आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Corona Mental Health Issue Research Claims Patients Who Lie In Bed For 7 Days Have A 60% Higher Risk Of Depression And Anxiety | Marathi News

कोरोनाचा मानसिक आरोग्यावर हल्ला:संशोधनाचा दावा- 7 दिवस अंथरुणावर पडलेल्या रुग्णांमध्ये नैराश्य, चिंतेचा  धोका 60% पर्यंत जास्त

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना विषाणूचा संसर्ग शरीरावर तसेच मनावरही वाईट परिणाम करू शकतो. लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, कोरोनाच्या गंभीर रुग्णांना दीर्घकालीन मानसिक आरोग्य समस्यांचा धोका जास्त राहतो.

2 लाख 47 हजार लोकांवर झाला रिसर्च

या संशोधनात कोरोनाशी संबंधित मानसिक आरोग्य समस्या जसे की नैराश्य, झोपेचा त्रास आणि चिंता यांचा विचार करण्यात आला. यासाठी ब्रिटन, स्वीडन, डेन्मार्क, आइसलँड, एस्टोनिया आणि नॉर्वे येथील लोकांचा 16 महिने अभ्यास करण्यात आला.

संशोधनात कोरोना रुग्ण आणि ज्यांना कधीही संसर्ग झाला नाही अशांचाही समावेश करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2020 ते ऑगस्ट 2021 दरम्यान 2,47,249 लोकांपैकी 9,979 म्हणजेच 4% लोकांना कोरोना झाला.

कोरोना रुग्णांना नैराश्याचा धोका जास्त

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना झालेल्या लोकांमध्ये मानसिक समस्या निर्माण होण्याचा धोका जास्त असतो. संसर्ग नसलेल्यांपैकी 11.3% लोकांना नैराश्याची लक्षणे दिसली, तर कोरोनाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये 20.2% ही लक्षणे होती. या दरम्यान, संसर्ग नसलेल्या 29.4% लोकांची आणि 23.8% कोरोना रुग्णांची झोपेची गुणवत्ता बिघडली.

संशोधनात असे म्हटले आहे की, घरी बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे मानसिक आरोग्य जास्त खराब होते. यासोबतच कोरोना संसर्गामुळे एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ अंथरुणावर घालवलेल्या लोकांमध्ये नैराश्य आणि एंग्झायटीचा धोका ५०-६०% वाढला आहे.

शास्त्रज्ञांना असेही आढळून आले की, ज्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले नाही त्यांच्यामध्ये नैराश्य आणि चिंताची लक्षणे दोन महिन्यांतच कमी झाली.

तज्ञ काय म्हणतात?

संशोधनात सहभागी असलेल्या आइसलँड विद्यापीठातील प्रोफेसर उन्नूर अन्ना वाल्दिमार्सडोटीर म्हणतात की, गंभीर कोरोना रुग्णांमध्ये दीर्घकालीन मानसिक समस्या पाहणारे हे पहिले संशोधन आहे. हा अभ्यास सूचित करतो की कोरोना संसर्गाच्या पातळीनुसार तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

प्रोफेसर उन्नूर म्हणतात की, आता आपण कोरोना महामारीच्या तिसऱ्या वर्षात आहोत. अशा परिस्थितीत कोरोनानंतर होणाऱ्या इतर गंभीर आजारांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांना वेळेवर उपचार मिळू शकतील.

बातम्या आणखी आहेत...