आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना:मुलांवर कमी प्रभाव, प्रौढांसाठी ठरू शकतो प्राणघातक, टेक्सास विद्यापीठाचा शोध

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलांच्या फुप्फुसांच्या विशिष्ट रचनेमुळे कोरोना विषाणूचा सहज प्रवेश होत नाही

कोरोनाचा मुलांवर कमी प्रभाव पडतो, परंतु प्रौढांसाठी तो जीवघेणा ठरू शकतो. मुलांच्या फुप्फुसांच्या विशिष्ट रचनेमुळे कोरोना विषाणूचा सहज प्रवेश होत नाही, असे त्यामागील कारण आहे. अमेरिकन जर्नल ऑफ फिजिआेलॉजीमध्ये प्रकाशित लेखानुसार अमेरिकेत कोरोनाच्या १ लाख ४९ हजार ०८२ रुग्णांपैकी केवळ १.७ टक्के रुग्णच लहान मुले किंवा १८ वर्षांहून कमीचे रुग्ण होते. युनिव्हर्सिटी आॅफ टेक्सासचे संशोधक मॅथ्यू हार्टिग म्हणाले, अँजियोटेनसिन कन्व्हर्टिंग एन्झाईम (एसीएई-२) यामुळे विषाणूचा फुफ्फुसात प्रवेश होतो. 

हा घटक कमी वयात शरीरात अस्तित्वात नसतो. हे एन्झाईम वय वाढते तसे शरीरात वाढत जाते. त्यामुळे प्रौढांमध्ये कोरोना विषाणूची सहजपणे बाधा होते. हे एन्झाईम मुलांमध्ये स्वाभाविकपणे कमी असते. ते म्हणाले, मुलांची रोगप्रतिकारशक्ती प्रौढांच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करते. त्यामुळेच मुलांमध्ये गंभीर रोगांची शक्यता खूपच कमी असते. त्याशिवाय लहान मुलांमध्ये टी-सेल असते. ही पेशी कोणत्याही प्रकारची सूज व भाजल्यास त्याचा मुकाबला करण्यास सक्षम असते. टी-सेलमध्येे संसर्गाशी सामना करण्याबरोबरच बचाव करण्याची अतिरिक्त क्षमताही असते.

0