आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्रायलचे शास्त्रज्ञ लॅबशिवाय कोरोना विषाणूची चाचणी घेण्याचे तंत्र विकसित करण्यात यशस्वी झाले आहेत. यात श्वास, लाळ आणि आवाजाच्या नमुन्यांसह कोरोनाची तपासणी केली जाऊ शकते. कोविड-१९ प्रतिबंधामध्ये चाचणी हा एक महत्त्वाचा भाग आहे. याअंतर्गत, ‘टेस्ट, ट्रेस अँड आयसोलेट’ हे सूत्र अवलंबले गेले आहे, पण कोरोनाचा प्रसार थांबेल, असे सध्या वाटत नाही. भारतासह जगभरात कोरोना संसर्गाचे प्रमाण सतत वाढत आहे. आरटी-पीसीआर चाचणी कोरोनाच्या तपासणीसाठी सर्वोत्तम मानली जाते. यात तपासणीसाठी नाक किंवा घशातून स्वॅब घेतले जातात. तथापि, त्यात काही त्रुटीही आहेत. कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता / चांगल्या गुणवत्तेचे संकलन किट, वाहतूक व्यवस्था, अधिक गुंतवणूक, चुकीचे नमुने (यामुळे चुकीच्या आणि निगेटिव्ह परिणामांची संख्या वाढत आहे), रुग्णांची भीती आणि चिंता यांचा मुख्यतः यात समावेश आहे. एवढेच नाही, तर संशयित कोरोना रुग्णांचे नमुने घेताना एरोसोल सुटल्यामुळे आरोग्यसेवकांना लागण होण्याचा गंभीर धोकादेखील असतो. म्हणूनच कोविड-१९ च्या रुग्णांच्या जलद आणि अचूक चाचणी करणारा किफायती पर्याय विकसित करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ संशोधनात गुंतले आहेत. त्यांच्या प्रमुख पद्धतींबद्दल जाणून घेऊया.
अशा आहेत चाचणीच्या नव्या पद्धती
१. लाळेचे परीक्षण
कोरोना संसर्गाची माहिती मिळवण्यासाठीआरटी-पीसीआर टेस्टमध्ये लाळेचा उपयोग केला जाईल. हा नमुना घेणे सोपे आहे. सॅम्पलिंगमध्ये रुग्णाची कमी गैरसोय होते. यामुळे संसर्गाचा धोका कमी आहे. हे घरी आपण करू शकतो. क्रॉस-इन्फेक्शनची जोखीम कमी आहे. विशेषत: नाकातून स्वॅब घेता न येणाऱ्या मुलांससाठी उपयोगी आहे. तथापि, लाळ परीक्षणाची अचूकता कमी आहे. आधीच्या ९८%पैकी नेजल स्वॅबमुळे ९१%च संसर्गित लाळ परीक्षणात आढळून आले.
२. सोशल इंजिनिअरिंग
ही चाचणी कुणीही घरी करू शकेल. पाच मूलतत्त्वांसह. घरी किंवा कार्यालयात प्रवेश करताना खाण्यासाठी डिशमध्ये गूळ द्या. त्याला गोड चव लागली तर याचा अर्थ चवीची जाणीव होत आहे. नंतर गुलाब देऊन गुलाब वास घेण्याची क्षमता तपासा. तापमान तपासा. थोडे चालल्यानंतर SpO2 (रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण) तपासा. ते सामान्य असल्यास रुग्णाच्या हाताच्या पकडीची शक्ती पाहा. हे सर्व सामान्य असेल तर ती व्यक्ती संसर्गित नाही.
३. आवाजाच्या विश्लेषणातून
कोविड-१९ संसर्गाची माहिती मिळवण्यासाठी ध्वनीच्या उपयोगाचे नवे तंत्रज्ञान आहे. संशोधक आवाजाचे विश्लेषण करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रयोगावर काम करत आहेत. कोरोनाची लक्षणे व आवाजाला आपसात को-रिलेट करून तंत्रज्ञान अलर्ट जारी करेल. स्मार्टफोनवर ते उपलब्ध होईल. ही चाचणी स्वत:ला करता येईल व काही मिनिटांतच अहवाल मिळेेल. ही एक स्क्रीनिंग मेथड असेल. लॅब टेस्टला ही कन्फर्म करणार नाही.
४. रेडिओ लहरींच्या वापरातून
यात श्वासाच्या नमुन्यांवर रेडिओ लहरींचा वापर केला जातो. यात व्यक्तीद्वारे नलिकेत श्वास सोडला जातो, मग ती नलिका यंत्रात ठेवली जाते. आता यात टेराहर्ट््झ रेडिओ लहरी सोडल्या जातात. यासह एक एल्गोरिदमचा वापर करून विषाणू शोधला जातो. केवळ ६० सेकंदांत रिझल्ट मिळतो. एकदा श्वास घेऊन नलिकेत तीनदा सोडावा लागतो. नलिकेत सोडलेल्या श्वासाच्या एअरोसोलचा क्रम ओळखण्याच्या आधारावर विषाणूची चाचणी केली जाते.
डॉ. के. के. अग्रवाल
प्रेसिडेंट, सीएमएएओ, एचसीएफआय आणि आयएमएचे माजी प्रेसिडेंट
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.