष्टी वासाने कळतात. वास घेण्याची क्षमता कमी झाल्यामुळे वृद्धांना आगीशी संबंधित अपघात होण्याची शक्यता असते. अमेरिकेतील अनेक संसर्गितांची वास घेण्याची क्षमता कायमची गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...