आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Corona Tablets | Molnupiravir Tables | Molnupiravir Corona Tables | Marathi News, Corona Cure Pill Launched Will Be A 5 Day Course; Know How And When You Can Buy

कामाची बातमी:कोरोना रुग्णाला बरी करणारी गोळी लॉन्च, 5 दिवसात व्हा कोरोनामुक्त; किती रुपयाला आणि कुठे मिळेल 'ही' गोळी जाणून घ्या...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेत आढळेल्या ओमायक्रॉन विषाणूने देखील भारतात हाहाकार माजवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यापासुन आतापर्यंत देशात 1700 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यात पुन्हा निर्बंध लावण्यास सुरुवात होत आहे. दरम्यान बऱ्याचशा लोकांच्या मनात एक आहे प्रश्न आहे, तो म्हणजे कोरोनासाठी औषध नाही का? जर आहे तर, ते सर्वसामान्य जनतेला कसे मिळेल? जर औषध असेल तर ते कुठे आणि केव्हा मिळेल? या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

देशात कोरोना रुग्ण वाढत असल्याने त्यावर मात करण्यासाठी सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या वतीने एक 'गोळी' लॉन्च करण्यात आली आहे. त्या गोळीचे नाव 'मोलनुपिरावीर' असे असुन, कोरोनाशी लढण्यास ही गोळी मदत करते. त्यामुळे मोलनुपिरावीरला आपातकालीन वापरास मंजूरी देण्यात आली आहे. मोलनुपिरावीर व्यक्तिरिक्त 'कोवोवॅक्स' आणि 'कॉर्बेवॅक्स' या दोन टॅब्लेट्सला देखील केंद्रीय औषधी नियंत्रण संगठने मंजूरी दिली आहे.

अँटीव्हायरल गोळी मोलनुपिराविर विषयी माहिती
मोलनुपिराविर या गोळीचा वापर कोरोना संक्रमित रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात येते. हे एक पुनर्रचित औषध असून, त्याला गोळीच्या आकारात देण्यात आले आहे. त्यामुळे रुग्ण या गोळीचे सहजरित्या सेवन करु शकता. मोलनुपिराविर ही गोळी व्हायरसला शरिरात पसरण्यापासून रोखते, आणि लवकर बरे होण्यास मदत मिळते. कोरोना झालेल्या रुग्णांना 12 तासांमध्ये मोलनुपिराविरच्या 4 गोळ्या घ्याव्या लागतात. त्यामुळे पुढे पाच दिवस याचे नियमित चार गोळ्याचे ट्रेटमेंट करणे आवश्यक आहे.

मोलनुपिराविरची किंमत किती?
सोमवारी मोलनुपिराविरला आपातकालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. पाच दिवसांसाठी कोर्सच्या संपुर्ण गोळ्यांची किंमत 1399 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. इकोनॉमिक टाइम्सनुसार, मॅनकाईंड फार्माचे चेअरमन आरसी जुनेजा यांनी सांगितले की, मोलनुपिराविर ही गोळी आतापर्यंतची सर्वात स्वस्त अँटीव्हायरल गोळी आहे. मोलनुपिराविर ही एक गोळी फक्त 35 रुपयांमध्ये आहे. मात्र कोरोना रुग्णांना याचे पाच दिवस कोर्स करावे लागणार आहे, त्यामुळे पाच दिवसांच्या गोळ्यांची संपुर्ण किंमत ही 1399 रुपये इतकी असेल.

मोलनुपिराविरची गोळी आपल्याला कुठे मिळेल?
रिपोर्टनुसार, लवकरच देशातील सर्व मेडिकलमध्ये मोलनुपिराविर ही सहजरित्या मिळणार आहे. मेडिकल विक्रेत्यांना ही गोळी विकण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे. तसेच काही निर्देशांचे पालन देखील ही गोळी विकतांना मेडिकल चालकांना पाळावे लागणार आहे. ज्या रुग्णांना कोरोना झाला आहे तसेच ज्यांची प्रकृती ढासळली असेल, अशा रुग्णांनाच मोलनुपिराविरची गोळी देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मोलनुपिराविरसाठी डॉक्टरांची चिठ्ठी लागेल की नाही?

