आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉंग कोविडमुळे आत्महत्येचा वाढतोय धोका:सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून रुग्णांमध्ये आत्महत्येचा विचार; या आजारातून दोनशेहून अधिक लक्षणे

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीर्घकाळ (Long-term covid) कोरोनाशी लढा देणाऱ्या रुग्णांमध्ये आत्महत्या करण्याचा धोका मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. जगभरातील तज्ज्ञ याबाबत इशारा देत आहेत. ही चिंताजनक परिस्थिती आहे कारण जगात लाँग कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

दरम्यान, लॉग कोविडच्या लक्षणांमुळे आत्महत्या करणाऱ्या रुग्णांची अधिकृत आकडेवारी अद्याप नाही. मात्र, लॉंग टाईम कोविडशी झुंज देणाऱ्या रुग्णांबाबत तज्ज्ञांना काय वाटते. याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम समजून घ्या, लॉंग कोविड म्हणजे काय ?
कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये लाँग कोविड किंवा पोस्ट-कोविड सिंड्रोम 4 ते 5 आठवड्यांनंतर होतो. या परिस्थितीत, कोरोनामधून बरे झाल्यानंतरही थकवा, ताप, वास कमी होणे, डोकेदुखी अशी 200 हून अधिक लक्षणे कायम राहतात. म्हणजेच विषाणू शरीरातून बाहेर पडला असला तरी त्याची लक्षणे संपत नाहीत. विशेष म्हणजे कोरोनाची पुन्हा चाचणी करूनही चाचणीचा निकाल निगेटिव्ह येतो. दीर्घ कोविडमुळे होणार्‍या समस्या लोकांना काही महिने अथवा काही वर्षांसाठी त्रास देऊ शकतात.

लाँग कोविडग्रस्त रुग्ण आत्महत्येच्या वाटेवर

  • रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील डलास येथे राहणारे 56 वर्षीय स्कॉट टेलर यांना 2020 मध्ये कोरोनाचे निदान झाले होते. मात्र 18 महिन्यांनंतरही ते आजारातून बरा होऊ शकले नाही. कोविडच्या त्रासामुळे प्रकृती आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्रासलेल्या टेलर यांनी स्वतःच्या घरात आत्महत्या केली.
  • कॅन्ससमध्ये राहणाऱ्या 50 वर्षीय हेडी फेरार यांनी देखील मे 2021 मध्ये आत्महत्या केली. कोरोना संसर्ग झाल्यापासून त्या निद्रानाश, वेदना आणि हदयविकार आधी त्रासाला झुंड देत होती.
  • लॉंग कोविड सपोर्ट ग्रुप बॉडी पॉलिटिक्सच्या बोर्ड सदस्या लॉरेन निकोल्स यांच्या मते, त्या स्वतः दोन वर्षांपासून या आजाराने त्रस्त आहे. त्यांनी अनेकदा आत्महत्येचा विचार केला आहे. त्याच्या ओळखीचे असलेले आणि लॉंग कोविडमुळे त्रस्त असलेल्या पन्नास हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत.

लॉंग कोविडमधून दूर होण्याचा मार्ग ​​​​​​​
कोरोना रुग्णांनी बरे होण्याच्या वेळी आणि त्यानंतरही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आवश्यक विश्रांती घेऊन दीर्घकाळचा कोविड टाळता येतो. जरी तुम्ही तीव्र वर्कआउट्सचे चाहते असाल, तरीही तुम्ही बरे झाल्यानंतर साध्या आणि सोप्या व्यायामाने सुरूवात केली पाहीजे. जंक फूड आणि कोलड्रिंक्स तुम्ही जितके टाळाल तितकेच ते तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...