आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गर्भाशयात कोरोना:आईच्या पोटातील बाळाला झाली कोरोनाची लागण; नाळमध्ये सापडले कोरोनाचे कण आणि सूज, गर्भाशयापर्यंत पोहोचला कोरोना

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाळाला आईच्या पोटातच कोरोनाची लागण होऊ शकते याचे हे पहिले उदाहरण

अमेरिकेतील टेक्सास प्रांतात एका बाळाला आईच्या पोटातच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे, गर्भधारणेच्या वेळीच बाळाला कोरोनाचे संक्रमण झाल्याचे संकेत आहेत. या प्रकरणात होणाऱ्या आईला कोरोनाची लागण झाली होती. गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आईची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जन्मलेल्या अर्भकाला वेळीच आयसीयूमध्ये नेण्यात आले. प्रसूतीच्या दुसऱ्या दिवशी बाळाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

ताप येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी कोरोनाची दोन लक्षणे बाळामध्ये दिसून आली आहेत. यानंतर वैज्ञानिकांनी जन्मलेल्या बाळाची गर्भनाळ तपासली. त्यामध्ये सुद्धा कोरोनाचे कण सापडले आहेत. सोबतच, या नाळमध्ये डॉक्टरांना सूज देखील दिसून आली. वैज्ञानिकांनी सांगितल्याप्रमाणे, जन्मलेल्या बाळाला आईच्या पोटातच कोरोनाची लागण झाली होती.

गर्भाशयातही जाऊ शकतो कोरोना

इटलीच्या संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे, गेल्या आठवड्यात गर्भाशयामध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण सापडले होते. कॉर्डच्या रक्त आणि गर्भनाळमध्ये कोरोना आढळला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, गर्भाशयात कोरोना होतो का यासंदर्भात सुरुवातीपासूनच रिसर्च केले जात होते. आता त्याची काही उदाहरणे समोर येत आहेत. संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, एचआयव्ही, झिका व्हायरस आणि इतर व्हायरस ज्या प्रमाणे गर्भाशयात प्रवेश करू शकतात तशाच पद्धतीने कोरोनाची लागण सुद्धा शक्य आहे.

गर्भाशयात कोरोना संक्रमणाचे पहिला शोध

टेक्सास येथे जन्मलेल्या बाळावर संशोधन करणाऱ्या डॉ. अमॅन्डा इवान्स यांनी सांगितल्याप्रमाणे, गेल्या काही दिवसांत गर्भवती मातेला कोरोना होता. पण, त्यातून जन्मलेल्या बाळाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता बाळाला आईच्या पोटातच कोरोनाची लागण होऊ शकते याचे हे पहिले उदाहरण समोर आले आहे. संशोधनात नाळमध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचे कण सापडले आहेत.

ड्यू डेटच्या 3 आठवड्यांपूर्वीच झाली प्रसूती

कोरोना पॉझिटिव्ह जन्मलेले बाळ अपरिपक्व होते. ड्यू डेटच्या अवघ्या 3 आठवड्यांपूर्वी आणि प्रसव वेदना न होताच बाळाची डिलिव्हरी करण्यात आली आहे. कारण, निश्चित तारखेपूर्वीच गर्भ पिश्वी फाटली होती. प्री मॅच्योर डिलिव्हरीच्या 40 टक्के प्रकरणांमध्ये हेच कारण असते. अनेकवेळा संक्रमण सुद्धा याचवेळी होत असतो. टेक्सासच्या प्रकरणातही असेच घडले का? हे अद्याप सिद्ध झाले नाही.

21 व्या दिवशी मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

जन्माच्या दुसऱ्या दिवशी बाळामध्ये काही बदल दिसून आले. त्याला श्वास घेण्यात त्रास होता आणि ताप देखील होती. सुरुवातीला प्री मॅच्योर डिलिव्हरीमुळे असे झाले असावे असे वाटत होते. पण, कोरोना टेस्ट घेतली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली. यानंतर बाळाला कित्येक दिवस ऑक्सिजन देण्यात आले. यात व्हेंटिलेटरची गरज पडली नाही. 21 दिवस पूर्णपणे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवून आई आणि बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.