येणाऱ्या काही दिवसात मोलनुपिराविर ही गोळी सहजरित्या मेडिकलमध्ये मिळणार आहे, मात्र त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे, ती म्हणजे गोळीची खरेदी करताना आपल्याला डॉक्टरांकडून लिहून आणलेल्या चिठ्ठीद्वारेच मोलनुपिराविरची खरेदी करता येणार आहे. कारण, केंद्र सरकारने या गोळीला फक्त आपातकालीन वापरासाठीच परवानगी दिली आहे. त्यामुळे कोणीही या गोळीला खरेदी करु शकणार नाही. डॉक्टरांना जेव्हा या गोळ्यांची आवश्यकता भासत नाही. तोपर्यंत ही गोळी आपल्याला मिळू शकत नाही.

हे औषध नेमकं कसे काम करते?
तज्ञांनुसार, कोरोना विषाणू शरिरात गेल्यानंतर त्याचे फैलाव वेगाने पसरतो. जस-जसा हा विषाणू शरीरात पसरतो, तस-तसे रुग्णांची प्रकृती गंभीर होत जाते. मात्र मोलनुपिराविर ही गोळी RNA मॅकेनिज्मला बरे करते आणि शरिरातील व्हायरला पसरण्यापासून थांबवते. जेव्हा गोळीचा पावर सुरू होतो, तेव्हा व्हायरल हा कमकुवत होत जातो. त्यामुळे रुग्णची प्रकृती सुधारण्यास मदत होते.

ही गोळी कोणी आणि कोणत्या देशाने तयार केली?
तुमच्या मनातील प्रश्न सहाजिक आहे कारण, गोळी कोणी बनवले हे माहिती असणे आवश्यक आहे. मोलनुपिराविर या गोळीला इन्फ्लूएंजाच्या उपचारासाठी अमेरिकेच्या जॉर्जियायेथील इमॉरी युनिवर्सिटीने तयार केले आहे. ज्याला नोव्हेंबर 2021 मध्ये इंग्लंडने आणि डिसेंबर 2021 मध्ये अमेरिकेच्या फुड अॅण्ड ड्रग्ज एडमिनिस्ट्रेशनने मान्यता दिली होती. त्यानंतर भारतात 28 डिसेंबर रोजी ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने आपातकालीन वापरास परवानगी दिली आहे. सोमवारी त्याला भारतात लॉन्च करण्यात आले आहे.

भारतात कोण-कोणत्या कंपन्या मोलनुपिराविर गोळी बनवते?
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले की, भारतात सुमारे 13 कंपन्या मोलनुपिराविर गोळी तयार करते. त्यात डॉ. रेड्डीज, नॅटको फार्मा, सिप्ला, स्ट्राइड्स, हेटेरो आणि ऑप्टिमस फार्मा लिमिटेड यांचा समावेश आहे. या कंपन्या भारतात मोलनुपिराविर गोळी तयार करतात.

या औषधाचा यापुर्वीही वापर करण्यात आला आहे का?
मोलनुपिराविरला सर्वात आधी इन्फ्लूएंजाच्या उपचारासाठी वापरण्यात आले होते.

कोरोना डेल्टा व्हेरिएंटला हे औषध हरवू शकते?
हो, मोलनुपिराविर गोळी कोरोनाच्या डेल्टा विषाणूला देखील नष्ट करू शकते. भारतात ही गोळी तयार करणाऱ्या 13 कंपन्या असून, त्यापैकी मॅनकाईंडने म्हटले आहे की मोलनुपिराविर कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटला देखील नष्ट करू शकते.

बातम्या आणखी आहेत...